मित्रांनो, आपण पाहतो एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत नशिब खुपच उदारपणा दाखवत असते. वैभव अक्षरशः त्या व्यक्तीच्या पायाशी लोळण घेतांना दिसून येते. पण मित्रांनो, म्हणून जुने लोक असे म्हणतात की जेव्हा नशीब एखाद्यावर दया दाखवते तेव्हा नशिब अगदी फकीराला राजाही बनवत असते तसेच जेव्हा नशीब एखाद्या व्यक्तीवर रुसून बसते तेव्हा ते राजालाही रंक बनवत असते.
पण कुणा कुणाचं नशिबही आणि भवितव्यही माता लक्ष्मीसारखेच चंचल असू शकते, ते कुणाच्याही बाजूने उदार होऊन नेहमी त्याला साथ देत नाही. स्वतःच्या चांगल्या कर्मांनेच एखादी व्यक्ती आपले नशीब बदलू शकते, किंवा नशिब चमकवू शकते आणि या उलट कुणी वाईट कर्म केलेत तर त्याचं नशिब खराबही होते.
मित्रांनो, रोजच्या दिनचर्येतील अशा काही विशेष गोष्टी आहेत, असे काही नियम आहेत, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला नशीब साथ देत असते. आणि पर्यायाने ती व्यक्ती श्रीमंत सुद्धा बनते.
आता आपण बघणार आहोत की अशा कोणत्या गोष्टी आहेत असे कोणते नियम आहेत ज्यांच पालन केल्यास आपण देखील नशीबवान लोकांमध्ये गणले जाऊ शकतो .
1) सूर्य दर्शन –
मित्रांनो, रोज आपण सूर्योदय होण्यापूर्वी उठून आणि सूर्यदेवांचे दर्शन केल्याने आपले नशिब बदलते. सूर्योदयाच्या वेळी सूर्यापासून निघणाऱ्या उर्जेमधे सुर्याच्या किरणांमध्ये एक आश्चर्यकारक शक्ती असते, ज्या शक्तिमुळे आपलं आयुष्य सुखी बनते, तसेच रोज केलेल्या सुर्य देवांच्या दर्शनाने आपलं नशिबही उजळते.
2) गो सेवा –
मित्रांनो, आपल्या हिंदू संस्कृतीत गाईला देवतांचेच एक स्वरुप मानलं जातं. प्राचिन भारतात आपल्या घरामध्ये गायी पाळल्या जायच्या, प्रत्येक घरात एक तरी गाय ही असायचीच. त्याकाळी आपल्या पूर्वजांना घरात असलेल्या गोमातेच्या सेवेमुळे अनेक आशिर्वाद आपोआपच मिळत होते, पण आता गाईला पाळण्याची प्रथा जवळ जवळ बंद झाली आहे.
मित्रांनो, जर आपण गोमातेला रोज दोन भाकरी किंवा पोळ्या खाऊ घातल्या तल आपलं नशिब खरोखरच बदलते. पुराण कथांनुसार सर्व देवी-देवतांचा वास गोमातेमध्ये आहे. गाईच्या संदर्भातील प्रत्येक गोष्ट अमूल्य मानली जाते.
गाईकडून प्राप्त होणारी प्रत्येक वस्तू देवकार्यामध्ये वापरली जाते. गाईला धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुद्धा उपयुक्त मानले जाते. मित्रांनो, म्हणूनच आपल्या कडून जर गोमातेची सेवा घडली, किंवा तिला रोजच्या रोज घरातील स्वयंपाक घरातून ताजी भाकरी आपण खाऊ घातली तर त्या पुण्याच्या कामामुळे आपले नशिब बदलते.
3) भुकेलेल्यांना आहार देणे –
मित्रांनो, अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दानांपैकी एक मानले गेले आहे. जर भुकेलेल्या प्राण्यांना किंवा माणसाला आपण अन्नदान केले तर आपल्या कडून एक खुप पुण्याचं काम होत आहे.
उपाशी असणाऱ्या माणसांमध्ये एक वेदना असते, ज्या वेदनेवर अन्न ग्रहण केल्याने मात केली जाऊ शकते, म्हणून दररोज एक तरी भुकेल्या व्यक्तीला आपल्या कडून अन्न दिल्यामुळे आपला उत्कर्ष होत असतो. नशिबाची साथ आपल्याला त्या पुण्य कर्माने मिळायला लागते. गरिबी दूर होते, पर्यायाने त्या व्यक्तीच्या नशिबात श्रीमंती आपोआपच येते.
4) रात्री झोपताना डोक्याजवळ पाणी ठेवा –
मित्रांनो, धर्म आणि विज्ञान यांच्या दृष्टिकोनातून तांब्याच्या तांब्याभर पाण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपण रोज तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी भरुन ते रात्री झोपतांना उशाशी ठेवले तर ते सुद्धा फायदेशीर मानले जाते. असे केल्याने आपलं नशिब लवकरच उजळते, शास्त्रातही त्याचा तसा उल्लेख सापडतो.
5) झाडांना पाणी घाला –
मित्रांनो माणसाच्या जीवनात समस्त भूतलावर झाडांना तसेच वनस्पतींना एक विशेष स्थान देण्यात आले आहे. पृथ्वीवरील सर्व प्राण्यांच्या जीवनात झाडे आणि वनस्पती यांची फार महत्त्वपूर्ण भूमिका आहे. म्हणूनच असे म्हटले जाते की झाडांना पाणी घालण्याने देखील आपले नशीब पालटते.
तर मित्रांनो, या गोष्टी जर आपण आपल्या रोजच्या दैनंदिन उपक्रमात सामाविष्ट केल्यात तर तुमचं नशिब कधीही तुमची साथ सोडत नाही. या सोप्या नियमांनी तुम्ही तुमचं नशिब बनवू शकतात. या सोप्या नियमांनुसार आपल्या जीवनातील अडथळे दूर होतात आणि हळूहळू आपले नशिबही पालटू लागते.
टिप – वरील लेख केवळ धार्मिक मान्यतेचा आधारावर तयार करण्यात आला आहे. तरीही या माध्यमातून आमचा कोणतीही अंधश्रद्धा पसरविण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा कोणताही उद्देश नाही. मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक करा,शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा.