सब्जा खाण्याचे गुणकारी फायदे.. सब्जा खाण्याची योग्य वेळ कोणती.? प्रमाण किती.. जाणून घ्या एका क्लिकवर.!!


स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, आपल्याला आजूबाजूला अनेक प्रकारच्या अशा वनस्पती फळे असतात की, ज्याचा वापर करून आपल्या शरीरावर होणारे नुकसान आपण करून कमी करू शकतो. त्याची माहिती आपल्याला संपूर्ण माहीत नसल्यामुळे त्याचा वापर देखील आपल्याला करता येत नाही. अशा आयुर्वेदिक पदार्थाची माहिती जाणून घेणार आहोत की, ज्याचा वापर करून आपल्याला अनेक फायदे होतात.

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये उन्हापासून आपल्या शरीराला अनेक प्रकारचे नुकसान होत असतात. उष्णता, उन्हाळी लागणे, अशक्तपणा येणे, भूक न लागणे, मूळव्याध, नाकातून तसेच कानातून रक्त येणे अशा प्रकारच्या अनेक समस्या आपल्याला उद्भवत असतात. हे त्रास कमी करण्यासाठी आपण उन्हात जाताना मास्क टोपी चा वापर करू शकतो. त्याचबरोबर सत्तत पाण्याचा वापर करू शकतो.

सतत पाणी पिल्याने देखील आहे त्रास कमी होण्यास मदत होत असते. परंतु याचा वापर करून फक्त आपल्याला तात्पुरते आराम मिळू शकते. परंतु हा त्रास पूर्णपणे कमी होत नाही. हा त्रास कमी करण्यासाठी आजच्या लेखामध्ये आपण अशा एका पदार्थाची माहिती जाणून घेणार आहोत की, जो पदार्थ आपल्याला आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध होतो. पदार्थामुळे अत्यंत उपयुक्त असे फायदे मिळू शकतात.

यातीलच एक पदार्थ म्हणजे सब्जा. याचे बी थोडेसे काळसर रंगाचे असते. तुळशीच्या बिया पेक्षा थोडेसे आकाराने मोठी असते. हे पाण्यात भिजत घातल्यास ते त्याचा आकार थोडासा मोठा होतो. सब्जा मध्ये थंड गुणधर्म असल्यामुळे याचे सेवन दुधामधून किंवा पाण्यातून केल्यामुळे ते आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करते.

यामध्ये मॅग्नेशियम, फॉस्फरस, फायबर, प्रोटीन, कॅल्शियम असे भरपूर प्रमाणात असतात. आपल्या शरीरावर अत्यंत उपयुक्त असे घटक आहेत. सब्जाचे सेवन केल्यामुळे लघवी करताना होणारी जळजळ ही पूर्णपणे कमी होते. कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन झाले असेल तर ते देखील कमी करण्यास मदत होते. त्याचबरोबर मधुमेह व्यवस्थितरीत्या राहतो. पोट व्यवस्थित साफ होते. त्यामुळे गॅस एसिडिटी यांसारखे त्रास उद्भवत नाहीत.

याचे सेवन केल्यामुळे वजन देखील नियंत्रणामध्ये राहते. या बियांचा वापर आपण दोन चमचे इतके घेऊन साधारणपणे ते भिजतील इतके पाणी घालून तासभर ते तसेच भिजत ठेवावे. तासाभरानंतर ते पाण्यासोबत किंवा सरबतात, फालुदा, दही किंवा इतर कोणत्याही पदार्थांमध्ये ते घालून आपण त्याचे सेवन करू शकतो.

या बिया लहान मुले व गर्भवती महिलांनी याचे सेवन करू नये. कोणताही पदार्थ खात असताना त्याचे प्रमाण हे निश्चित असते. त्यामुळे दिवसातून दोन वेळा सब्जाचे बी खावेत. अति प्रमाणात त्याचे सेवन करू नये. जर अति प्रमाणात त्याचे सेवन केल्यास त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात.

अशा प्रकारे या सब्जाचे बी जे सेवन तुम्ही नक्की करून बघा. नक्कीच मला त्याचा फायदा होईल. उन्हामुळे होणारे अनेक त्रास देखील यामुळे कमी होतात. त्यामुळे हा पदार्थ उन्हाळ्यात आपल्याला अत्यंत उपयुक्त असा आहे.

अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.!!