मित्रांनो, शास्त्रात स्त्रियांना आपल्या घराची लक्ष्मी मानलं जातं. लग्नानंतर ती ज्याही घरात जाते तिचं नशिब त्या घराशी जोडले जाते. जर तिला पाहिजे असेल तर ती त्या घराला स्वर्ग बनवते.
परंतु बर्याच वेळा स्त्रिया नकळत अशा चुका करतात ज्यामुळे केवळ घरातच दारिद्र्य येत नाही तर त्यामुळे पतीच्या प्रगतीमध्ये देखील अडथळा येतो.
आज आम्ही येथे आपणास अशा 7 गोष्टी सांगणार आहोत ज्या की कोणत्याही गृहीणीने आपल्या संपूर्ण दिनचर्येत केल्यात तर त्यामुळे पतीच्या प्रगती मध्ये अनेक बाधा आणू शकतात. चला तर मग मित्रांनो आज आपण त्या गोष्टी जाणून घेऊयात…
सकाळी उशिरा उठणे –
मित्रांनो, कोणतीही गृहिणी ही घराची लक्ष्मी असते, हे तर सर्वांनाच माहितु आहे. परंतु एका घरंदाज स्त्री साठी आपल्या शास्त्रामध्ये काही नियम सांगितले आहेत. त्यांनी सकाळी लवकर उठून त्यांची आन्हीकं आवरून शुद्ध मनाने पूजा अर्चा करावी.
त्यानंतरच स्वयंपाक घरात प्रवेश करायला हवा. ज्या घरातील गृहिणी सकाळी उशिरा उठतात त्या घरा मध्ये देवी लक्ष्मी कधीही थांबत नाही. तसेच गृहिणींनी सायंकाळी सूर्यास्तानंतर कधीही झोपू नये.
यामुळे ना की केवळ पैशाची कमतरताच उद्भवू शकते, तर आपल्या पतीच्या प्रगतीमध्ये देखील अनेक अडथळे येऊ शकतात. म्हणूनच शास्त्रानुसार आचरण करावे, आणि येणारे अडथळे देखील टाळावे.
नाकावर राग असणे –
शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की शांत स्वभावाच्या स्त्रिया आपल्या घराला स्वर्ग बनवतात,पण याउलट त्यांचा राग सर्व आनंदावर विरजण घालू शकतो.
म्हणूनच अशा परिस्थितीत गृहिणीने आपल्या रागावर नियंत्रण ठेवणेच बरे असते. ज्या घरात घरात कलह आणि संकटाचे वातावरण असते तेथे आई लक्ष्मी कधीच राहत नसते.
झाडूला पाय लावणे –
घरातील गृहिणीद्वारा झाडूला पाय लागल्याने किंवा झाडू पायाने लाथाडल्याने तसेच चुकूनही अडखळत पाय लागल्याने आपल्या घरामध्येे दारिद्रय येते.
म्हणूनच घरंदाज स्त्री कडून अशी चूक कधीही घडायला नको. झाडूला सुद्धा आपल्या हिंदू संस्कृतीत लक्ष्मीचा दर्जा दिला आहे.
याशिवाय घरातल्या स्त्रियांनी कधीही कचरा आणि खरकटी भांडी घरात जासतवेळ ठेवू नये. कारण यामुळे सुद्धा दैवी लक्ष्मी आपल्यावर रागावतात. यामुळे, गरिबी आणि इतर समस्या देखील उद्भवतात.
सौभाग्याच्या या गोष्टी कुणालाही देऊ नये –
हिंदू संस्कृतीनुसार विवाहित महिलांनी कुणालाही स्वतः वापरत असलेल्या सिंदूर दाणी, बिंदी, तोरड्या आणि बांगड्या देऊ नयेत. यामुळे केवळ तुम्हा उभयतांच्या नात्यातील प्रेमच कमी होणार नाही तर त्यामुळे तुमचे आर्थिक नुकसानही होईल.
आपण बघतो की बर्याचदा स्त्रियांना एक सवय असते, की त्या स्वतः तर इतरांच्या गोष्टी वापरतातच आणि त्यांच्या वापरत असलेल्या वस्तु सुद्धा इतरांना देतात.
अशा परिस्थितीत कपड्यांचा विषयही ठीक आहे, परंतु काही गृहिणींनी आपल्या रोजच्या वापरातील वस्तु जसे की सिंदूरही इतरांना देतात, ज्याला शास्त्रांमध्ये अगदी चुकीचे म्हटले गेले आहे की, सुहासिनी गृहिणींनी त्यांच्या सौभाग्याचे लेणं कुणालाही देऊ नये.
सूर्यास्तानंतर हे काम करू नये –
आपण नेहमी बघतो की, गृहिणी घर स्वच्छ करण्यात संपूर्ण दिवस घालवून देतात आणि अशातच त्यांना बहुतांश वेळा संध्याकाळी अंघोळ करावी लागते, आणि अशावेळी गृहिणी संध्याकाळी केस धुतात आणि केसही विंचरतात.
परंतु मित्रांनो, सूर्यास्तानंतर, कधीही गृहिणींनी केस विंचरायला नाही पाहिजे. किंवा विंचरुन झाल्यानंतर तुटलेले केस घराबाहेर देखील टाकू नये.
यामुळे आपल्या घरावर नकारात्मक शक्तींचा वावर वाढतो. त्याचबरोबर सूर्यास्तानंतर घरात कधीही झाडू मारु नये. तसेच सूर्यास्तानंतर कुणालाही उधार देऊ नये.
तिन्ही सांज झाल्यानंतर कुणालाही दूध, दही, कांदा आणि लसूण देऊ नये. शास्त्रांत असे म्हणटले आहे की असे केल्याने आपल्या घरातील लक्ष्मी दुसर्याच्या घरी जात असते.
टिप – वरील लेख केवळ धा-र्मिक मान्यतेचा आधारावर तयार करण्यात आला आहे. तरीही या माध्यमातून आमचा कोणतीही अं-धश्रद्धा पसरविण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा कोणताही उद्देश नाही.मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक करा,शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा.