Monday, December 4, 2023
Homeजरा हटकेसटवाई का येत असते बाळाचे नशिब लिहायला..?? कुणी दिला हा हक्क तिला..??

सटवाई का येत असते बाळाचे नशिब लिहायला..?? कुणी दिला हा हक्क तिला..??

नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांनी लहानपणी सटवाईच्या बद्दल ऐकलं असेलच. घरात एखाद्या छोट्या बाळाचं आगमन जर झालं तर घरात परंपरेनुसार एक विधी केला जायचा. ज्याला पाचवी असे आपण म्हणतो.

अशी मान्यता आहे की, त्या रात्री म्हणे सटवाई येऊन त्या बाळाचं नशीब लिहून जात असते. तर आपल्या घरातील ज्येष्ठ आपल्याला या बाबतीत समजावून सांगताना बोलतात की स ट वी आणि दि व टी येतील आणि बाळाचं नशीब लिहून जातील.

मित्रांनो, आपल्या हिंदू संस्कृतीत बाळ जन्माला आल्यानंतर पाचव्या दिवशी या सटवाईची पूजा केली जाते. बाळाचे भविष्य लिहणाऱ्या देवीला सटवाई असे म्हटलेले आहे. त्याचबरोबर ही सटवाई त्या बाळाचे रक्षण देखील करते.

बाळाचं नशिब लिहणारी ही सटवाई कोण आहे याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण या लेखाद्वारे घेणार आहोत. मित्रांनो, या सटवाईची पूजा आपल्या न्हाणीघरात, बाळाच्या खाटेजवळ, मुख्य प्रवेशद्वारावर केली जाते. या पूजेमध्ये एक वही आणि पेन या ठिकाणी ठेवत असतात.

मित्रांनो, या सटवाईची पूजा हा एक वैदिक संस्कार जरी नाही तरी सर्व लोक घरात बाळ जन्मला आल्या नंतर पाचव्या दिवशी सटवाईची पूजा करत असतात. नविन बाळाच्या जन्मानंतरचा घरातला हा पहिलाच विधी असतो. त्या रात्री सटवाई कुणाचं तरी रूप घेऊन येते व बाळाच्या कपाळावर भविष्य लिहीत असते. अशी एक मान्यता आहे.

यावेळेला बाळाच्या ललाटावर हिंगाचा अंगारा लावला जातो किंवा त्याची रेखा काढली जाते. त्याच्यामुळे सटवाई च्या स्वागतासाठी पुढ्यात वही आणि पेन ठेवलं जातं. जेव्हा कधी झोपेमध्ये बाळ गालातच हसते, तेव्हा सटवाई येऊन हसवून गेली असे आपले वडीलधाऱ्यांकडून ऐकायला मिळतत असते.

मित्रांनो, या प्रथेच्या मागे एक पौराणिक कथा ऐकीवात आहे ती कथा पुढीलप्रमाणे आहे. या सटवाई च्या मुलीला एक प्रश्न पडतो की, रोज रात्री आपली आई कोठे जात असते. म्हणून एकदा सटवाई च्या मुलीने सटवाई ला विचारले की तू रोज संध्याकाळी कुठे जात असतेस..??

मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर देणं सटवाई ला काही शक्य नव्हते. परंतु बा ल हट्टापुढे सटवाई ला हे सांगणे भा ग च पडले. मग तिने मुलीला सांगितले की मी लहान मुलांचे भविष्य त्यांच्या भाळी लिहण्यासाठी रोज रात्री घराबाहेर जात असते.

नंतर सटवाई च्या मुलींने सटवाई ला विचारले की तू दुसऱ्याचं भविष्य लिहिण्यासाठी बाहेर जाते, तर मला भविष्यामध्ये त्याचा काय फायदा होणार आहे. माझे भविष्य मला सांग. पुढे त्यावर सटवाईने आपल्या मुलीला असे सांगितले की तुझे लग्न तुझ्याच पोटी जन्म घेतलेल्या मुलाशीच होईल. हे भविष्य ऐकून सटवाई च्या मुलगी कधीही लग्न न करण्याचा निर्णय घेते.

काही दिवस लोटल्यानंतर एका दिवशी एक राजपुत्र सटवाईच्या झोपडीजवळून वाहत असलेल्या नदीजवळ पाणी पिण्यासाठी येतो. आणि नकळत राजकुमाराकडून चूळ भरलेलं पाणी सटवाई च्या मुलीच्या पिण्याच्या पाण्यामध्ये येत असते. आणि ते पाणी प्यायल्याने सटवाईच्या मुलीला दिवस जातात.

व कालांतराने ती एका गोंडस मुलाला जन्म देते व ती त्या मुलाला जंगलामध्ये फेकून येते ते मुल एका राजाला सापडते आणि राजाने त्या लहान मुलाचे संगोपन केले.. पुढे जाऊन तो मुलगा मोठा झाल्यानंतर एके दिवशी तो शि का र करण्यासाठी जंगलामध्ये जातो.

तिकडे त्या मुलाचे लक्ष त्या मुलीकडे जाते व तो तिच्या प्रेमात पडतो सटवाईच्या मुलीला असे वाटते की आपण तर त्या मुलाला जंगलात फेकून दिलेले आहे, त्यामुळे आपल्या आईने सांगीतलेले भविष्य नक्कीच खोटे ठरणार.

परंतु ती हे विसरली होती की सटवाई द्वारे लिहिले गेलेले भविष्य कुणालाही चुकलेले नाही. विधिलिखित प्रमाणे तिच्या मुलीच्या आयुष्यात देखील तसेच घडले. जे तिच्या आईने म्हणजेच सटवाईने तिच्या कपाळावर लिहले होते. तर मित्रांनो, मग ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि त्यांचे लग्नही होते.

नंतर पुढे जाऊन सटवाई च्या मुलीने आपले जे मूल जंगलात फेकून दिले होते. त्यावेळी त्याला मुलाला ज्या कपड्यात गुंडाळले होते ते कापड त्या युवकाने जपून ठेवलेले असते. एके दिवशी ज्यावेळी सटवाईच्या मुलगी ते कापड पाहते त्याचवेळी तिच्या लक्षात येते की आपले लग्न आपल्या मुलाशी झाले आहे.

आणि आपल्या आईने सांगितलेल्या गोष्टी अगदी खऱ्या ठरत आहेत. तिच्या हे लक्षात आल्यानंतर आपल्या आईने सांगितलेले भविष्य हे खरे आहे. त्यामध्ये कोणी कितीही बदल करण्याचा प्रयत्न केला तरी त्यात थोडाही बदल होत नसतो आणि हे त्रिकालाबाधित असे सत्य आहे. तेव्हा पासून ही म्हण रु ढ झाली की सटवाई ने लिहलेले भविष्य कधीही खो टे ठरत नसते.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स