Panchak August Panchang 2023 2 ऑगस्टपासून पुढील 5 दिवस पंचक.. या कालावधीत ही कामं करणं टाळा.. जाणून घ्या नियम..

Panchak August Panchang 2023 2 ऑगस्टपासून पुढील 5 दिवस पंचक.. या कालावधीत ही कामं करणं टाळा.. जाणून घ्या नियम..

नमस्कार मित्रांनो.. या आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचं मनापासून स्वागत आहे.. (Panchak August Panchang 2023) हिंदू पंचांगानुसार ग्रहांच्या गोचरासोबत पंचकही महत्त्वाचं असतं. या काळात शुभ कामं करण्यास मनाई असते. चला जाणून घेऊयात पंचक आणि त्याच्या नियमांबाबत..

हे सुद्धा पहा : Deoguru Brihspati Retrograde 12 वर्षांनंतर गुरु मेष राशीत वक्री.. ‘या’ 3 राशींचे नशीब उजळणार.. प्रमोशन, करिअर आणि व्यवसायात प्रगती होणार..

हिंदू धर्मात कोणतंही काम करताना शुभ मुहूर्त पाहिला जातो. कारण त्या वेळी ग्रहांची स्थिती आणि नक्षत्रांची योग्य सांगड असल्याने शुभ कार्याला सुरुवात केली जाते. त्यामुळे भविष्यात कोणतंही अडचण येत नाही असा समज आहे. असं असताना प्रत्येक महिन्यात पाच दिवस अशुभ मानले जातात.

या कालावधीला पंचक असं म्हंटलं जातं. या कालावधीत शुभ आणि मंगळ कार्य करणं अशुभ मानलं जातं. या महिन्यातील पंचक 2 ऑगस्टपासून सुरु होणार आहे (Panchak August Panchang 2023) आणि 6 ऑगस्टला संपणार आहे. 2 ऑगस्टला बुधवार असल्याने ज्योतिषशास्त्रानुसार हे पंचक अशुभ मानलं जात नाही.

हा पंचक कालावधी कधीपर्यंत आहे.? नक्षत्र आणि पंचांग काय सांगते? हिंदू पंचांगानुसार, पंचक 2 ऑगस्टला रात्री 11 वाजून 26 मिनिटांनी सुरु होईल आणि 6 ऑगस्टला रात्री 1 वाजून 43 मिनिटांनी संपेल. पंचक कालावधीत चंद्र कुंभ ते मीन राशीत जवळपास पाच दिवस असतो. या कालावधीला पंचक म्हंटलं जातं. पाच नक्षत्रांचं मिळून पंचक तयार होतं. धनिष्ठा, पूर्वभाद्रपद, शतभिषा, उत्तराभाद्रपद आणि रेवती नक्षत्र आहे.

शास्त्रांमध्ये कोणत्या दिवशी कोणतं पंचक असतं?
हिंदू ज्योतिषशास्त्रानुसार पंचकाची वर्गवारी पाच गटात करण्यात आली आहे. (Panchak August Panchang 2023) पंचक कोणत्या दिवशी सुरु होते त्यावरून वर्गवारी करण्यात आली आहे. सोमवारी सुरु होणारं राज पंचक, मंगळवारचं अग्नि पंचक, शुक्रवारचं चोर पंचक, शनिवारचं मृत्यू पंचक आणि रविवारचं रोग पंचक असतं. तर बुधवार आणि गुरुवारचं पंचक अशुभ गणलं जात नाही.

पंचक कालावधीत काय करावे आणि काय करू नये.?
‘अग्नि-चौरभयं रोगो राजपीडा धनक्षतिः।संग्रहे तृण-काष्ठानां कृते वस्वादि-पंचके।।’ या श्लोकानुसार पंचकाचं विश्लेषण करण्यात आलं आहे. या कालावधीत अग्नि, चोरी, सत्ताहानी किंवा आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते.

पंचक कालावधीत लाकडं एकत्र करणं किंवा खरेदी करू नये. तसेच घरावर छत टाकू नये, अन्यथा घरात अशांतता वास करते. या कालावधी धन नसने अशुभ मानले गेले आहे. या कालावधी अंत्यसंस्कार करणं योग्य नसल्याचं गणलं गेलं आहे. (Panchak August Panchang 2023) पण काही नियमांचं पालन करून करता येतात. पलंग तयार करू नये किंवा खरेदी करू नये. तसेच दक्षिण दिशेस प्रवास करू नये. कारण ही यमाची दिशा मानली गेली आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!