आपल्या देशात भारतात असे अनेक ऐतिहासिक किल्ले आहेत, जे त्यांच्या खास अशा कारणांमुळे खूप प्रसिद्ध आहेत. असाच एक किल्ला राजस्थानच्या भरतपुरातही आहे, ज्याचं नावं ‘लोहागडचा किल्ला’ (लोहागड) असं आहे. या किल्ल्याला भारतातील एकमेव अजिंक्य किल्ला असेही संबोधले जाते. कारण कोणीही तो किल्ला जिंकला नाही. इंग्रजांनी सुद्धा या किल्ल्या समोर अनेकदा पराभव स्वीकारला होता.
19 फेब्रुवारी 1733 रोजी जाट शासक महाराजा सूरज मल यांनी लोहगड किल्ल्याची पायाभरणी केली होती. तोफ व तोफखान्याचा प्रसार त्या काळात सर्वात जास्त प्रचलित असल्याने हा किल्ला बनविण्याचा एक विशेष प्रकारचा प्रयोग करण्यात आला जेणेकरून गोळाबारुदही या किल्ल्याच्या भिंतीशी आदळला तरी तो निष्फळ होणार होता.
या किल्ल्याच्या बांधकामाच्या वेळी सर्वप्रथम रुंद व मजबूत दगडाची उंच भिंत बांधली गेली. तोफांच्या गोळ्यांचा प्रभाव रोखण्यासाठी या भिंतीभोवती शेकडो फूट रुंद चिखलात बनलेल्या भिंती बांधल्या गेल्या आणि त्यामध्ये खोल व रुंद खंदक पाण्याने भरण्यात आले. अशा परिस्थितीत शत्रूने पाण्याचा अडसर ओलांडला तरी सपाट भिंतीवर चढणे केवळ अशक्य होते.
लोहगड किल्ल्यावर हल्ला करणे कोणालाही सोपे नव्हते. कारण तोफेतून उडालेला गोळा चिखलाने बनलेल्या भिंतीवर पडला की त्या भिंतीमध्ये धसून जायचा आणि त्यांची आगही शांत होऊन जायची. यामुळे किल्ल्याचे काहीही नुकसान होत नव्हते. हेच कारण आहे की या किल्ल्यात शत्रू कधीही प्रवेश करू शकला नाही.
हा किल्ला ताब्यात घेण्यासाठी इंग्रजांनी 13 वेळा किल्ल्यावर आक्रमण केले असे म्हणतात. इंग्रज सैन्याने येथे शेकडो तोफांचे गोळे डागले होते पण या तोफेच्या गोळ्यांचा किल्ल्यावर काही परिणाम झाला नाही. 13 पैकी एकाही आक्रमणात त्यांना किल्ल्यात प्रवेश करणे जमले नव्हते. असे म्हटले जाते की वारंवार झालेल्या पराभवामुळे निराश झालेल्ं ब्रिटीश सैन्य तेथून निघून गेले.
ब्रिटीश इतिहासकार जेम्स टाड यांच्या मतानुसार, या किल्ल्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या भिंतीच होत्या, ज्या विशेष मातीने बनविलेल्या आहेत. हा किल्ला जिंकणे म्हणजे लोखंडाचे हरभरे चावण्यापेक्षा कमी नव्हते. या किल्ल्याने शत्रूपासून नेहमीच वाचविले आणि शत्रूचे नामोहरम केले.