प्रथमतः कुलदेवता पुजन का करावे.? कसे करावे.?

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… कुलदेव म्हणजे बाबा व कुलदेवी म्हणजे आई. त्याच प्रमाणे प्रत्येक कुल – घराण्याला कुलदेवता प्राप्त असतात. जसे आई बाबां शिवाय बालकाचा सर्वांगीण विकास व त्याचे संरक्षण होणे कठीण असते, तसेच कुलदेवतां शिवाय एखाद्या कुलाचे रक्षण व पोषण कठीण असते.

प्रत्येक स्थानाची एक उर्जा असते व तसेच त्या स्थानावर उभ्या राहीलेल्या वास्तुची देखील विशिष्ट उर्जा असते. त्या वास्तुत राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे विचार, आचरण, कर्म, इत्यादी गोष्टींचा प्रभाव एकत्रित पणे तेथील वास्तुचे वलय-उर्जेवर होत असतो.

घरात वाईट मनोव्रुत्तीची व्यक्ती असल्यास, तिच्या नकारात्मक ऊर्जेमुळे घरातील वातावरण दुषीत बनते व तसेच घरावर एखाद्याची वाईट नजर असल्यास किंवा करणी-वास्तु अथवा कुलदेवता बंधन सारखे अघोरी द्रुष्ट प्रयोग झाल्यावर देखील घरातील वातावरण कलुशीत होउन उर्जा नकारात्मक जास्त जाणवते.

तर एखादी सकारात्मक व्यक्ती घरात (नियमीत अध्यात्मिक साधना- नामस्मरण करणारी असेल तर त्या एका व्यक्तीच्या साधनेच्या बळाने संपुर्ण घरा भोवती सकारात्मक उर्जेचे कवच) तयार होते.

जर त्या साधक व्यक्तीस कुलदेवता अथवा सद्गुरू सिद्धपुरूषांच्या शक्तीची जोड असली तर त्याच्या परीसरात येणाऱ्या प्रत्येक जीवास सकारात्मक उर्जेचा व अनुभवांची प्रचीती येते.

कुलातील उर्जा वाढवण्याचे अथवा सकारात्मक ठेवण्याचे मुख्य कार्य कुलदेवतांचे असते. घरावर येणाऱ्या संकटांची चाहुल साधकाला करून देणे. घरातील सदस्यांवर येणार्या दुष्ट शक्तींचा-संकटांचा प्रभाव कमी करणे, घरा भोवती संरक्षक कवच – वलय तयार करणे, इत्यादी कार्य कुलदेवता करत असतात.

अनेकदा एखाद्याच्या कुटुंबावर अमानवी प्रयोग करायचे झाल्यास प्रथम मांत्रिक त्या घरातील कुलदेवता बंधनात टाकतात ज्यामुळे नंतर घरावर ताबा मिळवने मांत्रिकास सोपे जाते कारण कुलदेवता म्हणजे कुलाची जणु एक प्रकारची रोग प्रतिकार शक्ती असते,

एकदा का ह्या कुलदेवता नामक प्रतिकार शक्तीस बंधनात टाकले कि घरावर सहज घात करता येतो. म्हणुन कुलदेवता नीत्य पुजन, अभीषेक, वर्षातून एकदा तरी कुलदेवता देवभेटीस मुळ देवस्थानास जाणे, कुलाचार, नामस्मरण, मुख्य देवघरात कुलदेवीच्या नावाने मंगल कलश, कुलदेवी प्रतिमा, कुलदेवी टाक ईत्यादी, स्थापन करणे, अशी कार्य महत्वाचे असतात ज्यामुळे कुलदेवतांची उर्जा सात्वीक राहते.

कुलदेवतांना कधीच विसरु नका, त्यांचे नाम रूप सदैव स्मरा कारण तुमच्या घरात हाकेला ओ देणारे प्रथम तेच आहेत.

|| श्री कुलदेवताभ्यो नमः ||

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

Leave a Comment