पुत्र प्राप्तीसाठी या पुत्रदा एकादशीला करा हा खास विधी : जाणून घ्या मंत्र, मुहूर्त, वेळ..!!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, आपण आज श्रावण महिन्यात पडणाऱ्या पुत्रदा एकादशी या तिथी बद्दल जाणून घेणार आहोत. तसेच या दिवशीचे व्रत कशा पद्धतीने करायचे ते सुद्धा पाहणार आहोत. साधारणपणे एकादशीची तिथी प्रत्येक महिन्याला २ वेळेस येत असते. परंतु या श्रावण महिन्यात येणाऱ्या एकादशी या तिथीचे विशेष असे महत्व शास्त्रात सांगितलेले आहे.

या तिथीचे शुभ मुहूर्त पुढीलप्रमाणे आहेत –
पुत्रदा एकादशी एकादशी व्रत : १८ ऑगस्ट प्रारंभ : १८ ऑगस्ट रोजी सकाळी ०३ वाजून २० मिनिटे, आणि उपवास सोडण्यापूर्वी द्वादशीला सूर्योदय होण्यापूर्वी समाप्त होणार.

मित्रांनो, पुत्रदा एकादशीचा सण श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला साजरा केला जातो. यावेळी ही शुभ तारीख बुधवार, १८ ऑगस्ट रोजी आहे. तर पुत्रदा एकादशीला पुत्रा एकादशी असेही म्हटले जाते. पुत्रदा एकादशीबाबत पुराणात सांगितले आहे की, जो कुणी भक्त प्रामाणिक भक्ती आणि नियमांनी या एकादशीचे पालन करेल, त्याला जीवनातील सर्व पा पां पासून मुक्ती मिळेल आणि वैकुंठ धाम प्राप्त होणार. याचबरोबर त्या व्यक्तीला संतती आणि संपत्ती सुख आणि भरभराटी तथा आनंद मिळत असतो.

तसेच श्रावण महिन्यामध्ये हे एकादशी व्रत केल्याने कोणत्या प्रकारच्या अभिलाषेची सिद्धी प्राप्त होत असते. कोणत्या प्रकारे हे व्रत केल्याने तुमच्या मनोकामना सहज पूर्ण होऊन जातात. श्रावण महिना व्रत वैकल्य आणि उत्साहाचा महिना आहे. म्हणजे कृष्ण पक्ष प्रति पदेपासून शुक्ल पक्ष पौर्णिमेपर्यंत प्रत्येक दिवशी कोणते ना कोणते व्रत कोणते ना कोणते पर्व अवश्यच येत असते.

श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक दिवसाचे प्रत्येक क्षणाचे विशेष असे महत्व असते. या महिन्यात येणाऱ्या पुत्रदा एकादशीला तुमची श्री हरी विष्णूंची पूजा आराधना , उपासना करतो.अशी मान्यता आहे कि श्रावण महिन्यात भगवान श्री हरी विष्णूच्या केलेल्या पूजेमुळे मोठे फळ प्राप्त होते.

श्रावण शुक्ल पक्ष एकादशी तिथी ला पुत्रदा एकादशी व्रत असे सुद्धा म्हंटले जाते.या व्रताचे पौराणिक ग्रंथांमध्ये खूप विशेष महत्व सांगितले गेले आहे. पुत्रदा एकादशीचे व्रत केल्याने सुख संपत्ती ऐश्वर्य प्रसिद्धी यांच्या बरोबरच आज्ञाधारक अशा पुत्राची प्राप्ती होत असते.

श्रावण शुक्ल पक्ष एकादशीच्या दिवशी हे व्रत केले जाते. या वर्षी हि एकादशी १८ ऑगस्ट बुधवार च्या दिवशी आली आहे. हि पुत्रदा एकादशी वर्षातील २ महिन्यांमध्ये येते. एक असते ती श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये आणि दुसरी असते ती पौष महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये. पौष महिन्यातील येणाऱ्या एकादशीला सुद्धा पुत्रदा एकादशी असे म्हंटले जाते.

