Pushkraj Lucky Stone Importance कोणत्या राशीला आहे पुष्कराजचा रत्नाचा फायदा.? या राशींच्या जातकांनी चुकूनही वापरु नये पुष्कराज रत्न..

Pushkraj Lucky Stone Importance कोणत्या राशीला आहे पुष्कराजचा रत्नाचा फायदा.? या राशींच्या जातकांनी चुकूनही वापरु नये पुष्कराज रत्न..

नमस्कार मित्रांनो.. या आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचं मनापासून स्वागत आहे.. राशी आणि पत्रिकेनुसार नवरत्न धारण केल्यानं आयुष्यावर मोठा प्रभाव पडतो, असं ज्योतिषशास्त्र सांगतं. (Pushkraj Lucky Stone Importance) अनेकजण रत्न तर वापरतात. पण, त्यांना अपेक्षित फायदा होत नाही. ही निराशा टाळण्यासाठी ज्योतिषाच्या सल्ल्याशिवाय कोणतेही रत्न वापरु नये..

अशी माहिती डोंबिवलीतील गुरुजी ल.कृ. पारेकर यांनी दिली. एकूण 84 रत्न असून त्यामधील 9 महत्त्वाची आहेत. रत्न धारण केल्यानं अडचणी कमी होतात. त्यांची पारख कशी करावी याच्या महत्त्वाच्या टिप्स त्यांनी दिल्या आहेत.

हे सुद्धा पहा : Astrology Chandra Gochar 2023 ऑगस्ट महिन्यात चंद्र करणार 14 वेळा गोचर.. जाणून घ्या शुभ अशुभ योगांची स्थिती..

पुष्कराज कोणी घालू नये? मेष लग्नाच्या जातकाला पोवळा, पुष्कराज, पाचू आणि हिरा चालत नाही असे गुरुजी सांगतात. प्रत्येक रत्न वेगळं असून ते परिधान करण्याचे शास्त्र असल्याची माहिती ते देतात. (Pushkraj Lucky Stone Importance) वृषभ, कन्या, मकर आणि मिथुन या राशीच्या जातकाने हे रत्न वापरू नये.

पुष्कराज रत्नाचा फायदा कुणाला? पुष्कराज हे गुरूचे रत्न मानले जाते. या रत्नाला धारण केल्याने सुख समृध्दी मिळते. या रत्नामुळे मनाच्या शांती बरोबरच भविष्यात येणारी संकटे कमी होतात.

गुरु ग्रहामुळे विवाहात अडचण आली तर पुष्कराज रत्न धारण करण्यास सांगतात. त्याचबरोबर पोटाचे विकार असतील तर ते कमी होतात, अशी माहिती त्यांनी दिली.

अस्सल रत्न कसं ओळखावं? ‘रत्न चांगलं की वाईट हे फक्त सर्टिफिकेटमुळे ठरवू शकत नाही. (Pushkraj Lucky Stone Importance) सूर्यप्रकाशात रत्नाची पारख करावी.

हाताच्या स्पर्शानं तसंच डोळ्यांनी रत्नाची पारख करता येते. या रत्नावर कोणता डाग किंवा खड्डे आहेत का हे पाहावं. सरावानं रत्नाची पारख करता येते,’ अशी माहिती त्यांनी दिली.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!