नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत रविवारच्या दिवशी करावयाचे काही खास असे उपाय.. मित्रांनो, रविवारच्या दिवशी जर काही विशेष उपाय करण्यात आले तर आपल्या घरात सुख शांती नांदते तसेच सकारात्मक वातावरण देखील कायम राहते. रविवारच्या दिवशी हे उपाय केल्याने घरातील नकारात्मकता दूर होऊन घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते.
मित्रांनो, हे उपाय अगदी सोपे व सरळ आहेत. हे सर्वच उपाय आपण कमीत कमी वस्तुंच्या मदतीने देखील अंमलात आणू शकतात. हे फारसे खर्चिक सुद्धा नाहीयेत. जर कधी दर रविवारी आपण हे उपाय कराल तर माता लक्ष्मींची आपल्यावर कृपादृष्टी होईल व आपल्या त्यांचे वास्तव्य आपल्या घरात दिर्घकाळासाठी स्थिर राहील.
पण एक लक्षात असू द्या मित्रांनो की हा उपाय करताना आपल्या मनात पूर्ण श्रद्धा आणि भक्ती असली पाहिजे. जर मनात कोणताही वाईट विचार येऊ लागला तर मग त्या उपायाचा योग्य तो लाभ होत नाही. तसे झाल्यास मग तो उपाय आपण तसाच अर्धवट सोडून द्यायला हवा..
चला तर मित्रांनो, आता आपण हे उपाय कसे करावेत त्या बद्दल जाणून घेऊयात. रविवारच्या दिवशी कोणते उपाय करायचे आहेत ज्यामुळे आपल्याला खूप लाभ होणार आहेत. ते आता आपण पुढीलप्रमाणे बघणार आहोत.
मित्रांनो, जर आपण रविवारच्या दिवशी घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये कपूर जाळून त्याचा धूर करायला पाहिजे. असे केल्याने घरात वास्तव्य केलेल्या नकारात्मक शक्तींचा नाश होत असतो. या उपामुळे घरात प्रसन्न वातावरण तयार होण्यासाठी मदत होत असते.
तसेच रविवारच्या दिवशी पाण्यात एक छोटी वाटी घेऊन वाटीभर मीठ पाण्यात टाकून संपूर्ण घरामध्ये ते पाणी शिंपले पाहिजे. त्याचबरोबर पाण्यात वाटीभर मीठ टाकून संपूर्ण घर तुम्ही पुसून घेऊ शकता. मित्रांनो, मीठामध्ये नकारात्मक शक्तींना नाश करण्याची शक्ती असते, त्यामुळे मीठ ही एक खूप महत्त्वपूर्ण अशी वस्तू आहे.
या मीठामध्ये असे काही तत्वं असतात ज्यामुळे नकारात्मक शक्तींचा नाश करण्यासाठी मदत होत असते. मित्रांनो, ज्या ठिकाणी नीटनेटकेपणा, स्वच्छता असते अशाच ठिकाणी सकारात्मक उर्जा देखील असते. आणि सकारात्मक उर्जा जेथे असते त्याठिकाणी माता लक्ष्मींचे वास्तव्य स्थिर असते.
मित्रांनो, पुराणातील कथेनुसार जर रविवारच्या दिवशी तुम्ही कुठून बाहेरून घरात येतांना काही तरी खाद्य पदार्थात अवश्य घेऊन यावे. असे केल्याने अन्नपूर्णा माता आपल्यावर प्रसन्न होतात. मित्रांनो, या उपायाने घरातील धनधान्याच्या संग्रहात कधीही तुम्हाला क’मतरता भासणार नाही.
तसेच या उपाया मुळे माता महालक्ष्मींची कृपा देखील आपल्यावर होत असते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा उपाय करत असतांना आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा छल किंवा कपट तसेच स्वार्थाची भावना चुकूनही यायला नको.
अन्यथा आपण करत असलेले उपाय उपयुक्त ठरत नाहीत. हे उपाय करत असतांना.. आपल्या मनात श्रद्धा, भक्ती, तसेच खरी आस्था असली पाहिजे. त्याच्यापुढे असे वास्तुशास्त्राचे धार्मिक उपाय काम करत असतात.
टीप- येथे दिलेली सर्व माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.
मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक करा,शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!