प्रचंड मानसिक ताकद देणारा स्वामींचा संदेश.!! – श्री स्वामी समर्थ –


नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो आपले स्वामी म्हणतात मूळ पुरुष, वडाचे झाड, दत्तनगर! स्वामी महाराज अक्कलकोटला असंख्य लीला करत होते. स्वामींच्या लीला या खरखर अतर्क होत्या. अक्कलकोट मध्ये एक सरस्वती नावाची सोनारी स्त्री राहत होती. तिचे वागणे हे वेडसर असे परंतु तिच्यावर महाराजांची फार कृपा होती.

कधी कधी ती जनाबाईंचे अभंग म्हणत गळा गळा रडत आणि वेड्यासारखी रस्त्यावरून फिरत असे. तिच्याजवळ चिंध्यांचे एक गाठोडे आणि एक घाडगे एवढेच होते. या सुनारनीला स्वामींच्या वाक्यांचा अर्थ कळत नसे. इतकेच नव्हे तर एखाद्या वेळी स्वामी महाराज रागावले आहेत.

आणि त्यांचा राग शांत होत नाही आहे त्यावेळेस म्यानबा सरस्वती सोनारी स्त्रीला शोधून आणत. मग पुढे हा म्यानबा आणि मागे सोनारी हातात गाठोडी घेऊन एकाने ज्ञानोबा तुकाराम आणि दुसऱ्याने बोडकीचे काय काम असे भजन करत नाचू लागत.

ते दोघे असे बोलू लागताच स्वामी महाराजांचा राग कमी होई. आणि महाराज मोठमोठ्याने हसू लागत. असेच एकदा नरसोबावाडी चे काही लोक दर्शनाला आली होती. त्यांनी स्वामी प्रश्न केला की स्वामी आपण कोण आहात?

स्वामी म्हणाले मूळ पुरुष, वडाचे झाड, दत्तनगर हे ऐकून सोनारी बाई बोलली वडपत्रशाही मूळ पुरुष दत्तात्रय रुपाने अवतरले आहेत. स्वामी न बरोबर त्या वेड्या बाईंनी असे बोलता सर्वांना आश्चर्यच वाटले.

परब्रह्माच्या वाणीचे उकट एका वेड्या स्त्रीने केले. याला लीला नव्हे तर आणखी काय म्हणावे. सरस्वती सोनारी सह म्यानबा दोघेही वेडे होते. परंतु स्वामींना सर्वात प्रिय होते.

वेद, उपनिषद, शास्त्र, आदिग्रंथ ज्ञानी लोकांना स्वामींच्या वाणीची उकल होत नसे, पण त्या वाणीचा अर्थ त्या वेड्या स्त्रीला समजत असे या स्वामी लीलेतुन स्वामी आजच्या पिढीला हाच संकेत देत आहेत की गुरु तत्वाचे मार्गदर्शन आपल्याला समजावून घ्यायचं असेल त्याच्यावरती वेडे व्हावेच लागेल.

त्याच्यासोबत एकरूप व्हावे लागेल. यासह आजच्या लीलेत स्वामी कोण आहेत? या प्रश्नाचे उत्तर देताना की मूळ पुरुष वडाचे झाड आणि दत्तनगर. या वाणी चा अर्थ त्या सोनारणी बाई ने सांगितलंच आहे खरोखर याचा मनन करण्यासारख आहे. ती सांगते की मुळ पुरुष म्हणजेच स्त्रोत.

की त्यातून अक्षय वडाच्या वृक्षाप्रमाणे अनंत ब्रह्मांड प्रसरण पावते. आणि प्रत्येक पक्षी, कीटक, जिवासह मानवाला हृदयातून सतत मार्गदर्शन करतो आहे. असे गुरु तत्व म्हणजे श्रीदत्त. अशी निराकार अवस्था म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज.

या स्वामी माने चा अनुभव घेणे हेच प्रत्येक मानवाच्या जीवनाचे अंतिम ध्येय आहे. आणि पुस्तकी ज्ञानी पुरुष होण्यापेक्षा स्वामींचा वेडा भक्त झालो. तर नक्कीच या स्वामी वाणीचा स्वाद घेणे नक्कीच सहज शक्य आहे असे वाटते.

वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासह शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!