Thursday, June 8, 2023
Homeजरा हटकेरविवारी चुकूनही करू नका ह्या १० गोष्टी : भगवान सूर्यदेव होतात नाराज..!!!

रविवारी चुकूनही करू नका ह्या १० गोष्टी : भगवान सूर्यदेव होतात नाराज..!!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.. हिंदू धर्मात सूर्य देव यांना पंचदेवांपैकी एक महत्वाचे देव मानले जाते. तर ज्योतिषशास्त्रात त्यांना ग्रहांचा राजा मानले जाते. त्यांना जगाचा आत्मा देखील मानले जाते.

असे मानले जाते की आठवड्यातील प्रत्येक दिवस हा वेगवेगळ्या देवतांच्या पुजेचा शुभ दिवसठरलेला असतो. त्या त्या दिवशी त्या विशिष्ट देवतांची पुजा करावी.

आठवड्यातील या निश्चित दिवसांमध्ये, सोमवार भगवान शिवचा दिवस मानला जातो. त्याच वेळी, मंगळवार ते रविवार, दररोज एका विशिष्ट देवतेची पूजा केली जाते. त्याच वेळी, असे काही दिवस असतात जेव्हा एका दिवसात 2-3 किंवा अधिक देवांची पूजा केली जाते.

जसे रविवारी (रवि म्हणजे सूर्य) रविवारी सूर्य देवाचा दिवस मानला जातो. या दिवशी भगवान सूर्य नारायण यांची पूजा केली जाते. ज्योतिषशास्त्रात सूर्याला आपल्या प्रगतीचे, यशाचे, सन्मानाचे प्रतिक मानले गेले आहे. तुमच्या अपमानाचे कारण देखील सूर्यदेव होऊ शकतात. जर त्यांची यथासांग पूजा केली नाही तर.

रविवारी काही कार्य असे आहेत जे केले असता सूर्यदेव नाराज होऊन तुमच्यावर संकट ओढवू शकते. असे मानले जाते की जर तुम्हाला सूर्यदेवाला प्रसन्न करायचे असेल तर या दिवशी या गोष्टी टाळा, अन्यथा भगवान सूर्यदेव क्रोधित होतात. तुमचा प्रगतीत अडथळा येऊ शकतो.

रविवारी चुकूनही ही कामे अजिबात करू नये –

1) रविवारी मीठ खाऊ नये. मिठाचा व्यक्तीच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. त्याचबरोबर कामात अडथळे येतात.

2) रविवारी चुकूनही कोणत्याही गरीब, गरजू लोकांचा अपमान करू नये. तसेच आपल्या आईवडिलांचा देखिल अपमान करू नये. कारण असे मानले जाते की या दिवशी केलेली ही एक चूक एखाद्या व्यक्तीच्या सर्व चांगल्या कर्मांचा नाश करते आणि त्यामुळे आपल्याला मोठया संकटांना सामोरे जावे लागते. सूर्यदेव क्रोधित होतात आणि आपल्या प्रगती खुंटते. आपली दुर्दशा होते.

3) चुकूनही दूध करपू देऊ नये. यामुळे सूर्यनारायण रागावतात.

4) रविवारी उशिरापर्यंत झोपू नये. असे मानले जाते की या दिवशी उशिरा उठल्याने भाग्यातील सूर्य कमकुवत होतो. आपल्या भविष्यात अंधकार निर्माण होतो. आपण दिशाहीन होऊन जातो. कोणताही निर्णय घेण्यात असफल ठरतो.

5) तांब्यापासून बनवलेल्या वस्तू रविवारी विकू नयेत. तांब्याव्यतिरिक्त इतर धातू किंवा सूर्याशी संबंधित धातू या दिवशी विकू नका.

6) रविवारी पश्चिम आणि वायव्य दिशेला प्रवास करू नये. जर या दिशांना प्रवास करणे आवश्यक असेल तर रविवारी लापशी, तूप किंवा पान खाल्ल्यानंतर किंवा पाच पावले मागे येऊन नंतर या दिशेने जावे. कारण या दिवशी विशेषतः पश्चिमेकडे यात्रा करणे अशुभ मानले जाते.

7) या दिवशी निळा, काळा आणि राखाडी रंगांचे कपडे घालू नये. शक्य असल्यास, या दिवशी चप्पल देखील घालू नये.

8) रविवारी संयमित जीवन जगले पाहिजे आणि या दिवशी मांस आणि मद्य सेवन करणे देखील अशुभ मानले जाते. यासोबतच शनीदेवाशी संबंधित पदार्थांचे सेवन देखील या दिवशी अशुभ मानले जाते.

9) रविवारच्या दिवशी तेल मालिश देखील करू नये, कारण हा सूर्याचा दिवस आहे आणि तेल शनीचे प्रतीक आहे.

10)लोक सहसा रविवारी केस कापतात, परंतु असे मानले जाते की या दिवशी केस कापल्याने आपल्या कुंडलीतील सूर्य कमकुवत होतो आणि आपल्या जीवनावर त्याचा वाईट परिणाम होतो.

तर मित्रांनो, सूर्यदेव आपल्यावर कायम प्रसन्न राहावे असे वाटत असेल तर ह्या चुका करणे टाळाआणि बघा जादू. सूर्यदेव करतील तुमचा भाग्योदय. तुमचे नशीब यशाच्या शिखरावर नेऊन ठेवतील सूर्यदेव.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स