सकाळी सकाळी या १० गोष्टी तुमच्या नजरेस पडल्या तर समजून घ्या तुमचं नशिब जोरावर आहे..!!!

शकुन शास्त्र आपल्या सभोवताली मिळणाऱ्या लक्षणांच्या किंवा संकेतांच्या आधारावर कार्य करत असते. रोज सकाळी उठल्याबरोबर आपल्या द्वारे सर्वप्रथम पाहिली जाणारी गोष्ट किंवा जे शब्द ऐकले जातात त्यानुसार आपला दिवस कसा जाऊ शकतो, किंवा कसा असतो हे आज आपण जाणुन घेणार आहोत.

शुभ – अशुभ मुहूर्त आणि इत्यादी गोष्टींना हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व आहे. आता पुढे जाणून घ्या, जर आपल्याला सकाळी प्रथम काय दिसले तर आपला दिवस कसा असेल आणि आपल्याबरोबर काय चांगले घडेल…

जर आपणास सकाळी काहीतरी नजरेस पडले किंवा काही आवाज ऐकू आला तर तो आपला संपूर्ण दिवस खूप चांगला जातो. काही शुभ दिसणे व काही शुभ ध्वनी ऐकू येणे या त्या गोष्टी आहेत ज्या अत्यंत शुभ मानल्या जातात.

आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टीं बद्दल आणि ध्वनींबद्दल माहिती देणार आहोत ज्यास सकाळी ऐकणे आणि पाहणे चांगले समजले जाते, यामुळे तुमचे भाग्य चमकते.

1) सकाळी उठल्याबरोबर ॐ, स्वस्तिक, त्रिशूल, शंख, चक्र इत्यादी धार्मिक चिन्हे आपल्याला दिसल्यास आपला दिवस चांगला जातो.

2 ) सकाळी उठल्याबरोबर मंदिरातील घंटा किंवा आरतीचा आवाज ऐकू आला तर तो खूप शुभ मानला जातो, त्याशिवाय कानांवर शंखाचा आवाज ऐकू येणे देखील खूप शुभ मानले गेले आहे. यामुळे शरीरात सकारात्मक उर्जा वाहते, ज्यामुळे आपला दिवस सकारात्मक जातो.

3) उठल्यानंतर थोड्या वेळाने दुध आणि दही भरलेले भांडे तुम्हाला दिसले तर दिवसभरात तुमचे सर्व काम कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होईल असे समजून घ्यावे.

4) सकाळी उठल्यावर तुम्हाला कमळाचे फूल किंवा पाण्याने भरलेला घडा, किंवा हंडा दिसला तर त्या दिवशी आपणास धनलाभ होण्याची शक्यता असते.

5) घरातून बाहेर पडताना कुणी झाडलोट करताना दिसले, तर समजून घ्या की तुम्हाला तुमच्या आजच्या कामात नक्कीच यश मिळणार आहे.

6) जर आपण नोकरीच्या मुलाखतीसाठी किंवा कोणत्याही विशेष कामासाठी जात असाल तर पाण्याने भरलेले भांडे बघूनच घराबाहेर पडले पाहिजे.

7) सकाळी एखाद्या मुलीला किंवा सुहासिनी महिलेला तिचा शृंगार करताना पहिले तर हे सुद्धा खूप शुभ मानले गेले आहे. सकाळी एखाद्या शृंगार करणाऱ्या सुहासिनी महिलेला पहाणे हे दर्शविते की आपल्याला लवकरच पैसे मिळू शकतात.

8) मोर, कोकिळा, तसेच पक्ष्यांची किलबिल ऐकू येणे देखिल एक शुभ लक्षण आहे. यामुळे आपल्याला दिवसभसर सकारात्मक उर्जा भेटेल.

9) गौ मातेला हिंदू धर्मात अतिशय पूज्य मानलं जातं. गायीला आईचा दर्जा दिला जातो. धार्मिक शास्त्रानुसार असे म्हटले जाते की गायीमध्ये ३३ कोटी वेगवेगळ्या देवतांनी वस्ती केली आहे,म्हणून जर तुम्हाला सकाळी गाय दिसली किंवा तुम्ही गायीचा आवाज ऐकला तर ती अत्यंत शुभ मानली जाते. हे सूचित करते की आपला संपूर्ण दिवस खूप शुभ असेल.

10) जेव्हा आपण सकाळी उठून कोणतेही धार्मिक कार्य किंवा हवन पहाल किंवा तुम्हाला कुणी जप करीत असल्याचा आवाज ऐकू आला तर ते खूप शुभ मानले जाते. या गोष्टी पाहणे किंवा त्यांचे आवाज ऐकणे आपल्या मनामध्ये सकारात्मकता तयार करते.

टीप – येथे दिलेली सर्व माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

Leave a Comment