Saturday, June 10, 2023
Homeसामान्य ज्ञानप्रॉडक्ट खरेदी करताना पॅकिंग मध्ये आढळून येणाऱ्या या पाउच बद्दल माहिती आहे...

प्रॉडक्ट खरेदी करताना पॅकिंग मध्ये आढळून येणाऱ्या या पाउच बद्दल माहिती आहे का?

आपण जेव्हा एखादी नवीन बॅग किंवा पाण्याची बाटली खरेदी केली की, त्यात एक लहानशी पुडी कायमसोबत मिळते. मोबाईल किंवा इतर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स च्या पॅकिंग मध्ये सुद्धा ही पुडी आढळून यायची. मात्र, ही पुडी उघडू नका? किंवा ती लहान मुलांच्या हातात देऊ नका?, असं त्यावर कटाक्षाने लिहिलेलं असते.पूर्वी विशेष म्हणजे या मजकुरामुळेच या पुडीत नेमकं काय आहे याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांमध्ये निर्माण होते.

त्यामुळे ही पुडी फाडू नका, असं लिहिलेलं असतानादेखील काही जण ती उघडतात. ही पुडी उघडल्यानंतर त्यात पांढऱ्या किंवा पारदर्शक लहान लहान शाबुदाण्या सारखे दाणे किंवा खडे पाहायला मिळतात. हे दाणे नेमके कशाचे आहेत किंवा मग ते या नव्या वस्तुंच्या आता कशासाठी टाकतात हा नवा प्रश्न निर्माण होतो. तर हे लहान दाणे अत्यंत उपयोगाचे असून त्याला ‘सिलिका जेल पॉकेट’ असं म्हटलं जातं. आता हे ‘जेल पॉकेट’ नेमकं कशासाठी टाकतात आणि त्याचे फायदे काय हे जाणून घेऊयात.

१. जर बॅगमध्ये कुबट वास येत असेल तर त्यामध्ये सिलिका जेट पॉकेट ठेवावं. या पॉकेटमुळे बॅगेतील कुबट वास दूर होतो. त्यामुळे शक्यतो जीम बॅग किंवा शूजच्या बॅगमध्ये हे पॉकेट ठेवावं.

२. बऱ्याच वेळा अल्बम जुना झाला किंवा बंद करुन ठेवला असेल तर त्यावर हवेमुळे बुरशी चढते. अशा वेळी अल्बममध्ये सिलिका पॉकेट ठेवावं. त्यामुळे अल्बमवरील बुरशी दूर होते आणि एकमेकांना चिकटलेली पानेदेखील वेगळी होतात.

३. पुस्तके जुनी झाल्यावर त्यातून विशिष्ट प्रकारचा वास येतो. हा वास घालवण्यासाठी त्यामध्ये सिलिका पॉकेट ठेवावं.

४. सिलिका पॉकेटमध्ये आर्द्रता शोषून घेण्याची क्षमता असते. त्यामुळे मोबाईल किंवा फोनमध्ये पाणी गेलं असेल तर त्यावर सिलिका पॉकेट ठेवावं.

५. पावसात शूज भिजल्यानंतर त्याला कुबट वास येत असेल तर त्यात सिलिका पॉकेट ठेवावे. यामुळे शूजमधून येणारा खराब वास दूर होतो.
 

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स