नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो अनेक लोक भाड्याच्या घरात राहतात. या भाड्याच्या घरात जर वास्तू दोष असेल तर तो कसा दूर करावा. हे अनेकांना समजत नाही. कारण घराची तोडफोड किंवा चेंजेस करता येत नाहीत आणि वास्तू दोष तर दूर करायचं आहे त्यासाठी आम्ही काही टिप्स सांगत आहोत.
भाडेकरु नी केल्यास वास्तू दोष दूर होऊन सुख, समृध्दी, धन संपत्ती येईल. पहिली गोष्ट म्हणजे आपल जे कुलदैवत आहे किंवा इष्ट देव आहे त्यांचे स्मरण रोज करायचे आहे. काहीजणांना आपल कुलदैवत माहीत नसते आपल्या देवघरात आपले विचार कुलदैवत किंवा इष्ट देव असेल पाहिजे.
आणि कुलदैवत वास्तू दोष दूर करण्यासाठी जाणून घ्या त्यांची पूजा करा. रोज पूजा करणं शक्य नसेल तर नामस्मरण तरी अवश्य करायला हवे. सायंकाळी आपल्या दरवाज्याजवळ तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे.
गायीचं तुपाचा दिवा लावू शकता किंवा नसेल तर मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा किंवा कोणत्याही तेलाचा दिवा लाऊ शकता. हा दिवा जर तुम्ही घरात उभे आहात. तर तुमच्या डाव्या बाजूला आणि जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर उभे असाल तेव्हा तुमच्या उजव्या हाता ला अशा प्रकारे सायंकाळी आपल्या घराच्या बाहेर दिवा लावायचा आहे.
आपल्या दरातील तुळशी जवळ आपण तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावला तर वास्तू दोष कमी होऊ शकतो. असा दिवा लावल्यावर ”ओम नमो भगवते वासू देवाय” या महा मंत्राचा जप करायचा आहे. आणि आपल्या घराच्या ईशान्य दिशेला अडगळ ठेऊ नका.
हा कोपरा जास्तीत जास्त मोकळा असावा. या ठिकाणी देवघर असेल तर अती उत्तम. ईशान्य दिशा हा देवाचा कोपरा आहे. नैऋत्य दिशेला जड वस्तू ठेवाव्यात. कामीत कमी हा कोपरा रिकामा राहणार नाही याची काळजी घ्यावी. नैऋत्य दिशेला मेकअप म्हणजे शृंगार करावा.
शास्त्रानुसार आग्नेय दिशेला स्वयंपाक घर असावे.दक्षिणेकडे पाय करून झोपू नये. अनेक दोष निर्माण होतात. घरासमोर सांडपाणी वाहत असेल तर त्याच्यावर झाकण असावे. घरासमोर कचरा नसावा त्यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते. वास्तू दोष वाढतो.
तिजोरीच्या तोंड हे उत्तरेकडे उघडणारे असावे. घरात जेवण करताना आपल तोंड पूर्वेला, उत्तरेला किंवा पश्चिमेला असावं ते दक्षिणेकडे नसावं. घरात जो कमावणारा व्यक्ती आहे त्याच्या राशीनुसार घराचे पडदे असावे.
सजावटीचा रंग असावा. वास्तू दोष दूर होऊन धन प्राप्त होते. पाणी पिताना घरातील प्रत्येक व्यक्तीने पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून पाणी प्यावे. भाड्याच्या घरात राहून हे उपाय केल्यास वास्तू दोष नक्की कमी होईल.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!