पितृ पक्षामध्ये कोणतीही नवीन खरेदी का करु नये.??

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, पितृपक्ष पंधवड्याबाबत आपल्याकडे अनेक धारणा आणि गैरसमजुती आहेत. यातील एक प्रमुख समज म्हणजे पितृपक्ष पंधरवड्याचा काळ अशुभ मानला जातो. त्यामुळे या कालावधीत नवीन गोष्टींची खरेदी करू नये, असे सांगितले जाते.

यामुळे या कालावधीत अनेक उद्योग, व्यापारांची गती एकदम मंदावते. मात्र, ज्योतिषशास्त्र आणि धार्मिक ग्रथांमध्ये हा समज चुकीचा असल्याचे सांगितले आहे. या दिवसात कोणत्याही नवीन वस्तू खरेदी करणे अशुभ नसते, असे शास्त्र सांगते.

अगदी प्राचीन काळापासून पूर्वजांचे स्मरण करण्याची भारतीय परंपरा आहे, अगदी रामायण आणि महाभारतात पासून याचे पुरावे मिळतात. चातुर्मासातील भाद्रपद महिन्यात येणार्‍या पक्षात प्रतिपदेपासून ते अमावस्येचा काळ हा पितृपंधरवडा म्हणून पाळला जातो.

या कालावधीत पूर्वजांचे स्मरण करून त्यांच्या नावाने श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान केले जाते. या कालावधीत पूर्वज आपल्या वारसांना भेटण्यासाठी पितृलोक आतून पृथ्वीतलावर येतात अशी मान्यता आहे. त्यामुळे पूर्वजांना अन्न आणि पाणी अर्पण करून त्यांचे मनपूर्वक स्मरण केले जाते, त्यामुळे पूर्व तृप्त होतात आणि वारसांना शुभ आशीर्वाद देतात, असे सुद्धा मानले जाते.

याशिवाय पितृपक्ष पंधरवडा याबाबत आपल्याकडे अनेक कपड्याची किंवा वस्तूची खरेदी करू नये, असं सांगितलं जातं. पण ज्योतिष शास्त्रानुसार, हा समज चुकीचा मानला जातो. या दिवसात कोणत्याही नवीन वस्तू खरेदी करणे अशुभ नसते, असे सांगत असते.

पितृपक्ष पंधरवडा या कालावधीत खरेदी केलेल्या वस्तू गोष्टी या पूर्वजांना समर्पित होतात, अशी धारणा काही ठिकाणी बघायला मिळते आणि काही ठिकाणी पूर्वजांचे स्मरण हे श्रद्धापूर्वक करावे, श्राद्ध तर्पण पिंडदान यासारखे विधी करून पूर्वजांना नमन करावे, म्हणून या काळात काही खरेदी करू नये, असे सांगितले जाते.

नवीन वस्त्र दागिने आणि वाहन खरेदी केल्यास पूर्वज नाराज होतात आणि वारसांना आशीर्वाद देत नाही, अशी सुद्धा हेच लोक मान्यता आपल्याला समाजात बघायला मिळते. मात्र यातील कोणत्याही धारणा आणि समजुतींना कोणताही शास्त्रीय आधार नाही. मात्र या पितृपक्षात काही गोष्टी करण्यास पितृपक्षात निषिद्ध मानला गेला आहे.

पितृपक्ष पंधरवड्यात गैर कृत्य करू नये, तस तर गैरकृत्य कधीच करू नये, पण पितृपक्षामध्ये खोटं बोलू नये, वागू नये याशिवाय कोणत्याही प्राण्याला किंवा पक्षाला को त्रास देवू नये विशेषतः गोमातेला सन्मानाची वागणूक द्यावी आणि जास्तीत जास्त अन्नदान करावे.

असे सांगितले आहे, घरात आलेल्या पाहुण्यांचा अपमान करू नये. तसेच त्यांना भोजनशिवाय जाऊ देऊ नये असं सुद्धा सांगितलेला आहे. तसंच पितृपंधरवड्यात मुंजा विवाह वास्तुशांती यांचे खरंतर मुहूर्तच नसल्यामुळे, त्यामुळे ही कार्य पितृपंधरवडा होऊ शकत नाही. परंतु जागेची खरेदी, वाहनांची खरेदी किंवा विवाह मिलनासाठी पत्रिका पाहणे यासारखी कार्य करता येतात. यासाठी पितृपंधरवडा अशुभ निश्चितच नसतात.

शास्त्र सांगतं, ज्योतिष शास्त्रानुसार पूर्वज आपल्या वारसांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीतलावर येत असतात, मग अशावेळी घरात नवीन आलेली वस्तू पाहून पूर्वज आनंदित होतील आणि वारस आमची प्रगती पाहून पूर्वजांना समाधान मिळेल, शांतता लाभेल. तसेच कोणत्याही कार्याची सुरुवात गणेश पूजनाने होत असते आणि पित्रू पक्षानंतर नवरात्रीला सुरुवात होते, त्यामुळे विघ्नहर्ता गणेश त्याच्या स्मरणाने सुरू केलेलं कार्य अशुभ कसे होऊ शकते.

यासह दुर्गा देवीच्या आगमनाची चाहूल ही याच कालावधीत लागते, अशा सर्व घटनांचा काळ पाठीशी भक्कमपणे असताना हा पक्ष अशुभ असू शकत नाही, असे सांगत त्यामुळे या कालावधीत नवे वस्त्र, दागिने, वाहने आणि जागा इत्यादी गोष्टी तुम्ही खरेदी करु शकता. यासाठी हा काळ अशुभ असू शकत नाही, असे सांगितले जाते.

वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासह शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!

Leave a Comment