रात्री झोपताना चुकूनही जवळ ठेवू नका ‘ही’ वस्तू : असे केल्याने साक्षात मृत्यूला मिळते आमंत्रण..!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर…!! मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ते झोपताना चुकून पण आपण आपल्या जवळ कोणत्या वस्तू ठेवू नये. झोपी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे.

तुमच्याकडे किती सुद्धा पैसे असू द्या मात्र जर तुम्हाला सुखाची झोप लागली नाही तर या पैशांचा काहीही उपयोग नाही. आपल्यापेक्षा तो गरीब व्यक्ती जास्त श्रेष्ठ आहे की त्याला अंग टाकल्याबरोबर झोप लागते.

मित्रांनो आपण जर झोपताना आपल्या जवळपास जर कोणत्या वस्तू ठेवल्या तर त्या वस्तूंचा निगेटिव्ह इफेक्ट आपल्यावर होऊ शकतो. म्हणून या दहा वस्तू आपल्या जवळ ठेवू नका.

मित्रांनो पहिली गोष्ट पाणी. पाण्याचा थेट संबंध हा चंद्राशी आहे. म्हणून आपण झोपताना आपल्या डोक्याजवळ किंवा कोठेही पाणी ठेवू नका. पाण्याने भरलेला ग्लास किंवा पाण्याने भरलेले बॉटल आपल्या जवळपास ठेवू नये. जर आपण ही चुकी कराल तर आपल्याला मानसिक रोग होऊ शकतात. आपली मानसिक स्थिती बिघडू शकते.

मित्रांनो दुसरी गोष्ट बरेच जणांना आपल्या पैशाचं पाकीट म्हणजेच वॉलेट ती जवळ ठेवून झोपण्याची सवय असते. असं केल्याने अनावश्यक गोष्टींसाठी आपण खर्च करू लागतो. त्यामुळे खर्च वाढतो आणि पैशांची हानी होते. म्हणून आपण ही चूक करणे टाळा.

मित्रांनो तिसरी गोष्ट बऱ्याच जणांकडे अनेक चाव्या असतात किल्ल्या असतात. मित्रांनो या ज्या चाव्या आहेत. त्या तुमच्या वाहनांच्या असतील, तुमच्या दुकानाच्या असतील, ऑफिसच्या असतील किंवा तुमच्या घरातील तिजोरीच्या असतील.

लोखंडाची सोडून आपण इतर कोणत्याही धातूची चावी आपल्या जवळ ठेवून झोपू नये. असं केल्याने घरामध्ये, दुकानांमध्ये, ऑफिसमध्ये चोरी होण्याची शक्यता दाट वाढते. आणि म्हणून ही चूक करू नका.

मित्रांनो पुढची गोष्ट झोपताना आपल्या शरीरावरती दागिने असले तर चालतील. सोन्याची व चांदीचे दागिने चालतील. पण आपण ते दागिने काढून आपल्या ऊशाखाली ठेवून झोपू नका असे केल्याने आपले जे भाग्य आहे आपलं जे नशीब आहे ते कमजोर बनत. दुर्भाग्य आपल्या नशिबावरती सवार होतं.

मित्रांनो पुढची गोष्ट झोपताना बऱ्याच जणांना वर्तमानपत्र किंवा पुस्तके डोक्याखाली घेऊन झोपायची सवय असते. किंवा आपल्या ऊशाखाली ही पुस्तके घेत असतात. मित्रांनो असं करू नका याने आपल्या बौद्धिकतेवरती नकारात्मक प्रभाव पडू शकतो.

तर बऱ्याच जणांना मोबाईल आपल्या जवळपास ठेवण्याची सवय असते. मित्रांनो विज्ञानाने सुद्धा हे मान्य केले आहे की जे लोक मोबाईल किंवा अन्य प्रकारचे गॅजेट्स आपल्याजवळ ठेवून झोपतात. त्यांच्या आरोग्यावर खूप नकारात्मक प्रभाव पडतो.

मित्रांनो तुम्ही अशा बेडवरती झोपलेला आहात की ज्या बेडखाली तुमच्या चपला आणि बुटे तुम्ही ठेवलेले आहेत किंवा तुमच्या झोपण्याच्या जवळ चप्पल किंवा बूट असतील तर असं करू नका कारण ही चूक केल्याने आपल्या आरोग्यविषयक अधिक समस्या निर्माण होतात. आपलं आरोग्य बिघडू शकते.

बरेच जण झोपताना झाडू उशाशी ठेवून झोपतात. जे लोक अशी चूक करतील त्यांच्या घरा मध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो आणि मग धन हानी होते. त्या घरामध्ये पैसा टिकत नाही. म्हणजे अशा लोकांची कुटुंबीय म्हणजे त्यांचे नातेवाईक त्यांच्यापासून सुद्धा दुरावा निर्माण होतो. नशीब सुद्धा अशा लोकांना साथ देत नाही.

मित्रांनो पुढची गोष्ट आहे मीठ. जे लोक आपल्या डोक्याजवळ मीठ ठेवून झोपतात त्या कुटुंबामध्ये सातत्याने वाद-विवाद होत राहतात किंबहुना तुम्हाला सातत्याने भांडणे झालेली द्वेष निर्माण झालेले दिसून येतील.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!

Leave a Comment