प्रदोष व्रत का करावे.? कुणी करावे आणि कसे करावे.? व्रताचे महत्त्व कथा.. आणि विधी जाणून घ्या.!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! प्रदोष व्रत का करावे, कसे करावे व कुणी करावे या व्रताचे महत्त्व काय आहे. हे व्रत केल्याने मनातल्या इच्छा पूर्ण होतात. का तर होय आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील असे हे प्रदोष व्रत आहे. आताचे येणारे प्रदोष व्रत हे आज 3 फेब्रुवारी 2023 रोजी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी येत आहे हे व्रत आहे बऱ्याच लोकांना प्रदोष व्रताबद्दल माहिती असेल ते लोक प्रदोष व्रत करत असतील मात्र काही लोकांना हे व्रत कसे करायचे असते. या व्रताबद्दल काहीच माहिती नसते प्रदोष व्रत का करावे.

मनातल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी व कोणत्याही कामांमध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी त्यासोबतच आई-वडिलांनी आपल्या मुलांसाठी त्यासोबतच लग्न होत नाही. त्यांनी व अशा अनेक अडचणी आहेत, त्या अडचणीतून आपली सुटका करून घेण्यासाठी हे व्रत करावे. हे व्रत कसे करायचे असते केव्हा करायचे असते याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये घेणार आहोत.

प्रदोष व्रत स्त्रिया पुरुष असे कोणीही हे व्रत करू शकतात. व या व्रताचा उपवास करू शकतात. प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या शुद्ध आणि मध्य प्रियदर्शीच्या सूर्य मावळण्याच्या घटकांना प्रदोष असे म्हणतात. आपल्या सर्वांना समजेल असे जर म्हणायचे झाले तर एकादशी झाल्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशीला हे व्रत येते प्रदोष व्रत हे महादेवांसाठी केले जाते.

महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी बरेच जण हे व्रत करत असतात शक्यतो. हे उपवास निर्जला म्हणजेच पाणी फळे असे काहीही घेऊन करायचे नसते. मात्र आजच्या या धावपळीच्या जगामध्ये निर्जला उपवास करणे कोणालाही जमत नाही. त्यामुळे प्रदोष व्रत करत असताना आपण फलाहार घेऊ शकतो. या दिवशी कोणतेही तिखट किंवा मिठाचे पदार्थ खाऊन हा उपवास केला जात नाही.

हा उपास करण्यासाठी कोणतेही फळ किंवा फलाहार चालतो. संध्याकाळच्या वेळी प्रदोष व्रत झाल्यानंतर तुम्ही हा उपवास सोडू शकता. ज्या दिवशी आपण प्रदोष व्रत करतो. त्या दिवशी दिवसातून कोणत्याही एका वेळेस म्हणजेच तिन्ही सांजाच्या आधी आपल्याला महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन महादेवांची पूजा करायची आहे.

व महादेवांच्या पिंडीवर पांढऱ्या रंगाची फुले व बेलपत्र अर्पण करून मनोभावे त्यांची पूजा करायची आहे. ही पूजा करत असताना मनामध्ये श्रद्धा आणि भाव असायला पाहिजे. श्रद्धेन्याने, भक्तिभावाने जर आपण हे प्रदोष व्रत केले तर भगवान शंकर आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात. आणि तुमच्याकडे जर प्रदोष व्रताची पोथी असेल तर त्या पोथीमध्ये एक कथा सांगितलेली आहे.

ती कथा आपल्याला वाचायची आहे. शक्यतो तुम्ही महादेवांच्या मंदिरात शिवलिंग समोर वाचली तरी चालते. किंवा आपल्या घरामध्ये जर शिवलिंग असेल तर त्या शिवलिंगासमोर ही कथा वाचली तरी चालते. पोथी मधील व्रताची कहाणी वाचून झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळी आपल्या स्वयंपाक घरामध्ये जे काही पदार्थ तयार होतात.

त्याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. व आपण जो काही उपवास केलेला आहे तो उपवास सोडायचा आहे. हे प्रदोष व्रत आपण 11 किंवा 21 हे प्रदोष केल्यानंतर आपल्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत. त्या सर्व इच्छा पूर्ण होतात. देवाधिदेव महादेव यांचा आशीर्वाद आपल्याला लागतो.

त्यांची कृपादृष्टी आपल्यावर राहते व आपल्याला जे काही हवे आहे. ते सर्व मिळते घरामध्ये सुख समाधान बरकत येते मित्रांनो उत्तम आरोग्य लाभते. सर्व कामांमध्ये आपल्याला यश येते. आपल्या मार्गामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतात. हे व्रत केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा तयार होते नकारात्मक ऊर्जा निघून जाते.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!!

Leave a Comment