Tuesday, October 3, 2023
Homeबॉलिवूडसाऊथच्या श्रीवल्लीला पडली मराठमोळ्या लावणीची भुरळ.. बघा तिच्या दमदार डान्सची एक झलक…

साऊथच्या श्रीवल्लीला पडली मराठमोळ्या लावणीची भुरळ.. बघा तिच्या दमदार डान्सची एक झलक…

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… रश्मीका मंदाना साऊथ चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. मागच्या वर्षात आलेल्या ‘पुष्पा’ चित्रपटात तिने श्रीवल्ली ही भूमिका साकारत सगळ्यांनाच वेड लावले होते.

एवढंच नाही तर रश्मीकाने बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण केलं आहे. पहिल्याच चित्रपटात ती बिग बींच्या सोबत ‘गुडबाय’ या सिनेमात झळकली होती. तर नुकतीच ती सिद्धार्थ मल्होत्रा सोबत ‘मिशन मजनू’ मध्ये देखील दिसली होती.

आता ही रश्मीका नुकतीच झी गौरवच्या पुरस्कार सोहळ्यात सामील झाली होती. त्याचे फोटो सध्या समोर आले आहेत. एवढंच नाही तर रश्मीकाने या सोहळ्यात खास मराठमोळी लावणी सादर केली.

नुकतंच ‘झी चित्र गौरव’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होत. यावेळी रश्मीका आपल्या लूकसाठी प्रमुख आकर्षणाचा विषय ठरत आहे. यावेळी ती एका खास अंदाजात दिसली. यादरम्यानच एक प्रोमो देखील समोर आला आहे. पांढऱ्या रंगाच्या नऊवार मध्ये तिने ‘चंद्रा’ गाण्यावर लावणी केल्याचं प्रोमो मध्ये दिसत आहे.

त्यामुळे रश्मीकाची लावणी पाहण्यासाठी आता तिचे चाहते आतुर झाले आहेत. यावेळी मराठी पोशाखात रश्मीका खूपच सुंदर दिसत आहे.

तर सोबतच तिने लावणीचा ठेका देखील उत्तम पकडला असल्याचे दिसत आहे. तिच्या या मराठमोळ्या लूकवर चाहते अक्षरशः फिदा झाले आहेत. 26 मार्चला रश्मीकाला मराठमोळ्या अंदाजात बघण्यासाठी चाहते आतुर आहेत.

https://youtube.com/shorts/y_Lyr7htEgk?feature=share3
RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स