मित्रांनो अशी मान्यता आहे की, डोक्यावर शेंडी ठेवल्याने सर्व देवी देवता मनुष्याचे रक्षण करतात. चला तर , याचे धार्मिक आणि आध्यात्मिक फायदे जाणून घेऊया..!!!
हिंदू धर्मातील लहानात लहान तत्व , अगदी लहान गोष्ट देखील खुप फायदेशीर आहे. अगदी डोक्यावरील लहान शेंडी देखिल आपले कल्याण आणि विकासात महत्त्वपूर्ण भुमिका निभावते. शेंडीचा त्याग करणे म्हणजे स्वतःच्या हिताचा तसेच विकासाचा त्याग करण्यासारखे आहे.
ज्याप्रमाणे एखाद्या घड्याळाच्या छोट्या काट्याच्या जागी मोठा काटा काम करू शकत नाही, कारण जरी तो छोटा असला तरी त्याचे स्वतःचे असे महत्त्व आहे, त्याचप्रमाणे डोक्यावरील शेंडीला देखील एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. शेंडी न ठेवल्यामुळे आपण ज्या फायद्यापासून , प्रगतिपासून वंचित राहतो , त्याची झिज इतर कोणत्याही मार्गाने भरुन काढता येत नाही.
‘हरिवंश पुराणात’ एक कथा आहे. शक, यवन, कंबोज, पारद इत्यादी राजांना सोबत घेऊन हैहया व तळजुंघा वंशातील राजांनी राजा बाहूचे राज्य हिसकावून घेतले. यानंतर राजा बाहु आपल्या पत्नीसमवेत जंगलात निघुन गेला.
तिथे राजा बाहुचा मृत्यू झाला. त्यानंतर महर्षि और्व यांनी त्याच्या गर्भवती पत्नीचे रक्षण केले आणि तिला आपल्या आश्रमात घेऊन गेले. तेथे तिने एका मुलाला जन्म दिला जो नंतर राजा सगर म्हणून प्रसिद्ध झाला.
राजा सगर याने महर्षि और्व कडून शस्त्रे आणि शास्त्र याची विद्या आत्मसात केली. आणि योग्य वेळ साधून राजा सगरने हैहयांचा वध केला आणि त्यानंतर शक, यवन, कंबोज, पारद इत्यादी राजांना ठार मारण्याचा निश्चय केला.
हे शक, यवन इ. राजे महर्षि वशिष्ठांच्या चरणी शरण गेले व तेथेच आश्रय करु लागले. वशिष्ठ जींनी त्यांना काही अटींवर अभयदान दिले आणि सगरला त्यांना मारू नको असा आदेश दिला. राजा सगर आपले वचन तोडू शकत नव्हता आणि वशिष्ठच्या आज्ञेचा अवमान देखिल करू शकत नव्हता.
म्हणूनच, त्याने त्या राजांचे डोक्यावरील सर्व केस शेंडीसह काढून त्यांचे मुंडण करून त्यांना सोडले. कारण प्राचीन काळी कोणाचीही शेंडी कापणे मृ-त्युदंडासमान मानले जात होते.
आणि मित्रांनो अत्यंत खेदाची गोष्ट आहे की, आज हिंदू स्वतःच्या हातांनीच स्वतःची शेंडी कापत आहेत.
डोक्यावर शेंडी ठेवण्याचे महत्त्व…!!!
डॉ. हाय्वमन म्हणतात, “मी बरीच वर्षे भारतात राहिलो आहे आणि भारतीय संस्कृतीचा सखोल अभ्यास केला आहे. खुप पुर्वी पासून संपूर्ण भरतातील रहिवासी डोक्यावर शेंडी ठेवतात, ज्याचे वर्णन वेदांमध्येही केलेले आहे.
दक्षिणे कडील लोक तर अर्ध्या डोक्यावर, गोखुरासारखी शेंडी ठेवतात. दक्षिणे कडील लोकांच्या बुद्धीचे वेगळेपण पाहून तर मी खूप प्रभावित झालो आहे. नक्कीच बौद्धिक विकासात डोक्यावरील शेंडी पुष्कळ साहाय्यक असेल.
डोक्यावर शेंडी ठेवणे खूप फायदेशीर आहे. माझा हिंदू धर्मावर अगाध विश्वास आहे आणि मी देखिल डोक्यावर शेंडी ठेवण्याला समर्थन करतो आहे.
प्रख्यात अभ्यासक डॉ आय. ई. क्लार्क (एमडी).
