सौंदर्य या बाई-साठी बनले होते अभिशाप.!! सुंदरतेची मोजावी लागली होती विचित्र आणि फार मोठी किंमत..!!

मित्रांनो, आपण क्वचितच ‘नगरवधू’ हिच्या बद्दल ऐकून असाल. जर आपण इतिहासाची पाने पुन्हा एकदा फिरविली तर त्यात एका अतिशय सुंदर आणि नितळ कांति असलेल्या एका स्त्रीचा उल्लेख केलेला आहे.

ती दिसायला इतकी सुंदर होती की, कुणाला तिचे मोठे डोळे आवडायचे तर, कुणाला तिचा सुंदर चेहरा आवडायचा. हर एक जण तिच्या आकर्षक श-रीराला, आकाराला, बघून तिच्या सौंदर्यामध्ये हरवून जायचा. तिला पाहून प्रत्येकाला असं वाटायचं की जणू काही देवाने तिला बनविण्यासाठी अत्यंत कठोर परिश्रम आणि त्याचा अनमोल असा वेळ समर्पित केलेला असावा.

मित्रांनो, इतिहासातील ती स्त्री आजही ‘आम्रपाली’ या नावाने ओळखली जाते.

मित्रांनो, प्रत्येक स्त्रीचे सौंदर्य हे तिच्या व्यक्तिमत्त्वात भर घालत असते, पण या आम्रपाली बद्दल असे काय घडले असावे की तिचे हे सौंदर्यच तिच्यासाठी अभिशाप ठरले..??

मित्रांनो या एका महिलेला तिच्या सौंदर्याची भारी किंमत मोजावी लागली. ‘आम्रपाली’ला नगर-वधू म्हणजे वे-श्या बनण्यासाठी भाग पाडले गेले.

तिला आम्रपाली हे नावं कसे मिळाले..??

मित्रांनो, खरं तर आम्रपालीच्या खर्‍या आई-वडिलांविषयी कुणालाही माहिती नाही, पण असे म्हणतात की ज्यांनी आम्रपालीला वाढवलं त्यांना ती एका आंब्याच्या झाडाखाली सापडली होती. ज्यामुळे तिला आम्रपाली हे नाव दिले गेले.

तिचे श-रीर सुंदर होते, त्वचा अगदी नितळ आणि आकर्षक होती.

मित्रांनो, आम्रपाली ही लहानपणापासूनच खूप सुंदर होती. त्याचे श-रीर खूपच आकर्षक होते. जो कोणी तिच्याकडे पाहत असे त्याची नजर तिच्यावरुन हटूच शकत नाव्हती. पुढे आम्रपाली जस-जशी मोठी झाली तस-तसे तिच्या सौंदर्यात अजूनही भर पडत गेली. पण तिचे हे सौंदर्यच, तिच्यासाठी अभिशाप ठरले.

Image Source Hindi Sawal Jawab

नगरातील प्रत्येकजण आम्रपालीसाठी वेडा होता –

मित्रांनो, वैशाली नगरातील प्रत्येकजण तिच्या सौंदर्यावर फिदा होता. आम्रपालीचे हे सौंदर्य इतके विलक्षण होते की वैशालीचा प्रत्येक माणूस तिला आपली वधू बनवण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून होता. नगरातील लोकांमध्ये आम्रपालीची इतकी ओढ होती की तिला मिळवण्यासाठी कुठल्याही मर्यादेपर्यंत जाऊ शकत होते.

मित्रांनो, लोकांचे हे वेड पाहूनच तिचे आई-वडील घाबरुन गेलेले होते, कारण त्यांना हे माहित होते की जर आम्रपालीने एका कुणाशी लग्न केले तर उरलेले बाकीचे त्यांचे शत्रू बनतील आणि आम्रपालीला मिळविण्यासाठी संपूर्ण वैशाली राजवटच उद्ध्वस्त होऊन जाणार.

आणि मग आम्रपाली ‘नगर-वधू’ झाली –

मित्रांनो, नंतर मग या समस्येवर एखादा तोडगा काढण्यासाठी वैशाली येथे एक दिवस बैठक आयोजित करण्यात आली होती. या सभेत उपस्थित असलेल्या जवळपास सर्वच माणसांना आम्रपालीशी लग्न करायची इच्छा होती, ज्यामुळे कुठलाही निर्णय घेणे फारच अवघड होत चालले होते.

आणि मग एका निर्णयावर एकमत घेण्यात आले. बैठकीत शेवटच्या घटकेला घेतलेल्या निर्णयाची आम्रपालीने कल्पना देखील केली नव्हती. मित्रांनो, आम्रपाली यांना त्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयावरुन नगर-वधू म्हणजेच वे-श्या म्हणून घोषित करण्यात आले होते.

हे केले गेले, कारण सर्व लोकांना वैशाली हे प्रजासत्ताक वाचवायचे होते. नगर-वधू झाल्यानंतर आम्रपालीला मिळवण्यासाठी प्रत्येकजण मोकळा होता. या एकाच निर्णयामुळे ती शहरातील सर्व लोकांसाठी वे-श्या ठरली किंवा तिला ते बनण्यासाठी भाग पाडले गेले.

आम्रपाली गौतम बुद्धांच्या आश्रयाला गेली –

आम्रपालीने प्रत्येकाचा हा निर्णय तिच्या नशिबी लिहलेला निर्णय म्हणून स्वीकारला. आम्रपालीने अनेक वर्षांपर्यंत वैशाली नगरातील धनाढ्य लोकांचे मनोरंजन केले.

पण मित्रांनो, एक वेळ अशी आली की जेव्हा ती सर्व काही सोडून गौतम बुद्धांना शरण गेली, आणि त्यांच्या आश्रयाच्या छायेत आश्रमातच राहू लागली. व बौद्ध भिक्षिणी बनून आपले जीवन व्यतित करु लागली.

मित्रांनो या ठिकाणी हे लक्षात घेण्यासारखे आहे की ‘नगर-वधू’ आम्रपाली हिने सुद्धा तिच्या सुखी आणि छान आयुष्याबद्दल बरीच स्वप्ने पाहिली होती, तिला देवाकडून मिळालेली देणगी म्हणून एक सुंदर श-रीर देखील प्राप्त झाले होते, परंतु नशिबाच्या पुढे कधी कुणी जाऊ शकत नाही..!!!

कदाचित याचसाठी ती इतिहासातील सर्वात सुंदर स्त्री असुनही ‘नगर-वधू’ म्हणून प्रसिद्ध झाली. आणि तिचं सौंदर्यच ठरलं तिच्या साठी अभिशाप..!!!

Leave a Comment