परिक्षेच्या दिवशी आई आपल्या हातावर दही साखर का द्यायची..?? घरातुन बाहेर पडताना दही आणि साखर खाणं का आहे गरजेचं..???

मित्रांनो, पूर्वीच्या लोकांमध्ये एक प्रथा होती किंवा रित होती असंही आपण म्हणू शकतो, किंवा पूर्वीचे काळी घरातून बाहेर पडताना दही आणि साखर खाऊन मगच बाहेर पडावे असे आपण आपल्या वडिलधाऱ्यांकडून बऱ्याचदा ऐकले असेलच.

आमची आईसुद्धा परीक्षेच्या वेळी दही आणि साखर खाल्ल्यानंतरच आम्हाला परिक्षेला पाठवत असे, किंवा एखाद्या मुलाखतीला जाताना,परदेशात जातांना आम्हाला दही साखर हातावर देऊन मगच आमची पाठवणी केली जात असे.

हे खरं आहे का.. दही आणि साखर खाल्ल्यानंतर घर सोडल्यास खरोखरच आपल्या कामात शुभता येते, कामातील अडथळे दूर होतात व आपली सर्व कामे चांगल्या प्रकारे पार पडतात..???

कोणत्याही शुभ कार्यासाठी दही आणि साखर खाल्यानंतर घरातून बाहेर पडण्यामागे नेमकी काय श्रद्धा आहे हे आज आपल्याला जाणून घ्यायचे आहे.

मित्रांनो, तसे तर दही आणि साखर दोन्हींचा रंग हा पांढराशुभ्र आहे आणि दोन्हीही चंद्राशी संबंधित आहेत. चंद्र हा ग्रह आपल्या मनावर नियंत्रण ठेवत असतो. दही आणि साखर खाल्ल्यामुळे आपले मन थंड होते.

यामुळे आपली पचन क्रिया देखील शांत राहते. म्हणूनच पूर्वी लोक दही आणि साखर खाल्ल्यानंतरच घराबाहेर पडायचे. म्हणूनच दही आणि साखर खाऊन कोणत्याही कामासाठी बाहेर पडणे हे शुभ मानले जाते.

कोणत्याही कामासाठी दही आणि साखर खाल्यानंतर घर सोडण्यामागचे अजूनही बरेच कथित सत्य आहेत.

दह्यामध्ये अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे आहेत. दही हे अनेक प्रकारच्या प्रोटीनने समृद्ध आहे.

पण जेव्हा आपण काहीतरी महत्त्वाचे काम करण्यासाठी बाहेर पडतो तेव्हा आपल्या हृदयात आणि मनामध्ये खूप हालचाली चालू असतात, ज्यांचा आपल्या आरोग्यावर आणि पाचन संस्थेवर देखील परिणाम होतो.

यामुळे आपल्याला अ‍ॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो. आणि आम्लपित्त झाल्यावर आपण अस्वस्थ होतो, ज्यामुळे आपल्या कामांमध्ये अडथळा येऊ शकतो. आणि अशा परिस्थितीत दही एक कूलिंग एजंट म्हणून आपल्या शरिरात कार्य करते आणि आपण जे काही खातो ते पचन करण्यास मदतही करते.

त्याचप्रमाणे साखर आपल्या शरिरातील शुगर लेव्हल संतुलित राखते. जेव्हा पाचन तंत्र आणि साखरेची पातळी योग्य असते, तेव्हा आपल्या शरीरात उर्जा टिकवून राहते आणि आपण आपले कार्य काळजीपूर्वक करू शकतो.
हेच कारण आहे की आपल्या घरातील वडील माणसं घर सोडण्यापूर्वी आपल्याला हातावर दही आणि साखर देत असत.

अशाच प्रकारची वेगवेगळी माहिती मिळविण्यासाठी आमचे रॉयल कारभार पेज आत्ताच लाईक आणि सबस्क्राईब करा तसेच आपल्या प्रियजनांसोबत सुद्धा सामान्य माहितीसाठी शेयर करायला विसरू नका..!!

Leave a Comment