पतीचं प्रेम कायम रहावं असं वाटतं असेल तर, बेडरुममधील या वस्तु त्वरीत काढा बाहेर..!!

नमस्कार मित्रांनो.., आज आपण बघणार आहोत तुमच्या घरातील प्रत्येक वस्तू तुमच्या दैनंदिन आयुष्यावर कशा प्रकारे प्रभाव टाकत असते. यामध्ये काही वस्तूंचा प्रभाव हा सकारात्मक होत असतो, शुभ असतो. तर काही वस्तू मात्र तुमच्या जीवनात, तसेच तुमच्या भाग्यावर विपरीत परिणाम करत असतात. म्हणून अशा वस्तूंना वेळेतच घराबाहेर केलेलं योग्य असते..

आणि जर वेळीच या वस्तूंना तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर काढलं नाही तर कालांतराने ह्या वस्तूंच्या नकारात्मक प्रभावाने तुमच्या घरामध्ये वाद विवाद, अशांती किंवा सतत दुःख, आणि आजारपण सुद्धा यायला वेळ नाही लागणार. तसेच अशा नकारात्मक गोष्टी खरोखरच घडून येताना दिसतात.

उदाहरण द्यायचं झालं तर पती पत्नी मध्ये प्रेम जर कमी होत असेल, घरामध्ये सातत्याने भांडणं होत असतील, अतिशय शुल्लक वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात जर कधी होत असेल तर तुम्हाला गरज आहे तुमच्या बेडरूम मध्ये या काही गोष्टी बदण्याची…

मित्रांनो, आपण आज असेच काही नियम पाहणार आहोत. या काही वस्तू जर तुमच्या बेडरूम मध्ये असतील तर त्यांचे तुमच्या वैवाहिक जीवनावर नकारात्मक परिणाम होतात. म्हणून अशा वस्तुंना योग्य वेळी बाहेर काढणे हे अत्यंत आवश्यक अशी बाब आहे.

मित्रांनो, अनेक लोक एक शोभेची वस्तू म्हणून काटेरी झूडप घरात ठेवतात. हे दिसायला तर सुंदर असतात. मात्र त्यांच्या प्रभावामुळे पती पत्नीच्या सुखी आणि आनंदी आयुष्यावर विरजण पडते, आणि म्हणूनच ही काटेरी झाडे तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये, घरामध्ये अगदी बेडरूम मध्ये सुद्धा चुकूनही ठेवू नये.

तुमच्या बेडरूम मध्ये जर विचित्र आकारांच्या वस्तू ठेवलेल्या असतील, काही धारदार वस्तू ठेवलेल्या असतील, या सर्व वस्तूंचा सुद्धा नकारात्मक प्रभाव पती पत्नीच्या आयुष्यावर पडत असतो.

तसेच जर तुमच्या बेडरूम मधील एखादी भिंत ओली होत असेल किंवा भिंतीला ओलेपणा येत असेल तर त्यामुळे सुद्धा बेडरूममध्ये नकारात्मक ऊर्जा खूप मोठ्या प्रमाणात निर्माण होत असते. अशाने घरात आजार देखील वाढतात.

तसेच तुमच्या बेडरूम चा रंग कोणता आहे यावर सुद्धा तुमच्या बेडरुम मधील वातावरण ठरत असते. बेडरूम मधील रंग अतिशय डार्क किंवा अगदी भडक नसावा. भडक रंग देण्याचे शक्यतो टाळावे.

तुमच्या बेडरूमचा दरवाजा किंवा मुख्य दरवाजा, घरात लावलेले पंखे या गोष्टी जर उघडतांना आवाज करत असतील, तसेच पंखे जुने असल्याने त्यांचा ही आवाज येत असेल तर त्वरित त्या वस्तूंची दुरुस्ती करुन घ्यावी जेणेकरून तो आवाज बंद होईल. तसेच घरामध्ये भांड्यांचा आवाज देखील शक्यतो कमी करावा.

कारण हे सर्व आवाज, या सर्व गोष्टी फार मोठ्या प्रमाणात घरामध्ये नकारात्मक ऊर्जा पसरवत असतात. पती पत्नींमध्ये असणारे प्रेम, जिव्हाळा कमी करत असतात.

मित्रांनो, एक गोष्ट घरातील गृहिणीने लक्षात ठेवायची आहे की, स्वयंपाक घरामध्ये जी चूल आजच्या आपल्या मॉडर्न भाषेत गॅस असतो त्यामध्ये आणि पिण्याच्या पाण्याचा साठा जो असेल या दोघांमध्ये काही अंतर ठेवायचे आहे.

या दोन्ही गोष्टी परस्परांविरुद्ध कार्य करत असतात. तसेच घरामध्ये किंवा बेडरूम मध्ये हवा खेळती राहिली पाहिजे, सूर्य प्रकाश देखील मुबलक आला पाहिजे याची सुद्धा काळजी घेणे आवश्यक आहे.

वास्तुनियमानुसार हवेचा स्त्रोत जर ईशान्य दिशेकडून येत असेल तर ती उत्तम मानली जाते. आणि एक बेडरूम मध्ये कोणताही पाण्याचा साठा असू नये एखादी पाण्याची बाटली किंवा तांब्या भर पाणी चालू शकेल पण जास्त प्रमाणात पाण्याचा साठा तेथे असू नये.

वस्तूशास्त्रानुसार आपल्या बेडरूम मध्ये फिशटॅंक ठेवणे सुद्धा हानिकारक मानले गेले आहे. तो असल्यास पती आणि पत्नी मध्ये किरकोळ भांडणं होऊन ती मोठं स्वरुप धारण करतात. कधी कधी घ-ट-स्फोटापर्यन्त सुद्धा गोष्टी निघून जातात. तसेच घरामध्ये कुठेही अडगळ ही ठेवू नका.

वास्तू म्हणजेच एक मंदिर आहे असं समजून याची काळजी घ्यावी. घरामध्ये देखील देवी देवतांचं वास्तव्य असते, म्हणूनच घरामध्ये मोठ्याने बोलणे वाद करणे किंवा कुणाविषयीही वाईट बोलणे चुकीचे मानले गेले आहे. तसं केल्याने देवतांचा अनादर केल्यासारखे होईल.

तसेच बेडरूम मध्ये कपाट असते किंवा आरसा लावलेला असतो. जर बेड वर पडलेल्या व्यक्तींच प्रतिबिंब त्या मध्ये दिसत असेल किंवा बेडवर बसून असतांना तुम्ही जर त्या आरशामध्ये दिसत असाल तर हे एक कारण वादाचं कारण सुद्धा बनू शकते.

म्हणूनच तो आरसा तिथून काढून टाकावा आणि तसे करणे शक्य नसेल तर त्या आरशासमोर एखादा पडदा तरी लावावा. जेणेकरून जेव्हा आरशाचा वापर करावयाचा असेल तेव्हा तो पडदा बाजूला सारता येऊ शकतो.

तुमच्या बेडरूम मधील भिंतीला सौम्य गुलाबी रंग असेल तर त्याचा सकारात्मक प्रभाव पती पत्नीच्या नात्यावर पडू शकतो. तसेच झोपताना दक्षिणेकडे तोंड करुन झोपल्याने देखील सकारात्मकता टिकून राहते.

टीप – येथे दिलेली सर्व माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

Leave a Comment