‘‘मी जेव्हापासून प्राचीनकाळच्या विज्ञानाचा शोध घेतला, तेव्हापासून माझा विश्वास बसला की, हिंदूंचे प्रत्येक नियम वैज्ञानिकदृष्ट्या परिपूर्ण आहेत. शेंडी ठेवणे हिंदूंचा धर्मच नव्हे, तर सुषुम्नेच्या केंद्रांच्या रक्षणासाठी ऋषी-मुनींच्या शोधाचा विलक्षण चमत्कार आहे.’’
त्याचप्रमाणे पाश्चात्य विद्वान अर्ल थॉमस लिहितात,
‘‘सुषुम्नेचे रक्षण हिंदु लोक शेंडी ठेवून करतात. या उलट इतर देशांतील लोक डोक्यावर लांब केस ठेवून किंवा टोपी घालून करतात. यापैकी शेंडी ठेवणे सर्वांत लाभदायी आहे
मानवी शरीर प्रकृतीने इतके सुदृढ बनवले आहे की, ते मोठमोठे आघात सहन करूनही जिवंत रहाते; परंतु शरिरात काही अशीही स्थाने आहेत, ज्यांच्यावर आघात झाल्याने मनुष्याचा तत्काळ मृत्यू होऊ शकतो. यांना ‘मर्म-स्थान’ म्हटले जाते. शिखेच्या अधोभागातही मर्मस्थान असते, ज्याविषयी सुश्रुताचार्य यांनी लिहिले आहे की,
मस्तकाभ्यन्तरो परिष्टात् शिरा संधि सन्निपातो ।
रोमावर्तो धिपतिस्तात्रापि सद्यो मरणम् ॥
अर्थात – डोक्यावर जेथे केसांचा भोवरा असतो, त्याखाली आतील भाग नसा आणि सांध्यांशी संबंधित असतो, त्याला ‘अधिपतिमर्म’ म्हटले जाते. तेथे मार लागल्यास तत्काळ मृत्यू होतो.
सुषुम्नेच्या मूळ स्थानाला ‘मस्तुलिंग’ म्हणतात. मेंदूशी कान, नाक, जीभ, डोळे, त्वचा या पंचज्ञानेंद्रियांचा संबंध आहे आणि हात, पाय, गुदद्वार, गुप्तेंद्रिय इत्यादी कर्मेंद्रियांचा मस्तुलिंगाशी संबंध आहे.
मेंदू आणि मस्तुलिंग जितके सामर्थ्यशाली असतात, तितकेच ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये यांचे सामर्थ्य वाढते. मेंदूला शीतलता हवी असते, तर मस्तुलिंगाला उष्णता ! मेंदूला शीतलता प्रदान करण्यासाठी मुंडण करणे आणि मस्तुलिंगाला उब देण्यासाठी गोखुराच्या मापाचे केस ठेवणे आवश्यक असते. केस कुवाहक आहेत; म्हणून शेंडीचे लांब केस बाह्य अनावश्यक उष्णता अथवा थंडीपासून मस्तुलिंगाचे रक्षण करतात.
शेंडी ठेवल्याने होणारे इतर लाभ..!!!
शेंडी ठेवल्याने, तसेच शेंडीच्या नियमांचे यथोचित पालन केल्याने सद्बुद्धी आणि सद्विचार यांची प्राप्ती होते.
आत्मशक्ती प्रबळ बनून रहाते.
मनुष्य धार्मिक, सात्त्विक आणि संयमी बनून रहातो.
लौकिक आणि पारलौकिक कार्यात यश मिळते.
सर्व देवता मनुष्याचे रक्षण करतात.
सुषुम्नेच्या रक्षणाने मनुष्य निरोगी, बलवान, तेजस्वी आणि दीर्घायु होतो.
नेत्रदृष्टी सुरक्षित रहाते.
अशाप्रकारे धार्मिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक सर्वच दृष्टीकोनांतून शेंडीचे विशेष महत्त्व लक्षात येते; परंतु आजकाल हिंदु लोक पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणाने ‘फॅशनेबल’ दिसण्याच्या स्पर्धेत शेंडी ठेवत नाहीत आणि आपल्याच हातांनी हिंदु धर्म अन् संस्कृती यांचा त्याग करतात. लोक हसतील, मूर्ख म्हणतील, तर ते सहन करा; पण धर्माचा त्याग करू नका ! प्रत्येक मानवाचे कल्याण इच्छिणारी आपली हिंदु संस्कृती नष्ट होत आहे.
आणि येथे सांगायला खरोखरच खेद वाटतो की, हिंदू स्वतःच स्वतःच्या संस्कृतीचा नाश करू लागले, तर रक्षण कोण करेल ?
टीप – येथे दिलेली सर्व माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.
मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!