नमस्कार मित्रांनो, आषाढ कृष्ण पक्षातील एकादशी व्रत हे कामिका एकादशी व्रत या नावाने ओळखले जाते. या पुण्यदायी आणि मो क्ष दायी व्रताची सत्य कथा साक्षात श्री कृष्ण सांगताय तेव्हा लक्षपुर्वक समजावून घ्या. एकदा युधिष्ठिराने विचारले, प्रणाम गोविंद, वासुदेव, आषाढ कृष्ण पक्षातील एकादशी चे महात्म्य मला सांगावे.
भगवान श्री कृष्ण म्हणाले राजन, ऐका. मी तुम्हाला पा प ना श क उपाय सांगतो, जो ब्रह्माजींनी पूर्वी नारदजींना सांगितला होता. नारदजींनी विचारले हे प्रभु, मला तुमच्याकडून ऐकायचे आहे की आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीचे नाव काय आहे? त्या दिवशी कोणत्या देवतांचे पूजन केले पाहिजे? प्रभु मला हे सर्व सांगावे. ब्रह्माजी म्हणाले नारद ऐका. सर्व मानवजातीच्या कल्याणासाठी मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देत आहे.
आषाढ महिन्यातील कृष्ण पक्ष एकादशीला कामिका एकादशी म्हणतात. या एकादशीच्या केवळ स्मरणाने वाजपेय यज्ञाचे फळ मिळते. त्या दिवशी भगवान श्रीधर, हरी, विष्णू, माधव आणि मधुसूदन इत्यादी नावांनी भगवान श्री कृष्ण यांची पूजा करावी. भगवान श्री कृष्णाची उपासना केल्याने मिळणारे फळ गंगा, काशी, नैमिश आरण्य आणि पुष्कर या पवित्र स्थळांच्या ठिकाणी स्ना न केल्याने मिळते त्याच्या कितीतरी पटीने अधिक असते.
जेव्हा सिंह राशीत गुरू आल्याने आणि व्यतिपात आणि दं ड यो ग आल्यावर गोदावरी स्ना न करून जे फळ मिळते, तेच फळ भगवान श्रीकृष्णाची पूजा करून प्राप्त होते. जो समुद्र आणि जंगलांसह संपूर्ण पृथ्वी दा न करतो आणि जो ‘कामिका एकादशी’ चे व्रत करतो, त्या दोघांचे पुण्य क र्म हे समान मानले जाते.
मित्रांनो, तसे तर प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येत असतात, एक शुक्ल पक्षात तर दुसरी कृष्ण पक्षात अशा पद्धतीने वर्षात एकूण चोवीस एकादशी येतात आणि ज्या वर्षी अधिक महिना येतो त्या वर्षी अधिक महिन्याच्या दोन जास्तीच्या एकादशी मिळून एकूण 26 एकादशी येत असतात. त्यातच आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला कामीका एकादशी असे म्हटले जाते .या दिवशी श्रीहरी श्री विष्णूंचे पूजन केले जाते.
मित्रांनो, एकादशीचा दिवस हा श्रीहरी श्री विष्णूंना समर्पित केलेला असतो, या दिवशी उपवास केला जातो तसेच श्रीहरी श्री विष्णूंचे आणि देवी लक्ष्मींचे पूजनही केले जाते. या दिवशी व्रत वैकल्ये करून मनोभावे श्रीहरी श्री विष्णू व देवी लक्ष्मींचे पूजन केल्यास श्रीहरी विष्णू व देवी लक्ष्मीच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा, मनोकामनांची पूर्तता होत असते.
एकादशीच्या दिवशी तुळशी पूजनाचे देखील फार मोठे महत्त्व सांगीतले गेले आहे, ज्या व्यक्ती एकादशीचे मनोभावे व्रत करतात आणि तुळस तथा शालिग्रामचे पूजन करतात, श्रीहरी श्री विष्णूंच्या कृपेने त्यांच्या सर्व इच्छा, मनोकामनांची पूर्तता होते.
एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्ना न करावे, अंघोळीच्या पाण्यात गंगेचे पाणी टाकावे व त्या पाण्याने स्ना न करावे, त्यानंतर श्रीहरी विष्णूंचे व देवी लक्ष्मीचे पूजन करावे. शालिग्राम स्वरूप श्रीहरी विष्णूचे पूजन करावे. पूजा आटोपून घरातील सर्व सदस्यांनी योगिनी एकादशी व्रत कथा ऐकावी किंवा कुणीतरी ती वाचावी.
त्याचबरोबर पाच तुळशीची पाने घेऊन ती गंगेच्या पाण्यात स्वच्छ धुऊन घ्यावी त्यानंतर ती पाच पाने हातात घेऊन आपली जी पण काही इच्छा किंवा मनोकामना असेल ती मनातल्या मनात भगवंताला सांगावी, डोळे बंद करून “ओम नमों भगवते वासुदेवाय नमः” या मंत्राचा किमान एकवीस वेळा तरी जप करावा, आपली इच्छा पुर्ण करण्याची भगवंताना प्रार्थना करावी, मागणी करावी त्यानंतर भगवंतांला मनोभावे नमस्कार करुन भक्तिभावाने ओतप्रोत होऊन निघावं.
त्याच बरोबर तुळशी मातेला एकूण अकरा प्रदक्षिणा घालाव्यात. तुळशी मातेला साष्टांग नमस्कार करावा. असा हा अद्भुत उपाय केल्याने लवकरच आपली जी काही इच्छा असेल, ज्याही मनोकामना असतील त्या सर्व पूर्ण होईल. या दिवशी अंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून अंघोळ केल्याने प्रत्यक्ष चंद्रभागेत स्ना न केल्याचं पुण्य मिळतं. एकादशीच्या दिवशी कोणत्याही नदीत जाऊन स्ना न करावे असे आपले शास्त्र सांगते परंतु ते शक्य नसल्यास गंगाजल घेऊन स्ना न केल्याने योग्य ते पुण्य लाभते. त्याचबरोबर विष्णूंच्या विठ्ठल रूपाचे पूजनही या दिवशी केले जाते. विष्णू सहस्त्र नामाचा जपही जागरणाद्वारे केला जातो.
टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.
मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!