प्रेमात सफलता मिळवण्याचे अचूक उपाय : तुमचं प्रेम तुम्हाला 100% मिळणारच..!!!

तुमचे प्रेम तुम्हाला १००% मिळणारच करा हे अगदी सोप्पे उपाय पती पत्नीचे प्रेम कायम राहील अबाधित जाणुन घ्या या लाभदायी उपायांबद्दल..!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, प्रेम.. या नावातच किती मधुरता आहे ना..!! मग ते पती -पत्नीमधील प्रेम असो किंवा प्रियकर प्रेयसी यांच्यातील, प्रेम हे सर्वांना अबाधित राहावे असे वाटते. प्रेमात पडलेले मन खुप निरागस असते.

आपल्याला आपले खरे प्रेम मिळावे, आवडता जीवनसाथी मिळावा, तसेच मिळवलेले प्रेम असेच दिवसेंदिवस वाढत जावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. माणूस प्रेमाचा भुकेला असतो. ते प्रेम टिकविण्यासाठी तो जीवाचे रान करतो.

प्रेमात यश म्हणजे दोघांच्या नात्यातील गोडवा आणि एकमेकांप्रती असलेली भक्ती अबाधित राहणे होय. प्रेम ही निसर्गाने दिलेली एक अद्भुत भेट आहे आणि प्रत्येकाला प्रेमात यश मिळवायचे असते परंतु कधीकधी तुम्ही तुमच्या अथक प्रयत्नानंतरही प्रेमात अपयशी ठरता. तुमचा प्रियकर किंवा तुमची प्रेयसी तुमच्यापासून दूर जाते. अशावेळी सर्व काही तुमच्या हातातून निसटून जाते असे वाटते आणि तुम्ही निराश होऊ लागता.

आज असेच काही प्रभावी उपाय तुम्हाला सांगणार आहोत ज्याचा वापर करून तुमच्या प्रेमातील अडथळे दूर होतील आणि तुम्हाला हमखास यश मिळेल. तुमची सुखी संसाराची स्वप्न नक्किच पुर्ण होतील. तुमचा जोडीदार तुमच्यावर वेड्यासारखे प्रेम करेल. तुम्ही एकमेकांचा कधीच विश्वासघात करणार नाही, इतके प्रगल्भ प्रेम तुम्हाला मिळेल.

सफल आणि यशस्वी प्रेमासाठी करा हे सोप्पे सरळ उपाय –
1)‌ परस्पर प्रेम टिकवण्यासाठी, प्रेमींना शुक्रवारी आणि पौर्णिमेच्या दिवशी भेटणे आवश्यक आहे. हा दिवस प्रेमाची तीव्रता वाढवणारा आहे आणि या दिवशी भेटल्याने प्रेमींमधील प्रेम कमी होत नाही. तसेच प्रेमसंबंधात कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये, किंवा वाद निर्माण होऊ नयेत, तर त्यांनी अमावस्या किंवा शनिवारी भेटणे टाळावे.

2) शुक्रवारी सकाळी कृष्ण मंदिरात बासरी आणि तुळशीपत्र अर्पण केल्याने प्रेम सफल होते. श्री कृष्णाच्या आशीर्वादाने तुमच्या प्रेमाला दीर्घायुष्य लाभेल.

3) शुक्रवारी सकाळी श्री राधा-कृष्ण मंदिरात जावे. एक नारळ, लाल कापड आणि दक्षिणा घ्यावी. हे सर्व अर्पण करताना आपल्या मनातील इच्छा देवाला सांगावी आणि ह्या सर्व गोष्टी सात वेळा आपल्या वरून उतरवून श्री राधा कृष्णाच्या चरणी अर्पण कराव्या. यामुळे आपली मनोकामना अवश्य पुर्ण होईल. आपले प्रेम वृद्धिंगत होईल.

4) प्रेमळ जोडप्याची भेट शनिवारी आणि अमावस्येला होऊ नये. या दिवसांमध्ये भेटीमुळे, प्रेमळ जोडप्यामध्ये कोणत्याही विषयावर वाद होऊ शकतो. हे दोन्ही दिवस प्रेमींमध्ये भांडण आणि द्वेष निर्माण करतात. कदाचित तुम्ही एकमेकांशी ब्रेकअप कराल.

5) सोमवारी सकाळी शिव मंदिरात जल अर्पण केल्याने प्रेमात यश मिळते. प्रेमाच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतील. शिवपार्वती यांच्या कृपेने आपले वैवाहिक जीवन आनंदमय होईल.

6) प्रेमात यश मिळवण्यासाठी मुलाने पाचुची अंगठी घालावी, यामुळे प्रेयसीच्या मनात एक मजबूत प्रेमभावना निर्माण होते. तीचा तुमच्यावर जीवजडतो. ती तुमच्या शिवाय राहु शकत नाही.

7) जर तुम्हाला एखाद्याला आपले बनवायचे असेल तर दुर्गा मातेची पूजा करावी आणि लाल चूनरी अर्पण करावी आपल्या प्रेमाच्या यशासाठी प्रार्थना करावी.

वरील सर्व उपाय तुम्हाला तुमच्या प्रेमात यश मिळवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. या सगळ्या व्यतिरिक्त, तुम्ही शुक्राचे उपाय करावेत. कुंडलीत शुक्र ग्रह कमजोर असला तरी प्रेमात अडथळे येतात.

प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात मतभेद होण्याचे मुख्य कारण –
हे सर्व उपाय करण्याबरोबरच, आपण स्वतःच्या वागण्यात थोडासा बदल करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नेहमी स्वतःला सकारात्मक ठेवा. तुमच्या बोलण्यात गोडवा असूद्या. इतरांच्या मतांचा आदर करा. आपल्या रागावर ताबा ठेवा.

जरी तुम्ही काही कारणामुळे प्रेमात अपयशी ठरलात तरी निराश होऊ नका. आयुष्यात घडलेल्या वाईट गोष्टींचा विचार करण्यापेक्षा जीवनाला एक नवी दिशा देणे कधीही उत्तम असते. आपल्या जोडीदाराच्या मनाचा त्याच्या मतांचा आदर करा त्याच्यावर विश्वास ठेवा बघा आपले जीवन प्रेमाने भरभरून जाईल.

Leave a Comment