पूजा करा अथवा नका करू पण या 4 सवयी जीवनात असतील तर.. गरिबी जवळ सुद्धा येत नाही.!!


नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. मित्रांनो आपण सारखी सारखी एखादी गोष्ट करत असतो, त्याला आपण सवयी म्हणतो. काही सवयी ह्या चांगल्या असतात तर काही सवयी ह्या वाईट असतात. आपल्या सवयीचा आपल्या आरोग्यावर, वर्तनावर, व्यवहार, आचरण आणि राहणीमान यावर तर प्रभाव पडतोच. पण त्याच बरोबर आपले भाग्य देखील यामुळे प्रभावी होत असते.

आपल्या सवयी चांगल्या असतील तर आपल्या जीवनात याचा सकारात्मक प्रभाव पडतो, याउलट आपल्या सवयी जर वाईट असतील तर त्याचा नकारात्मक प्रभाव आपल्यावर पडत असतो. आपण नेहमीच देवांची मनोभावे पूजा करत असतो व त्यांचा आशीर्वाद मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. पण आजकालच्या धावपळीच्या जीवनात आपण देवाची जास्त पूजा करू शकत नाही.

त्याच प्रमाणे सारखी पूजा आणि व्रते करूनच देव प्रसन्न होत नाहीत तर आपल्या प्रामाणिक आणि चांगल्या व्यवहारामुळे देव आपल्यावर जास्त प्रसन्न होतात. आज आम्ही तुम्हाला श्री कृष्ण यांनी सांगितलेल्या अश्या काही सवयी सांगणार आहे ज्या आत्मसात करून तुम्हाला भगवंताची कृपा मिळेल.

पहिली गोष्ट आहे, भगवंतापेक्षा मोठे काहीही नाही म्हणून सकाळी उठल्यानंतर आपल्या इष्ट देवतांचे नामस्मरण करावे. आपल्या कुटुंबावर आपल्या कुलदेवता यांचे आशीर्वाद असणे खूप महत्वाचे आहे. सकाळ संध्याकाळ आपल्या कुलदेवतेला नमस्कार नक्की करावा.

तुळशीसमोर आणि देवघरात दिवा आणि अगरबत्ती रोज लावावी. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या शास्त्रात असे सांगितले आहे की जोपर्यंत अंघोळ होत नाही तोपर्यंत स्वयंपाक घरात प्रवेश करू नये. गॅस वर काही बनवण्या पूर्वी अग्निदेवला व गॅस ला नमस्कार करावा. कधीही कोणाला वाईट बोलू नये. तसेच कोणाचा अपमान होऊ नये असेही कोणाला बोलू नये. घरातील व बाहेरच्या स्त्रियांचा मान ठेवावा. तसेच गरजू लोकांना मदत करावी.

आपण जर या सवयी आत्मसात केल्या तर भगवंताची कृपा आपल्यावर नक्कीच होते.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज रॉयल कारभार नक्की लाईक करा जेणे करून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद..!!