पिंपळाच्या झाडाची ५ पाने अभिमंत्रित करुन या ठिकाणी ठेवा, पैसे मोजून थकून जाणार इतके पैसे येतील..!! लक्ष्मी प्राप्तीसाठी अचूक उपाय..!!


मित्रांनो आपल्या प्रगतिला नशिबाची साथ ही असावी लागते. त्या शिवाय आपला उत्कर्ष कधीही होत नाही. आणि नशिबाला मजबूत करण्यासाठी देव देवतांच्या आशिर्वादाची गरज असते. निरनिराळ्या साधनेने, तसेच व्रत वैकल्ये करुन आपल्याला हा आशिर्वाद मिळविता येऊ शकतो.

आपले जुने लोक असे म्हणतात की आपण पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी तर दूर होतातच, त्याचबरोबर पिंपळ हा वृक्ष सर्वांच्या आयुष्यात आनंद, समृद्धी भरभराटी देखील भरभरुन देत असतो.

पुराण कथांनुसार भगवान श्रीकृष्णांननी देखील भगवद्गीतेत असे म्हटले आहे की पिंपळाचे झाड म्हणजे साक्षात भगवंत आहेत. पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवंताचा वास आहे.

मित्रांनो, या पिंपळ वृक्षाचा महिमाच मुळात भव्य आणि दिव्य असा आहे. असे म्हटले जाते की पिंपळ या वृक्षाला झाडांचा राजा मानले जाते आणि हे केवळ धार्मिक महत्त्वं म्हणून नाही तर या गोष्टीला वैज्ञानिक दृष्टीकोनातून देखील फायदेशीर मानले आहे.

मित्रांनो, तर आज आम्ही तुम्हाला पिंपळाच्या झाडाचे असे काही फायदे सांगणार आहोत जे तुम्हाला आश्चर्यचकित करुन सोडतील. चला तर मग जाणून घेऊयात पिंपळाच्या वृक्षाला पुराणात इतकं महत्त्वं का दिलं गेलं आहे.

मित्रांनो, असे म्हटले की पिंपळाच्या वृक्षाच्या मुळांना पाणी अर्पण केल्याने आणि शनिवारच्या दिवशी मोहरीच्या तेलाचा दिव्याने दिप प्रज्वलन केल्यास, आपल्या कुंडलीतील शनि दोषांचा प्रभाव कमी करता येऊ शकतो.

दररोज सकाळच्या वेळी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण केल्यने आणि मोहरीच्या तेलाने दीप प्रज्वलित केल्याने आपणास देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. पुराणकथांनुसार अशी मान्यता आहे की या पिंपळाच्या झाडामध्ये तेहतीस कोटी देवतांचे वास्तव्य असते.

एका मान्यतेनुसार असेही म्हटले जाते की पिंपळाच्या झाडाची अखंड पाच पाने घरी आणल्यास आणि त्या पनांची पूजा करावी आणि नंतर त्या पानांना माता लक्ष्मींच्या चरणी अर्पण करावे नंतर ती पिंपळाची पाने आपल्या पर्समध्ये ठेवावीत, हा उपाय केल्याने तुम्हाला आयुष्यात कधीही पैशांची कमतरता भासणार नाही.

या पिंपळाच्या पानांचा अजून एक चमत्कार म्हणजे पिंपळाच्या पानांचा हार बनवून त्या पिंपळाच्या पानांवर राम लिहून तो हार मंगळवारच्या दिवशी हनुमानजींना अर्पण केल्यास हनुमानजींची कृपादृष्टी आपल्यावर टिकून राहते.

एका मान्यतेनुसार देवतांसोबतच आपल्या पूर्वजांचेही वास्तव्य पिंपळाच्या झाडामध्ये असते. म्हणूनच पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने कुटुंबातील सर्व सदस्यांच्या अडचणी दूर होऊन, सर्वांची प्रगती होते, घरात आनंदमयी वातावरण कायम राहते.

टिप – वरील लेख केवळ धा-र्मिक मान्यतेचा आधारावर तयार करण्यात आला आहे. तरीही या माध्यमातून आमचा कोणतीही अं-धश्रद्धा पसरविण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा कोणताही उद्देश नाही.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक करा,शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा.