शनिदोषाचं निवारण कसं करावं..?? शनि असणे नेहमी वाईट नसते..

ज्योतिष शास्त्रांमध्ये शनिदेवांना कर्म फळ दाता असे म्हटलेले आहे, ते व्यक्तीच्या चांगल्या व वाईट कर्मानुसारच फळ देतात, ज्योतिषा शास्त्राच्या जाणकारांचे असे म्हणणे आहे की शनिदेवांची हालचाल ही अत्यंत मंदपणे असते, म्हणूनच जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शनिदेव हे शुभ स्थितीमध्ये विराजमान झालेत तर त्या व्यक्तीला त्याचा दिर्घ काळापर्यंत शुभ परिणाम मिळत राहतो.

परंतु जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शनिदेव हे वाईट स्थितीत विराजमान झाले तर त्या व्यक्तीला त्याचा बऱ्याच काळापर्यंत त्रास सहन करावा लागतो. बहुतेक लोकांची अशी श्रद्धा आहे की शनिदेव हे आपल्याला नेहमी वाईटच फळ देतात.परंतु असे नाही आहे, कारण जर व्यक्ती आपल्या जीवनात चांगले कार्य करत असेल तर त्या व्यक्तिला नेहमी शनिदेवांकडून शुभ फळाचीच प्राप्ती होते.

जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शनी कमकुवत असेल, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनात अडचणींशी सामोरे जावे लागत आहे तर तुम्ही अशा स्थितीत शनिवारी काही सोपे उपाय करू शकता, हे उपाय केल्यास शनिदेव शांत होतात. व कर्म फळ दाता शनिदेव हे तुमच्यावर प्रसन्न होतात, तसेच तुम्ही तुमच्या जीवनातील त्रासातून मुक्त होऊन जातात.

माणसाला जर शनी ग्रहापासून वाईट फळाची प्राप्ती होत असेल तर अशा परिस्थितीत त्या व्यक्तीने दर शनिवारी आपल्या घराशेजारील शनिदेवांच्या मंदिरात जाऊन तेलाचा दिवा लावला पाहिजे.

तुम्ही या गोष्टीचे लक्ष ठेवले पाहिजे की विशेषत: शनिवारी व मंगळवारी कोणावरही संतप्त होणे टाळावे आणि तसेच या दिवशी कोणत्याही व्यक्तीचा अपमान करू नये.

प्रत्येक शनिवारी तुम्ही मादक पदार्थांच्या सेवनापासून दूर राहायला हवे, तुम्ही शनिवार च्या दिवशी चुकूनही सुद्धा मांस, मासे यांचे सेवन करू नका. कारण यामुळे शनिदेवांकडून वाईट प्रभाव सुद्धा मिळू शकतो.

जर तुम्ही शनिवार च्या दिवशी एका वाटीत तेल घेऊन त्यात आपला चेहरा पाहून एखाद्या गरजू व्यक्तीला दान केले तर शनिदेव प्रसन्न होतात.

तुम्ही शनिवार च्या दिवशी रात्रीच्या वेळी झोपताना शरीरावर व नखांवर तेल लावू शकता.जर तुम्ही शनिवार च्या दिवशी शनिदेवाची पूजा करत असाल तर तुम्ही गुळ आणि हरभरा ने बनवलेल्या वस्तूंचा भोग लावावा.

तुम्ही शनिवार च्या दिवशी विशेषतः काळया रंगाचे वस्त्रे धारण करा कारण शनिदेवांना काळ्या रंगाचे वस्तू अति प्रिय आहेत.

शनिदेवांची कृपा प्राप्त करण्यासाठी व्यक्ती हा आपल्या परीने सर्वथा प्रयत्न करत असतो, शनिदेव हे असे देवता मानले जातात की त्यांच्या पासून सगळे लोकांना भीती वाटते, प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या वाईट दृष्टीपासून वाचावे वाटते, लोक त्यांना प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करतात.

त्यासाठी शनिवारच्या दिवशी काही सोप्या उपायांबद्दल सांगितले आहे, जर तुम्ही हे साधे उपाय कराल तर कर्म फळ दाता शनिदेव हे तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमचे जीवन सफल बनवून देतील. ज्योतिषशास्त्रानुसार हे साधे उपाय तुमच्या जीवनातील समस्येला दूर करू शकतात.

टीप : वर दिलेली सर्व माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. या माहितीचा कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास तशी वाढ देण्याचा कुठलाही उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा अर्थ घेऊ नये.

वाचकहो तुम्हाला जर लेख आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर सुद्धा करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया तुम्ही कमेंट करून कळवायला विसरू नका.

Leave a Comment