Tuesday, March 19, 2024
Homeजरा हटकेपहली बेटी धन की पेटी असं का म्हणतात..? मुली कुणाच्या घरी जन्म...

पहली बेटी धन की पेटी असं का म्हणतात..? मुली कुणाच्या घरी जन्म घेतात..??

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर…!! मित्रांनो, असे म्हटले जाते मुलगी झाली लक्ष्मी आली. पहिली बेटी धनाची पेटी भगवंतही सगळ्यांच्या घरी मुलगी पाठवत नाहीत. जे नशीबवान असतात मनाने मोठे असतात त्यांच्याच घरी भगवंत मुलींना पाठवतात.

ज्यांचे मन लहान असते जे मनाने वाईट असतात अशा व्यक्तींच्या घरी भगवंत मुलगी पाठवत नाहीत. ज्यांची देण्याची म्हणजे दान करण्याची नीती असते अशा लोकांच्या घरी मुली जन्म घेतात. व त्यामुळे त्यांना कन्यादानाचे हक्क मिळते

एकदा स्वामी विवेकानंद वैष्णवी देवीच्या मंदिरात दर्शन करायला जात असताना त्यांना वाटेत एक शेतकरी दिसला शेतकऱ्या बरोबर दोन मुली होत्या त्यातील जी लहान होती तिला खांद्यावर बसवलं होतं तर दुसऱ्या मुलीचा हात धरून ते डोंगर चढत होते.

तर स्वामी विवेकानंद त्या शेतकऱ्याला म्हणाले बाबा कुठे जात आहात तर त्या शेतकऱ्यांनी सांगितले मी देवी आईच्या मंदिरात दर्शनास जात आहे. त्यावेळी स्वामी विवेकानंदांनी त्यांना सांगितले तुम्हाला त्या मुलीचे भार झाले असेल तर असे करा तिला माझ्या खांद्यावर द्या.

वरती मंदिरात गेलात की तिथे मी तुम्हाला तिला देतो. त्यावेळी त्या शेतकऱ्याने खूप सुंदर उत्तर दिले की आहो स्वामी मुलगी कधीही आपल्या वडिलांच्या खांद्यावर भार असत नाही उलट मुलगी वडिलांच्या खांद्यावर असते. तेव्हा वडिलांचा भार कमी करत राहते अशा असतात मुली.

मुलगी ओझे नाही ज्या माणसाला मुलगी ओझे वाटते. तो मनुष्य बाप असू शकत नाही. एकदा मुलगा आपल्या आईवडिलांना दुखात बघू शकतो पण मुलगी कधीच नाही.

आई-वडिलांना थोडी जरी दुःख झाली तरी मुलगी चे मन कासाविस होते. जोपर्यंत मुलगी घरात असते तोपर्यंत ती घरात बागडत असते. परंतु ती एकदा लग्न होऊन सासरी गेली फक्त आपण वेळोवेळी तिची आठवण करत राहतो.

जोपर्यंत तिचा विवाह होत नाही तोपर्यंत वडिलांबरोबर बसून जेवण करेल. वडील बाहेरून दमून थकून कामावरून आले की लगेच पाणी देईल. वडिलांची विचारपूस करेल. काही हवे नको ते बघेल.

वडिलांच्या चेहऱ्यावर थोडीशी जरी चिंता दिसली तर लगेच त्याचे कारण विचारेल. औषध पाणी वेळेवर देईल म्हणून तर म्हणतात मुलगी म्हणजे वडिलांची आईच असते ती त्यांच्या आईसारखी वडिलांची काळजी घेते वेळप्रसंगी रागवेल.

तर कधी लाडात येऊन बोलेल चूक असेल तर हक्काने ती चूक दाखवून देईल. परंतु सून असेल तर ती आपल्या पित्याची काळजी घेईल तितकी सासू-सासर्‍यांची पण घेणार नाही.

लग्न होऊन जरी मुलगी सासरी गेली तरी तेथून दहा वेळा फोन लावून वडिलांना औषध गोळ्याची आठवण देईल. जेवण केले का काय केले. जर मुलगीला लांब गावी दिले असेल त्यामुळे सारखी भेटता येत नाही त्यामुळे मुलगी व्याकुळ होऊन राहते.

अशी कोणती स्त्री नाही जिला आपल्या आई वडिलांची आठवण येत नाही. जर कोणी मुलगीच्या गावाला जाणार असेल तर त्याच्याकडे तिच्यासाठी आपल्या हाताने बनवलेले लाडू चिवडा जे काही तिला आवडत असेल तर साडी बांगडी जे काही तिला देता येईल अशा सर्व वस्तू पॅक करून त्या व्यक्तीकडे देते. व सांगते माझ्या मुलीला द्या.

व तिला सांगा तुझी खुप आठवण येते. आणि तो व्यक्ती ती पिशवी घेऊन तिच्या घरी जातो व ती पिशवी तिच्या हातात देतो. तर तिला इतका आनंद होतो तिच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात. आणि त्या व्यक्तीला विचारते की माझे बाबा कसे आहेत.

ती आपल्या आईबद्दल विचारत नाही. कारण मुलींचा वडिलांवर खूप जीव असतो आणि मुलांचा आईवर. मुली सर्वात आधी वडिलांना विचारते. म्हणते की माझे बाबा कसे आहेत त्यांची तब्येत तर ठीक आहे ना.

औषध पाणी वेळेवर घेतात ना आणि ज्या वेळी ती समोरची व्यक्ती वडिलांचा शुभ समाचार मुलगी ला देतात. त्यावेळी मुलगीला आनंदाश्रू येतात. मुलीच्या हृदयात खूपच प्रेम असते.

आपण लहान मुलाच्या हातात भावली दिली तर तो तिचे हात पाय तोडेल. परंतु तीच बाहुली जर आपण एका लहान मुलीच्या हातात दिली तर ती तिला कपडे नेसवेल तिला सजवेल आणि थोपटुन झोपवेल. म्हणजे मुलींमध्ये खूपच माया असते.

वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केली आहे.अशाच प्रकारच्या माहितीसाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा व शेअर करायला विसरू नका.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स