श्रावण महिन्यामध्ये तुम्ही महादेवाची पूजा करता , आराधना करता. तसेच भगवान श्री हरी विष्णूंचे जर तुम्ही पूजन केले तर त्याचे महत्व खूप असते. या पुत्रदा एकादशीच्या दिवशी शक्यतो पती आणि पत्नी दोघांनी हे व्रत करावे. विवाहित जोडप्यांची सुयोग्य संतान प्राप्तीसाठी तसेच मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी , मुलांना सौभाग्य प्राप्त होण्यासाठी आपण हे व्रत अवश्यच केले पाहिजे.

एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत करा किंवा नका करू या दिवशी तांदळाचे सेवन करू नये. या दिवशी सात्विक भोजन केले जाते. एकादशीच्या दिवशी श्री हरी विष्णूंची पूजा करताना तुळशीचा वापर अवश्य करावा. यामुळे मुलांशी निगडित सर्व समस्या समाप्त होतात. संध्याकाळी तुळशीला तुपाचा दिवा लावावा.

या उपायामुळे घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी भरभराटी नांदत असते. पुत्रदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना खिरीचा नैवेद्य दाखवावा. या उपायामुळे तुमच्या मुलांच्या रोजगार संदर्भात समस्या संपून जाऊन आर्थिक उत्पन्नाचे अनेक मार्ग मोकळे होतात. तुमच्ये जीवनामध्ये सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य यांची भरभराट होते.

जर का तुम्ही एखाद्या समस्येमध्ये अडकले असाल व त्यातून कसे बाहेर पडावे हे समझत नसेल तर पुत्रदा एकादशीच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी पिंपळाच्या झाडाला एक तांब्याभर शुद्ध जल अर्पण करावे आणि सोबत शुद्ध तुपाचा दिवा देखील लावावा. त्याचबरोबर पुत्रदा एकादशीच्या दिवशी पती पत्नीने सकाळी स्वतःची सर्व कामे आटपून भगवान श्री हरी श्री विष्णूंच्या प्रतिमेसमोर बसावे व विधिवत त्यांची पूजा करावी.

तसेच या दिवशी पुत्रदा एकादशीच्या महात्म्याचे वाचन करावे. त्यांनतर भगवान श्री हरी विष्णूच्या तुम्हाला माहित असलेल्या मंत्राचा एक माळ तरी जाप करावा. जर तुम्हाला कोणताच मंत्र माहित नसेल तर तुम्ही या मंत्राचा जप केला तरी चालेल – ओम नमो भागवतेय वासुदेवाय

पुत्रदा एकादशीचे पाळायचे नियम- मित्रांनो, ज्यांनी कुणी पुत्रदा एकादशीचे व्रत केलेले असणार त्यांनी लसूण, कांदा विरहित अन्न खायचे आहे. तसेच, मनाने आणि शब्दांच्या उचचाराने ब्रह्मचर्य पाळावयाचे आहे. दशमीपासून, द्वादशीपर्यंत भगवान श्री हरी श्री विष्णूंचे ध्यान करावे. व्यक्तीने एखाद्या दिवशी उपवास केला नाही, त्यांनी एकादशीच्या दिवशी तामसी अन्न खाण्याचे देखील वर्ज्य करावे.

याचबरोबर, खोटं बोलणे, अ नै ति क कृत्य करणे, राग-लो भ इत्यादी गोष्टींपासून अंतर ठेवायला हवे. एकादशीच्या दिवशी वैष्णव धर्माचे पालन करावे लागते, त्यामुळे वांगी, सुपारी, मां स-दा रू इत्यादी गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवा. या दिवशी चुकूनही कांस्याच्या भांड्यात अन्न खाऊ नये.

मित्रांनो, असे काही उपाय या दिवशी केल्याने मुले आज्ञाधारक बनतात , तसेच त्यांच्या मध्ये सकारात्मक बदल दिसून येतात. तर भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीच्या कृपेने अपत्याची प्राप्ती होते. या पुत्रदा एकादशीच्या अध्यत्मिकतेचे फार महत्व आहे. हे उपाय अगदी मनोभावे अवश्य करून पहा , तुमच्या सर्व आर्थिक समस्या दूर होतील , घरामध्ये दुःख दारिद्रय दूर होऊन सुख समृद्धी भरभराटी येईल.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

Leave a Comment