शनिवार हा शनिदेवांचा वार आहे, ज्यांना न्यायाची देवता समजले जाते, या दिवशी सर्व लोक शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची पूजा अर्चा करतात,याशिवाय त्यांना शनिदेवांचा आशीर्वाद मिळावा म्हणून तऱ्हे – तऱ्हेचे उपायदेखील अवलंबले जातात.
शनिदेवांना अत्यंत क्रोधित देवता मानले जाते, जर एखाद्या व्यक्तीवर त्यांचा राग आलाच तर त्या व्यक्तीच्या जीवनात दु: खाचा डोंगर कोसळतो, त्या व्यक्तीने कितीही प्रयत्न केला तरी त्याला त्याच्या कामात यश मिळत नाही, त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
कोणतेही काम सहजपणे होत नाही, त्याशिवाय त्यांच्या आयुष्यात बऱ्याच समस्या उद्भवू लागतात, परंतु जर शनिदेव एखाद्या व्यक्तीवर प्रसन्न झालेत तर त्या व्यक्तीचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाते, त्या व्यक्तीची अगदी कमी प्रयत्नांत निरंतर प्रगतीकडे वाटचाल होत राहते.
शनिदेवांना कर्माचे फळ दाता देखील म्हणतात, शनिदेव चांगली कर्म करणाऱ्यांना शुभ परिणाम किंवा फळ देतात अशा लोकांच्या प्रति ते सदैव दयाळू असतात, परंतु जे वाईट कृत्य करतात त्यांना शनिवारी शनिदेवच्या क्रोधाचा सामना करावा लागतो.
म्हणून शनिवारच्या दिवशी काही गोष्टींची काळजी घेतल्यास शनिदेवांचा राग किंवा कोप टाळता येऊ शकतो, त्यासाठी आपण शनिवारी काही गोष्टींचे चुकूनही सेवन करु नये कारण या गोष्टी खाऊन तुम्हाला शनिदेवांच्या नाराजीचा सामना करावा लागू शकतो, म्हणून तुम्ही शनिवारी या गोष्टींचे सेवन करणे जाणिवपूर्वक टाळायला हवे.
चला तर जाणून घेऊयात शनिवारी कोणत्या गोष्टींचे सेवन करण्याचे आपण टाळायला हवे.
मसूर डाळ खाण्याचे टाळावे –
शक्य असल्यास शनिवारी मसूर डाळ खाण्याचे टाळावे, कारण मसूरची डाळ मंगळ ग्रहाला प्रभावित करते त्यामुळे आपले नुकसान होते, मसुरडाळ शनिच्या वक्री दृष्टीला वाढ देण्याचे काम करते, जर तुम्ही शनिवारी मसूरडाळीचे सेवन केले तर शनिदेवांच्या वक्र दृष्टीचा दुष्परिणाम तुमच्यावर लवकर होऊ शकतो, तुम्ही सेवन करू शकता. म्हणून तुम्ही शनिवारी हरभरा, उडीद आणि मूग डाळ यांचे सेवन करावे.

म द्य पा न करु नये –
शनिवारी चुकूनही कधी तुम्ही म द्य पा न करू नका, कारण जरी तुमच्या कुंडलीत शनि शुभ स्थितीत असेल तर त्याचे तुम्हाला कधीच शुभ फल मिळू शकणार नाहीत, आणि म द्य पा न केल्यामुळे तुमच्या अपघाताची शक्यताही बळावते.

गायीच्या दुधापासून बनवलेले दही खाऊ नका –
शनिवारी गायीच्या दुधापासून बनवलेले दही खाणे देखील निषिद्ध मानले जाते, जर तुम्हाला शनिवारी गायीच्या दुधाचे दही खायचे असेल तर तुम्ही ते तसेच खाऊ नये, तर त्यात हळद किंवा गूळ घालून तुम्ही त्याचे सेवन करू शकतात.

कैरीचे लोणचे खाऊ नका –
आपण शनिवारी कैरीचे लोणचे खाण्याचे टाळावे कारण कैरी आंबट आणि तुरट आहे आणि शनिदेवांना या आंबट तथा तुरट गोष्टी आवडत नाहीत.

लाल मिरची –
शनिवारी लाल मिरचीचा वापर चुकूनही नका कारण यामुळे शनिदेव तुमच्यावर रागावू शकतात, त्याऐवजी तुम्ही हिरव्या मिरच्या वापरल्यात तरीही चालेल.

अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या चांगल्या मातीसाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि हो मित्रांनो हा लेख शेयर करायला विसरु नका. या लेखामधील सर्व माहिती धार्मिक शास्त्र व समाज मान्यवर मिळालेल्या विविध स्रोतांमधून संकलित केली आहे.
या पाठीमागे कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवू देणे अथवा वाढीस लावणे असा कोणताही हेतू आमचा नाही. हेही समजून घ्यावे. अशाच प्रकारची विविध माहिती मिळविण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.