प्रेमात पडलेल्या मुलीं मध्ये होतात हे 5 खास बदल..!!

काळाबरोबरच माणसाच्या सवयी बदलत जातात. बरेचदा लग्नानंतरही मुलगा आणि मुलगी यांचे आयुष्य, बोलण्याची पद्धत इत्यादी बदलतात. नात्यात पडूनही मुलींच्या बर्‍याच सवयी देखील बदलतात.

काही लोक अतिशय भावनिक होतात तर काहींना हळव्या संवेदना जाणवतात. चला तर प्रेमात पडल्यानंतर मुलींमध्ये काय काय बदल घडतात ते आज आपण जाणून घेऊयात…!!!

झोप –
असे म्हणतात की ज्या मुली प्रेमात पडतात त्यांची झोप उडून गेलेली असते, त्यांना नेहमीच कमी झोप येते. रात्री उशिरापर्यंत त्या फोनवर व्यस्त असतात. अगदी काम सोडून सुद्धा त्या दिवसभर चॅटिंग आणि मोबाइलवर घालवतात.

सु़ंदर दिसण्यासाठी प्रयत्न –
रिलेशनशिपमध्ये पडल्यानंतर मुलींमध्ये होणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या बदलांपैकी हा देखील एक महत्त्वाचा बदल आहे. त्यांच्या ड्रेस सेन्स मध्ये कमालीचा बदल व्हायला लागतो. त्या सजण्या सावरण्याकडे खास लक्ष द्यायला लागतात.

रिलेशनशिप मध्ये असलेल्या मुली नेहमीच त्यांच्या सौंदर्याकडे खूपच लक्ष देतात. त्या नेहमीच आपल्या चेहऱ्याची काळजी घेतांना दिसतात. दिवसातून अनेक वेळा आरशात स्वतःचा चेहरा निरखून पाहतात.

मोबाइल लॉक ठेवतात –
प्रेमात असणाऱ्या मुली आपला मोबाईल स्वत: पासून कधीही विभक्त करत नाहीत. तो एकमेव पर्याय असतो ज्यात त्या त्यांचे सर्व टॉप सिक्रेट लपवून ठेऊ शकतात.

तसेच त्यांच लक्ष सारखं मोबाईल स्क्रिन कडे असतं किंवा मोबाइलच्या नोटीफिकेशन्स ची रिंगटोन त्यांना विचलित करते. तसेच त्यांच्या फोनचे नॉर्मल लॉक पासवर्ड लॉक मध्ये बदलून जाते. जेणेकरून त्यांच्या आयुष्यातील प्रेमाचे रहस्यं कुणालाही कळू शकणार नाहीत.

रोमॅंटिक गाणी ऐकायला लागतात –
जेथे पूर्वीच्या मुली ज्यांना रोमँटिक गाणी आवडत नसतात, त्याच अचानक रोमॅंटिक सॉंग्स ऐकायला लागतात. किंवा ज्यांना संगीताची सवय नसते त्यांचे प्रेमात पडल्यानंतर अचानक संगीत ऐकणे सुरू होते.

त्या प्रेमगीते अगदी निवडून -निवडून ऐकायला लागतात. प्रेमात पडण्यापूर्वी ज्या मुलींना लव्ह स्टोरीज् खोट्या वाटतात त्याच त्यांच्या आवडीच्या ठरतात. थोडक्यात संगीत त्यांचा जीव की प्राण बनते.

मित्र मैत्रिणींना देतात अंतर –
जेव्हा मुली प्रेमात पडतात तेव्हा मित्र आणि मैत्रिणींपासून अंतर बनवतात. त्या त्यांना जाणीवपूर्वक अवॉइड करायला लागतात. त्यांना हर एक जण प्यार का दुश्मन वाली फिलिंग द्यायला लागतो.

त्यांना आपले नाते कुणासमोरही प्रकट करावेसे वाटत नाही म्हणून मित्र मैत्रिणींनी पासून त्या अंतर ठेवायला लागतात. त्या आपल्याच कल्पना विश्वात रममाण होऊन जातात.

Leave a Comment