रंकाचाही होणार राजा : जर घरात या ठिकाणी.. या योग्य दिशेला कासवं ठेवलेलं असेल तर..!!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर…!! मित्रांनो, असे अनेक प्रकारचे शोपीस फेंगशुईमध्ये सांगितलेले आहेत, जे घरात ठेवून सर्व समस्यांपासून सुटका मिळत असते. असाच एक शो-पीस म्हणजे कासव.

फेंग शुई कासवं बाजारात वेगवेगळ्या धातूंमध्ये सहज मिळतात. त्यापैकी पितळ आणि क्रिस्टल पासून बनवलेले कासव प्रमुख मानले गेलेले आहेत. जाणून घ्या फेंग शुई नुसार कासवं घरात ठेवल्याने काय फायदे होऊ शकतात ते आपण आज बघणार आहोत.

भारतीय हिंदू धर्म शास्त्रात कासव हा भगवान विष्णूचा अवतार मानला जातो. घरात धातूचे कासव ठेवणे किंवा त्याचे चित्र भिंतीवर लावणे शुभ आहे. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येत असते आणि वास्तु दोष देखील दूर होतात. सनातन धर्मात कासवाला ‘कूर्म’ अवतार अर्थात कच्छप अवतार असे संबोधले जाते.

त्यांच्या दशावतारातून ‘कूर्म’ म्हणजेच कासव या कासवाला विष्णूचा दुसरा अवतार मानले जाते. पद्म पुराणानुसार, कच्छपच्या अवतारात भगवान विष्णूंनी क्षीरसागरामध्ये समुद्र मंथनाच्या वेळी मंदार पर्वताला आपल्या चिलखतीवर धरुन ठेवले होते.

अशाप्रकारे भगवान विष्णू, मंदार पर्वत आणि शेषनाग यांच्या कच्छप अवतारांच्या मदतीने देव आणि असुरांनी महामंथन करून चौदा रत्ने मिळवली. भगवान विष्णूच्या ‘कूर्म’ अवताराचीही पूजा केली जाते. कासवाला हिंदू धर्मात शुभ मानले जाते. घरामध्ये धातूचा कासव ठेवल्याने अनेक समस्या सुटण्यासाठी मदत होत असते.

(1) वास्तुनुसार, फेंग शुई कासव उत्तर दिशेला ठेवल्याने शत्रूंचा नाश होतो, संपत्तीत वाढ होते. कुटुंबातील सदस्यांनाही संरक्षण मिळते. कुटुंबप्रमुखांना दीर्घायुष्य लाभते.

(2) जर तुम्ही व्यापारी असाल तर तुमच्या दुकानाच्या किंवा कार्यालयाच्या मुख्य दरवाजावर कासवाचे चित्र लावा. असे केल्याने, धनप्राप्ती होते आणि व्यवसायात यश मिळते, रखडलेले काम लवकर होऊ लागते.

(3) घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कासवाचे चित्र लावल्याने कुटुंबात शांती राहते. हे घरातून त्रास आणि नकारात्मक गोष्टी दूर करते. घरातील नकारात्मक ऊर्जाही दूर होते.

(4) बऱ्याचदा घरातील एखादा सदस्य खूप आजारी असतो, मग घराच्या दक्षिण-पूर्व दिशेला कासवाचे चित्र लावा. यामुळे तुमची समस्या सुटू शकते.

(5) कासव कोणत्याही धातू, काच, चिकणमाती, क्रिस्टल किंवा लाकडाचा असावा. घरात ठेवल्याने जीवनात शांती, दीर्घायुष्य आणि पैसा येतो.

(6) मातीपासून बनवलेले कासव नेहमी घर किंवा कार्यालयाच्या ईशान्य किंवा दक्षिण-पश्चिम दिशेला ठेवावे, असे केल्याने उत्तम परिणाम मिळतो.

(7) जर कासव लाकडाचा बनलेला असेल तर तो पूर्व किंवा दक्षिण-पूर्व दिशेला ठेवावा.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

Leave a Comment