Monday, May 29, 2023
Homeअध्यात्मप्रत्येक वारा नुसार कपाळावर कोणता तिलक (गंध) लावल्याने होतो फायदा जाणुन घ्या.!!

प्रत्येक वारा नुसार कपाळावर कोणता तिलक (गंध) लावल्याने होतो फायदा जाणुन घ्या.!!

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो आपल्या भारतीय संस्कृतीत नित्य पूजा, विधी, शुभ कार्य, प्रवास यांची सुरूवात मंगल तिलक लावुन केली जाते. शुभ कार्याच्या सुरुवातीला कपाळावर तिलक लावून त्यावर अक्षदा लावली जाते. तिलक ही केवळ धार्मिक अंधश्रद्धा नाही, तर त्यामागे अनेक वैज्ञानिक कारणेही सांगितली जातात.

जर तज्ञांवर विश्वास ठेवला तर हिंदू अध्यात्माची खरी ओळख तिलकच आहे. असे मानले जाते की टिळा लावल्याने नेहमी समाजात आपले स्थान अभिमानाने उंचावले जाते. हिंदू कुटुंबांमध्ये कोणत्याही शुभ कार्यात तिलक किंवा टिळा लावण्याची पद्धत आहे. हे तिलक वेगवेगळ्या प्रकारचे असतात. हळद, कुंकू, केशर, भस्म आणि चंदन इत्यादींचे तिलक वेगवेगळ्या वारा नुसार लावले जातात.

असे मानले जाते की आपल्या मस्तकाच्या मध्यभागी भगवान् श्री विष्णु वास करतात आणि त्याच ठिकाणी तिलक लावले जाते. जिथे विष्णु तिथे लक्ष्मी माता अवश्य असणारच. त्यामुळे तिलक लावल्यावर त्यावर अक्षदा लावल्या तर माता लक्ष्मी देखील आपल्याकडे आकर्षित होते. आपल्यावर श्री विष्णु आणि माता लक्ष्मीची शुभ कृपा कायम राहते.

हिंदु परंपरेनुसार मोकळेकपाळ शुभ मानले जात नाही. कपाळावर चंदन, हळद, कुंकू, शेंदुर, तसेच भस्माचे तिलक लावले जातात.

ज्योतिष शास्त्रानुसार, जर दिवसानुसार विवीध प्रकारचे तिलक लावले, तर व्यक्ती वरील अनेक प्रकारच्या समस्या दूर होतात आणि त्याचे अनेक प्रकारे शुभ परिणामही जाणवतात. तसेच टिळा लावल्याने कुंडलीतील अनेक ग्रह दोष आपोआप दूर होतात. आपल्याला सर्व प्रकारच्या कार्यात यश मिळते.

कपाळावर भुवयांच्या मध्यभागी आज्ञाचक्र ज्याला चैतन्याचे केंद्र देखील म्हटले जाते जे तिलक लावल्यावर जागृत आणि अवचेतन अवस्थेतही सक्रिय राहते. श्रद्धेनुसार चंदन तिलक लावल्याने पापांचा नाश होतो, व्यक्ती संकटांपासून वाचते, तसेच लक्ष्मीची कृपा अशा व्यक्तीवर सदैव राहते, याशिवाय ज्ञानाचे तंतू संयमित आणि सक्रिय राहतात. या स्थानाला गुरुस्थान असे म्हणतात.
तर मित्रांनो जाणुन घेऊया आठवड्यातील कोणत्या दिवशी कोणता तिलक लावल्यावर काय फायदा होतो:

1) सोमवार – सोमवार हा भगवान शंकराचा दिवस आहे आणि या दिवसाचा कारक ग्रह चंद्र आहे. चंद्र हा मनाचा कारक ग्रह मानला जातो. त्यामुळे मनावर नियंत्रण ठेवून मन स्थिर आणि शांत ठेवण्यासाठी पांढऱ्या चंदनाचा टिळा लावावा. या दिवशी विभूती किंवा भस्म देखील लावले जाऊ शकते.

