सर्वच हिरोंना कॅपची गरज नसते..!!! मयूर शेळके यांना 50000 चं बक्षीस जाहीर..

रेल्वे मंत्रालयाने मयूर शेळके यांना 50,000 रुपयांच्या पुरस्काराची घोषणा केली. त्यातून ही शेळके यांनी त्या मुलाच्या आईला 25,000 रुपये द्यायचं असं ठरवलं असून मयूर शेळके या मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्याने रेल्वे ट्रॅकवर पडलेल्या सहा वर्षांच्या मुलाचा जीव स्वत:च्या जिवाची पर्वा न करता जीव धोक्यात घालवून वाचविला होता.

याचबरोबर या न्युजकडे जावा मोटारसायकल्सचे संचालक अनुपम थरेजा यांचे लक्ष लागून राहिले. त्यांनी जावा हीरोजच्या पुढाकाराने शेळकेला नव्या जावा मोटरसायकल देऊन सन्मानित करण्याचे आश्वासनही दिले आहे.

शेळके यांना ” act of bravery, courage and presence of mind” या पुरस्काराबद्दल रेल्वे मंडळाच्या प्रधान कार्यकारी संचालकांनी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना एका पत्राद्वारे माहिती दिली.

स्वत: च्या जीवाची पर्वा न करता शेळके यांनी येणाऱ्या ट्रेनच्या समोरुनच पळत मुलाची सुटका केली आणि मुलाला प्लॅटफॉर्मवर सुरक्षित उचलून ठेवले.

शेळके हे 17 April एप्रिल रोजी पॉईंट्समन म्हणून तैनात असलेल्या मुंबईजवळ वांगणी स्थानकात ही घटना घडली.

शेळकेने एका मुलाला प्लॅटफॉर्मवरुन खाली ट्रॅकवर पडतांना पाहिले, जो मुलगा रुळावर पडला होता त्याची आई अंध होती हे शेळकेंच्या लक्षात आले. तो मुलगा येणाऱ्या ट्रेनच्या मार्गावरच होता.

मयूर शेळके यांनी क्षणात खाली उडी मारून मुलाच्या दिशेने धाव घेतली. त्या मुलाला पटकन उचलून फ्लॅट फॉर्मवर टाकले आणि स्वत:ला ही क्षणात फ्लॅटफॉर्मवर झोकून दिले. त्यानंतर दोन सेकंदातच ट्रेन तेथून पास झाली.

हृदय पिळवटणार्‍या या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले.

शेळके यांच्या या धाडसी कृत्याबद्दल मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वीच त्यांचा सत्कार केला होता.

Leave a Comment