भारतीय संस्कृती मध्ये जवळ जवळ प्रत्येक घरात देवघर असतेच. आपला रोजचा नित्य नियम असतो देवांचं पूजन करुन त्यांना धूप आरती दाखवतो. पूजन झाल्यावर आपलं मन प्रसन्न तर होतेच, त्याबरोबर आपल्या घरात एक सकारात्मक ऊर्जेचं वातावरण तयार होत असतं. परंतु देवपूजा करण्याचे सुद्धा काही नियम आहेत. आपण पूजन करतांना या नियमानुसारच पूजन करायला हवे.
अन्यथा आपल्याला केलेल्या पूजनाचे योग्य फळ मिळत नाही. देव पूजा करण्याचे हे नियम किंवा प्रथा प्राचीन काळापासून चालत आलेल्या आहेत. हे सर्वच नियम धा’ र्मि क आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून अगदी सूचिबद्ध नमूद केलेले आहेत. म्हणून आपण देव पूजा करताना या सर्व नियमांचे योग्य ते पालन करणं खुप गरजेचे आहे.
देवपूजा करतांना घंटानादविषयीं तुम्ही ऐकलं असेलच. देवपूजेच्यावेळी आपण एका विशिष्ट प्रकारे घंटी वाजवतो या घंटी वाजविण्या संबंधीचे काही नियम शास्त्रात दिलेले आहेत. शास्त्रमध्ये पूजा करतांना घंटानाद करण्यासंबंधी खूप महत्त्वाचे काही नियम दिले गेले आहे. देवपूजेच्या दारम्यान घंटी वाजविण्याचे कोणते महत्व आहे ते पुढील श्लोकातून आपल्याला समजेल.
“आगमनर्थमं तू देवानाम गमनार्थमं तू राक्षसम
करू घंटे वरम नादम देवता स्थान आणि धो”
अर्थात.., घंटानाद केल्याने देवांचं आगमन होतं आणि नकारात्मक उर्जा व राक्षस दूर पाळून जातात. जो घंटानाद राक्षसांपासून आपले रक्षण करतो. चला तर मग आपण जाणून घेऊया देवपूजेदारम्यान घंटानाद करण्याचे कोणकोणते फायदे आहेत.
तसे घंटी वाजवताना कोणत्या चुका करण्याचं आपण टाळायचं असतं. समजा जर आपल्या देवघरातील घंटीकडे तुम्ही लक्षपूर्वक बघितले तर तिच्या वरच्या भागावर आपल्याला गरुडाची प्रतिमा कोरलेली दिसेल, साधारणतः भारतीय संस्कृतीमध्ये देवघरात जी घंटी आढळून येते तिला ‘गरुड घंटी’ असेही म्हणतात. देवतांचं पूजन करताना तिचा नाद करून देवांचं आवाहन केलं जातं.
अर्थात आपढ त्या घंटीच्या माध्यमातून तिच्या सुमधुर ध्वनीने देवांचं स्वागत केल्याचा आभास होतो. आपण देवांचं श्रद्धाभावनेने आणि विधिपूर्वक पूजन करतो. त्यावेळी आपण घंटानाद नक्कीच करतो. आपले पूजनाची सांगता झाल्यानंतर आरती करताना घंटनाद अवश्य करावा नाहीतर आपली आरती व पूजा अपूर्ण मानली जाते. बहुतेक वेळा आपण या गोष्टी कडे लक्ष देत नाहीत.
पूजन करताना घंटानाद करत नाहीत. शास्त्रामध्ये असे सांगितले आहे कि ज्यावेळी देवतांनी आपली सृष्टि निर्माण केली त्याचवेळी एक सर्वात मोठा आवाज झाला होता. तो आवाज घंटानाद सदृश्य होता. त्या घंटानादात ओंकारासारखा आभास होतो म्हणून घंटानादाला देवतांचा आवाजही मानतात. तसेच घंटीला पूजेमध्ये महत्त्वाचं स्थान आहे आणि म्हणूनच घंटीचा कधीही अनादर करू नयेत.
आपण ज्याप्रमाणे इतर देवी देवतांचे पूजन करतो तसेच घंटीचीही विधिवत पूजा करायला हवी. मगच पूजन करून घंटी वाजवावी. पूजन न करता घंटी तशीच वाजविणे अशुभ मानले जाते. आपण हे पाहीले असेलच पूजेच्या दरम्यान घंटानाद झाल्यानंतर संपूर्ण घरातील वातावरण त्या घंटानादासोबतच शुद्ध व पवित्र होत जाते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेची एक लहर पसरते.
आपण या पूजेच्या नियमांकडे लक्ष दिलं नाही तर हीच सकारात्मक ऊर्जा नकारात्मक ऊर्जेमध्ये परिवर्तीत होते. बहुतेक वेळा देवतांचे पूजन करताना फक्त आरतीच्या वेळीच घंटी वाजवतात, पण देवाला पाणी अर्पण करताना नैवेद्य दाखवतांना, स्नान घालताना, धूप-दीप लावताना घंटानाद जरूर करावा.
असं केल्याने आपण केलेलं पूजन पूर्ण व इष्ट मानलं जातं घंटी वाजवताना एखादा श्लोक मंत्र तथा आरती जरूर म्हणावी. तसेच भगवंताचे पूजन करताना सकाळ -संध्याकाळ घंटानाद जरूर करावा. तुम्हाला जर घरात नकारात्मक ऊर्जेचा भास होत असेल तर थोड्या वेळासाठी घंटानाद करावा असं केल्यामुळे आपल्या घरातील तथा आपल्या मनातील नकारात्मक ऊर्जा नाहीशा होऊन जातात.
टिप – या लेखातून दिलेली सर्व माहीती शास्त्राच्या आधारावर दिली आहे, यामागे कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरविण्याचा आमचा व आमच्या पेज चा उद्देश नाही. आपल्या संस्कृतीत समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी हे आपल्या पर्यंत पोहचविले जातात आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. आमचे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून जर कुणी करत असेल तर त्यासाठी वैयक्तिक ती व्यक्ती जबाबदार असेल.