नाभीला तेल लावण्याचे बरेच फायदे आहेत. यामुळे केवळ निरोगी आणि सुंदर त्वचा नाही मिळत तर त्याचे आरोग्यासाठी देखील अनेक फायदे आहेत. वेगवेगळ्या तेलांमध्ये अँटी-बॅक्टेरियाचे गुणधर्म आढळत असतात.
मोहरीचे तेल –
नाभीमध्ये मोहरीचं तेल लावल्याने गुडघेदुखी आणि संधिवातामध्ये देखील आराम मिळतो. झोपण्याच्या आधी नाभीमध्ये मोहरीच्या तेलाचे दोन थेंब नियमितपणे टाका, असे केल्याने तुम्हाला सांधेदुखीच्या समस्येपासून आराम मिळतो.
नाभीला तेल लावण्याचे फायदे –
रात्री नाभीला तेल लावल्यास तुमची त्वचा कोरडी आणि शुष्क राहणार नाही. मोहरीच्या तेलामुळे तुमच्या त्वचेला मॉइश्चरायझर मिळेल. त्वचेला नितळ आणि गोरे करण्यासाठी आपल्या नाभीवर मोहरीचे तेल नियमितपणे लावायला हवे.
आणि हलक्या हातांनी मालिश सुद्धा करावी, आपल्या त्वचेला मॉइश्चराइझ करण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. यामुळे तुमची त्वचा मऊ होते आणि त्वचेचा कोरडेपणा देखील संपतो.
मोहरीच्या तेलाचे इतरही अनेक फायदे –
चेहऱ्यावरील डाग आणि खिळ, मुरुमांपासून आराम देते. जर तुम्ही चेहऱ्यावरील मुरुमांमुळे त्रस्त असाल तर नाभीमध्ये मोहरी चे तेल लावल्यास आराम मिळू शकेल.
त्वचेची पत सुधारते – नाभीसाठी तेल खूप फायदेशीर असते, यामुळे तुमची त्वचा चमकदार बनते.
फाटलेल्या ओठांपासून मुक्तता मिळते. त्वचेला मॉइश्चराइझ करण्याचा आणि ओठांना मऊ आणि कोमल ठेवण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे रात्री नाभीवर मोहरीचे तेल लावणे.
सांधेदुखीपासून मिळेल आराम, झोपायच्या आधी नाभीमध्ये मोहरीच्या तेलाचे दोन थेंब नियमितपणे ठेवा, असे केल्याने तुम्हाला सांधेदुखीच्या दुखण्यापासून मुक्तता मिळते.
संसर्गाची होण्यापासून वाचवते , नाभीमध्ये मैल जमा झाल्यामुळे तेथे बॅक्टेरिया साचतात, ज्यामुळे संसर्गाची समस्या उद्भवू शकते.
शरीरात कोठेतरी दुखापत झाल्यास जखम झाल्यास संसर्ग होण्याचा धोकाही वाढतो. अशा स्थितीत आपण नाभीमध्ये मोहरीच्या तेलाचे थेंब टाकू शकतात.