राखी बांधताना असतो या सात वस्तुंचा मान : औक्षणाच्या ताटामध्ये असायलाच हव्यात या सात वस्तु..!!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, रक्षाबंधनाच्या या पवित्र दिवशी बहिण आपल्या लाडक्या बंधूरायाला राखी बांधत असते. त्या धाग्यालाच रक्षा बंधन किंवा रक्षा सूत्र असेही म्हटले जाते या दिवशी भाऊ बहिणीला सदैव रक्षण तिचे करण्याचे, तिच्या अडचणीत तिच्या पाठीशी उभं राहण्याचं वचन आपल्या लाडक्या बहिणीला देत असतो.

श्रावण महिण्यात येणारा हा सण भाऊ-बहिणींचा म्हणून ओळखला जातो. हा दिवस बहीण-भावांचा अत्यंत आवडीचा असा दिवस आहे. लग्न झालेल्या बहिणी या दिवसाची आतुरतेने वाट बघत असतात. या पवित्र दिवशी सासरहून मुली माहेरी भावाला राखी बांधण्यासाठी येत असतात.

या सणासाठी राखी बांधायला येत असताना बहिण ताटामध्ये हळद-कुंकू, अक्षत, राखी, मिठाई, दिवा व पाण्याने भरलेला कळस, नारळ या सर्व सामग्री घेत असतात. हे ताट सजवून लाडक्या बंधूरायाला राखी बांधत असताना या सात वस्तू ताटामध्ये असणे तर अनिवार्य आहेच. त्याचबरोबर या सात वस्तू ताटामध्ये ठेवण्यामागे कोणते कारण आहे. या सात वस्तुंचे या पूजेत काय महत्त्व आहे. या बद्दलची सविस्तर माहिती आजच्या या लेखामध्ये आपण घेणार आहोत.

मित्रांनो, ज्यावेळेला बहीण आपल्या लाडक्या बंधूरायाला राखी बांधणार असते त्यावेळी ती प्रथम कुंकवाचा टिळा लावते. देवाशी निगडित आहे. त्यामुळे सूर्य देवाचा आशीर्वाद मिळतो. ज्यावेळी बहिण भावाला कुंकवाचा टिळा लावते. त्यावेळी ती देवांकडे अशी देखील प्रार्थना करते. की येणारे वर्ष माझ्या भावाला सुख-समृद्धीचे दे व येणाऱ्या वर्षात माझ्या भावाला सुख-समृद्धी, यश, किर्ती, सर्वकाही देवो अशी मनोमन प्रार्थना ती सूर्यदेवाकडे करत असते.

तसेच आपण आता त्या सात वस्तुंचे महत्व बघणार आहोत. हे तांदूळ म्हणजेच अक्षता कोणत्याही पूजेमध्ये तांदूळाच्या दाण्यांना अतिशय शुभ मानले आहे. तांदळाच्या शिवाय कोणतीही पूजा पूर्ण होत नाही. बहिण आपल्या भावाला कुंकवाचा टिळा लावते.

त्यावर तांदूळ लावते हे शुक्र ग्रहाची निगडित आहे. व शुक्र ग्रह जवळ अशी प्रार्थना करते. की माझ्या भावाजवळ सर्व प्रकारची शुभदा व पवित्रता यावी अशी प्रार्थना ती या क्षणाला करत असते. व माझ्या आणि माझ्या भावाचे सं बं ध असेच कायम स्नेहाचे राहू देत अशी प्रार्थना ती मनोमन करते.

आता आपण नारळाबद्दल माहिती बघू, नारळाला या पूजेमध्ये स्वीकार म्हटले आहे. बहिण भावाला राखी बांधून झाल्यानंतर भावाला नारळ देत असते. त्यावेळी ती अशी प्रार्थना करते. की येणाऱ्या वर्षामध्ये माझ्या भावाला सर्व काही मिळू देत. मित्रांनो, नारळ हे राहु ग्रहाशी संबंधित आहे.

तसेच राखी किंवा रक्षा सूत्र राखी नेहमीच उजव्या हाताच्या मनगटावर बांधली जाते. ही मंगळ ग्रहाची निगडित आहे याचा अर्थ असा होतो. की बहिणीचे तिच्या भावाने प्रत्येक संकटामध्ये प्रत्यक्षरीत्या किंवा अप्रत्यक्षरीत्या नेहमी संरक्षण करावे.

तसेच राखी बांधून झाल्यानंतर बहिण-भावाला मिठाई भरवत असते त्याचा सं बं ध गुरु ग्रहाशी येतो. म्हणून भावाचं तोंड गोड केलं जातं याचा अर्थ असा होतो. बहिण म्हणते की माझ्या भावावर देवी लक्ष्मीची सदैव कृपा असावी त्याचबरोबर आपल्या बंधूरायाचे वैवाहिक जीवन देखील आनंदाचे राहावे. अशी प्रार्थना ती मनोमन करते व येणाऱ्या पुढच्या दिवसांत त्याच्या घरातील सर्व कार्य निर्विघ्नंपणे पार पडावीत अशी कामना करते.

तसेच दिवा म्हणजेच आरती राखी बांधून झाल्यानंतर बहीण आपल्या भावाला आरती ओवाळते याचा सं बं ध शनी व केतू या दोन ग्रहांशी आहे. त्यावेळी बहीण अशी प्रार्थना करते की माझ्या भावावर येणारे कोणतेही संकट दूर व्हावेत त्याला कसल्याही प्रकारचा त्रास होऊ नये.

यावेळी पाण्याने भरलेल्या कळसाने भावाची पूजा करते. पाण्याने भरलेला कळस हा चंद्राशी संबंधित आहे ही पुजा करत असताना बहीण अशी प्रार्थना करते. की माझ्या भावाच्या जीवनात सदैव शांतता राहावी, त्याला कसल्याही प्रकारचा त्रास होऊ नये. तो सुखी-समाधानी राहावा अशी प्रार्थना बहिण आपल्या बंधूरायासाठी करत असते.

या दिवशी बहिणीने राखी बांधून झाल्यानंतर झाल्यानंतर बंधूराज तिला काही भेटवस्तू देत असतो शक्यतोवर या पवित्र दिवसाला बहिणीला साडी भेट म्हणून देण्याची प्रथा आहे. असे केल्याने आपला बुध ग्रह जो आहे तो कारक होत असतो. बुध ग्रहाशी संबंधित सर्व अडचणी व त्रास दूर होतो.

असेही म्हटले जाते की बुध ग्रह हा व्यापाराशी संबंधित ग्रह असल्याने अशा प्रकारे जर आपल्या बहिणीचे आशीर्वाद मिळाले तर आपल्या भावाच्या व्यापारामध्ये वृद्धी होत असते. यासाठी कधीही बहिणीला नाराज न करता तिला भेटवस्तू देऊन तिचे आशीर्वाद सदैव आपण घ्यायला हवेत. जेणेकरून आपल्या व्यापार व व्यवसायात सदैव प्रगती होत राहाणर.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

Leave a Comment