2) मंगळवार – मंगळवार हा हनुमानजींचा दिवस मानला जातो. या दिवसाचा कारक ग्रह मंगळ आहे. मंगळ लाल रंगाचे प्रतिनिधित्व करतो. या दिवशी लाल चंदन किंवा चमेलीच्या तेलात शेंदूर मिसळून तिलक लावल्याने ऊर्जा आणि कार्यक्षमता वाढते. यामुळे मनातील दुःख आणि निराशा दूर होते आणि एका नव्या उत्साहाने आपण प्रत्येक कार्य पार पाडतो.

3) बुधवार – बुधवार हा गणपतीचा दिवस मानला जातो. या दिवसाचा स्वामी बुध ग्रह आहे. बुध ग्रह एखाद्या व्यक्तीच्या बुद्धिमत्तेचे प्रतिनिधित्व करतो. या दिवशी कोरड्या शेंदुराचा टिळा लावावा. हे तिलक बौद्धिक क्षमता वाढविते आणि आपली खुप प्रगती होते. कोणत्याही क्षेत्रात अग्रेसर राहण्यासाठी बुधवारी शेंदुराचा टिळा अवश्य लावावा

4) गुरुवार – गुरुवार हा भगवान विष्णूचा दिवस मानला जातो. या दिवसाचा स्वामी बृहस्पति ग्रह आहे. पिवळा किंवा सफेद रंगमिश्रित पिवळारंग गुरुला प्रिय आहे. या दिवशी पांढरे चंदन आणि केशर मिसळून तो तिलक कपाळावर लावावा. हळद आणि गोचरण मिश्रित टिळा देखील लावणे शुभ असते.

असे मानले जाते की यामुळे मनामध्ये शुद्ध आणि सकारात्मक विचार आणि चांगल्या भावनांचा उदय होईल, ज्यामुळे दिवस शुभ होईल आणि आर्थिक समस्या देखील सुटतील. आपल्यावर भगवान श्री विष्णु आणि माता लक्ष्मी नेहमी प्रसन्न राहतील. आपल्याला कधीच संपत्तीची चणचण भासणार नाही. धन धान्याची भरभराट होईल.

5) शुक्रवार – शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस आहे. या दिवसाचा स्वामी शुक्र ग्रह आहे. या दिवशी लाल चंदन लावल्याने मानसिक स्वास्थ्य चांगले राहाते. तणाव दूर राहतो, त्यामुळे भौतिक सुखसुविधा वाढतात. या दिवशी तुम्ही शेंदूरही लावू शकता. माता लक्ष्मीची कायम तुमच्यावर कृपादृष्टी राहील. कौटुंबिक सुख समाधान लाभेल.

6) शनिवार – शनिवार हा भैरव, शनि आणि यमराजांचा दिवस मानला जातो. या दिवसाचा स्वामी शनि ग्रह आहे. शनिवारी विभूती, भस्म, लाल चंदन लावावे. यामुळे भैरव महाराज प्रसन्न होतात आणि कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ देत नाहीत. शनिदेव आपल्यावर वक्रदृष्टी ठेवणार नाही. आपल्या कुंडलीतील शनिदोष कमी होतील. सर्व प्रकारच्या दुःखातून तुमची सुटका होईल.

7) रविवार – रविवार हा भगवान सूर्याचा दिवस आहे. या दिवसाचा स्वामी सूर्य आहे, जो ग्रहांचा राजा देखील आहे. या दिवशी लाल चंदन किंवा हिरवे चंदन लावावे. भगवान सूर्याच्या कृपेमुळे समाजात आपली प्रतिष्ठा वाढते. सर्व ठिकाणी आपल्याला मानसन्मान मिळतो.

तर मित्रांनो, प्रत्येक दिवशी अशा प्रकारे तिलक लावणार तर तुमचा भाग्योदय लवकरच होणार यात शंकाच नाही. हिंदु परंपरेनुसार लाभदायी ठरेल कपाळावर तिलक लावणे. मान सन्मान, पद प्रतिष्ठा, भरपूर धन दौलत आणि मानसिक स्वास्थ्य मिळेल.

वरील माहिती विविध स्रोतांची आधारे एकत्रित केलेली आहे याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र आणि परिवारासह शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स