सर्व मनोकामना होतील पूर्ण : शिवलिंगावर ही खास फुले करा अर्पण प्रत्येक फुल आहे वरदान..!!

सर्व मनोकामना होतील पूर्ण शिवलिंगावर ही खास फुले करा अर्पण प्रत्येक फुल आहे वरदान..!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो श्रावण मास हा भगवान शिव आणि माता पार्वतींचा प्रिय महिना आहे. सर्वत्र हर हर महादेव चा जयघोष ऐकू येत आहेत. मंदिरांमध्ये शिवजींची पूजा केली जात आहे आणि मनाकोमनाच्या पूर्तीसाठी व्रत वैकल्ये केली जातात. महादेवाच्या पिंडीवर अनेक वस्तू अर्पण केल्या जातात.

भगवान शिव यांना अत्यंत प्रिय असलेल्या फुलांचा शिवलिंगाच्या पूजेमध्ये वापर केला जातो. तुमच्या मनात असलेल्या प्रत्येक इच्छेसाठी कोणते फूल अर्पण केले असता ती पूर्ण होईल, याबद्दल अधिक माहिती जाणुन घ्या.

मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला अशा काही फुलांबद्दल सांगणार आहोत जे इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी अर्पण केली तर अत्यंत उपयोगी ठरतात. तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. तर जाणून घेऊया त्याबद्दल.

आपल्याला ठाऊकच आहे की बेलाची पाने महादेवाला किती प्रिय आहेत. भगवान शंकराच्या पिंडीवर बेलपत्र अर्पण केल्यास ते प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात. आपल्यावरील सारी संकटे दूर करतात.

शिवलिंगावर दुर्वा अर्पण करून शिवउपासना केल्याने, शंकरजी खुश होतात आपल्याला दीर्घायुष्य प्राप्त होते. अ का ली मृ त्यू चे सं क ट दूर होते.

प्राजक्ताच्या फुलांना स्वर्गसुमने म्हणतात. असे मानले जाते की प्राजक्ताचे झाड स्वर्गातून पृथ्वी तलावर अवतरले होते.अशा या चमत्कारी प्राजक्ताच्या फुलांनी शिवलिंगाची पूजा केल्याने जीवनात सुख, संपत्ती आणि ऐश्वर्य प्राप्त होते.

चमेलीचे फूल अतिशय सुगंधित असते आणि मोहक दिसते. हे फूल अर्पण केल्याने त्याच्या सुगंधाने भोलेनाथ मोहुन,आनंदित होऊन आपल्याला आशीर्वाद देतात. ज्यामुळे हवे असलेले वाहन आपण लवकरात लवकर खरेदी करू शकतो आपला भाग्योदय नक्किच होईल याबद्दल काही शंकाच नाही.

धोत्र्याचे फुल अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. शिवजींचे सर्वात प्रिय फुल म्हणजे धोतरा. हे फूल अर्पण केले असता आपल्याला उत्तम आणि तेजस्वी पुत्रप्राप्ती होते. एक असा पुत्र जो आपल्या कुळाचा उ द्धा र करेल. जो कुटुंबाचे नाव उज्ज्वल करेल.

रूईचे फूल हे देखिल एक महत्त्वाचे पुष्प मानले जाते. रुईच्या फुलांनी पूजा केल्याने, आपल्याला खूप सारे पुण्य मिळते. आपल्या पूर्वजांना याद्वारे मो क्ष मिळतो.

आळशीच्या फुलांनी पूजा केल्याने व्यक्ती सर्व देवांना प्रिय बनते.त्याच्यावर सर्व देवतांची कृपा कायम राहते. त्यामुळे कसलीच कमी पडणार नाही. नेहमी सुखी समाधानी जीवन जगतात.

शमीच्या वृक्षाची पाने महादेवाला अर्पण केली तर आपणाला मो क्ष प्राप्ती मिळते. आपल्या जीवनाचे सार्थक होईल.

कण्हेरची फुले तर फारच फलदायी असतात. या फुलांनी शिव पूजन केल्यास नवीन कपडे मिळतात तसेच मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात.

लाल देठ असलेल्या धोतरा फुलाने शिवजी अत्यंत प्रसन्न होतात. हे फूल पुजेसाठी खूपच शुभ मानले जाते. आपल्या भक्तांवर शंकरजी अतिशय पटकन प्रसन्न होतात आणि इच्छित फळ प्राप्त होते.

मोगऱ्याचे फुल फारच सुगंधित असते. ते प्रेमाचे प्रतिक मानले जाते. त्याच्या सुगंधाने भगवान शिव शांत होतात आणि आनंदाने भक्ताच्या मनोकामना पूर्ण करतात.

महादेवाच्या पिंडीवर मोगऱ्याची फुले मनोभावे अर्पण केली तर मनासारखा सुंदर जीवनसाथी मिळतो.

जाईजुईची फुले अत्यंत शोभून दिसतात. त्यांचे गजरेही करतात. या सुंदर फुलांनी शिवलिंगाची पूजा केल्याने व्यवसायात वृद्धी होते. व्यावसायिक अडचणी दूर होतील आणि तुमच्या घरात सुख समृद्धी येईल आणि आरोग्याच्या सर्व समस्या दूर होतील. कधीच अन्नधान्य कमी पडणार नाही.

तर मित्रांनो, तुम्हाला समजले असेल की शिवजी कोणत्या प्रकारची फुले वाहिल्याने प्रसन्न होतात. तुम्ही या श्रावणात नक्कीच या चमत्कारी फुलांचे उपाय करून आपल्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी अवश्य प्रयत्न करा.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

Leave a Comment