रोज रात्री झोपण्यापूर्वी गरम दुध आणि गुळ प्या आणि स्वतःला निरोगी ठेवा


मित्रांनो आज आपण दुध आणि सेंद्रिय गुळ या दोन्हीं च्या सेवनाचे चमत्कारिक फायदे जाणून घेऊयात.
दूध हे पूर्णअन्न समजले जाते. रात्री किंवा अवेळी लागलेल्या भूकेवर नियंत्रण मिळवण्यासाठी ते फायदेशीर समजले जाते. निद्रानाशाच्या समस्येवर परिणामकारक असल्याने अनेकजण झोपण्यापूर्वी ग्लासभर दुध पितात. मात्र नुसतेच दूध पिणं शक्य नसलेले अनेकजण त्यामध्ये गोडवा निर्माण करण्यासाठी साखर मिसळतात. मात्र रिफाईन्ड साखर आरोग्याला अपायाकारक असल्याने त्याला नैसर्गिक पर्याय असणार्‍या गूळाचा आरोग्याला अनेकप्रकारे फायदेशीर ठरते.

रिकाम्या पोटी गुळ खाणे आणि कोमट पाणी पिल्याने गॅस, आंबटपणा, पोटदुखी, बद्धकोष्ठता इत्यादी समस्या दूर होतात. जर सकाळी आपले पोट चांगले साफ होत नसते तर याचे सेवन करण्यास सुरवात करा. .

थंडीच्या दिवसांत गूळ खाणे सर्वाना आवडते. कारण गुळात गर्मी जास्त असते. गूळ खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते. पोटाच्या सर्व विकारांवर गूळ अत्यंत फायदेशीर आणि गुणकारी आहे. आयुर्वेदानुसार गुळातील तत्त्वांमुळे शरीरातील अ‍ॅसिड नाश पावते. रोज गूळ खाल्ल्याने तुमचे स्वास्थ्य उत्तम राहते. आज आम्ही तुम्हाला गुळाचे असे फायदे सांगणार आहोत जे तुम्ही या आधी कधीच ऐकले नसतील. जर तुम्ही लागोपाठ सात दिवस गूळ खाल्ला तर अशी कमाल होईल की तुम्ही याचा कधी विचारही नसेल केला.

फायदेशीर गूळ – गूळामध्ये मिनरल्स आणि आयर्न घटक मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे शरीरात रक्ताची निर्मिती होणं, मांसपेशी मजबूत होणं, सांध्याचे दुखणे आटोक्यात राहण्यास मदात होते.

दूधात गूळ मिसळल्याचे फायदे – दूधात गूळ मिसळून प्यायल्याने पचन सुधारते. पचनाशीसंबंधी काही समस्या असल्यास दूर होतात. सोबतन अन्न पचनाच्या क्रियेला चालना मिळते. दूध-गूळाच्या मिश्रणामुळे पोटात गॅस निर्माण होण्याची शक्यता कमी होते.

अस्थमाच्या रूग्णांसाठी गूळ आणि दूधाचे मिश्रण फायदेशीर ठरते. थंड वातावरणात शरीरात नैसर्गिकरित्या उष्णता निर्माण करण्यास मदत करते. यामुळे कफचा त्रास कमी होतो.

सांध्याचे दुखणे असणार्‍यांसाठी हे मिश्रण अत्यंत फायदेशीर आहे. दुधातील व्हिटॅमिन डी, कॅल्शियम घटक आणि गूळातील आयर्न घटक सांध्यांना अधिक मजबूत बनवतात. गूळचा तुकडा आल्यासोबत चघळल्यानेही फायदा होतो.

शरीरात रक्ताची कमतरता असल्यास गूळ खाऊन त्याचे प्रमाण वाढवणं फायदेशीर आहे. गूळामुळे शरीरात हिमोग्लोबिन घटक वाढतात. सोबतच शरीराची रोगप्रतिकारकक्षमता सुधारते. महिलांमध्ये अनियमित मासिकपाळीचा त्रास असल्यास दूध -गुळाचे मिश्रण फायदेशीर ठरते.

वजन घटवण्यासाठी दूधासोबत गूळ मिसळून पिणे हे हेल्दी ड्रिंक आहे. यामुळे शरीरातील चरबी कमी होण्यास, परिणामकारक आणि झटपट वजन कमी होण्यास मदत होते. त्यामुळे साखरेऐवजी गूळ वापरणं अधिक फायदेशीर आहे.

गुळाचे अतिरिक्त फायदे

रोज गूळ खाल्ल्याने पचनक्रिया सुरळीत राहते. तसेच तुमच्या पोटात कधीच गॅस होणार नाही.
गूळ महिलांच्या मासिक पाळीतही फायदेशीर ठरतो. मासिकपाळी आल्यावर पोटदुखी होते, अशात गूळ खाल्ला तर पोट दुखायचे त्वरित थांबेल.
रोज गुळाचे सेवन केल्याने त्वचेला तेज येते आणि चेह-यावरील पुरळ सुद्धा कमी होऊ लागतात.
सर्दी, खोकला येत असेल तर गुळाचा लाडू बनवून किंवा चहामध्ये गुळ टाकून पिल्याने आराम मिळतो.
गुळ खाल्ल्याने तुम्हाला थकवा कधीच नाही जाणवणार आणि शरीरात नेहमी ऊर्जा राहील.
गुळात कुठल्याही अ‍ॅलर्जी विरुद्ध लढणारी तत्त्वे असतात. दम्याच्या पेशंटला गुळाचा खूप फायदा होतो.
गुळाला आल्या सोबत गरम करून खाल्ल्याने गळ्याचे आजार दूर होतात.