शिवलिंगावर बेलपत्र वाहताना करु नका या चूका, या मंत्राच्या जपाबरोबर करा हे कामं..!!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, श्रावण महिन्यात जर भगवान महादेवांना प्रसन्न करण्यासाठी, श्रावण सोमवारी भगवान शिवाची विशेष पूजा केली जाते.

भगवान शिव खूप भोळे असल्यामुळे, ते लवकरच त्याच्या भक्ताच्या प्रसन्न होऊन त्याच्या इच्छा पूर्ण करतात. हिंदू धर्मात हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो.

त्यामुळेच शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी,त्यांना दूध, मध, जल, उसाचा रस अशा प्रकारचे पदार्थ अर्पण केले जातात.

याशिवाय असावं सांगितले जाते की, आपण हजारो-लाखो फुले अर्पण करण्याचे पुण्य एक बेलपत्र वाहिल्यास मिळत असते. तसेच एक बेलपत्र वाहिल्याने कोटी कन्यादानाच फल  प्राप्त होतं.

अशा पद्धतीने त्रिदलापासून ते तेरा दलापर्यंत, तेरा दल हे आपल्याला भगवंताच्या कृपेनुसार मिळाल पाहिजे, तर ते जर आपल्याला मिळाल्यास, जेवढं तुम्हाला जास्त दलाचं बेल मिळेल तेवढे, त्याप्रमाणात ते शिवलिंगावर वाहिल्याने तुम्हाला पुण्य प्राप्त होईल.

त्या तीन दलामध्ये ,भगवान महादेवाचे तीन नेत्र धारण असल्याचे सांगितले जाते. हे बेलपत्र महादेवाला फार प्रिय आहे. त्यामध्ये  ब्रह्मा-विष्णू-महेश हे त्रिदेव आहेत व माता पार्वती, माता लक्ष्मी, माता सरस्वती या तीन देवी हि यामध्ये आहेत.

कायक, वाचक आणि मानसिक असे पाप नाश करणारेही याच्यामध्ये आहेत. त्यामुळे हे बेलपत्र आपण सोमवारी आणि चतुर्दशीला कधीच तोडू नये.

म्हणून सोमवारी किंवा चतुर्दशीला बेलपत्र तोडले आणि ते महादेवाला अर्पण केल्यास,त्याचा वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे हे बेळपत्र सोमवार लागणार असल्यास, रविवारी तोडून ठेवावे.

तसेच  तोडताना या बेलाच्या झाडांची फांदी कधीच तोडु नये. एक-एक बेलपत्र तोडून, हवी तेवढी बेलपत्रे घेऊन, ते घरी आणून त्यांना स्वच्छ पाण्याने धुऊन त्यामधील चांगले बेलपत्र एकत्र करून, खंडित किंवा तुटलेले बेळपत्र बाजूला काढावे आणि बेलपत्राच्या दांड्याच्या खाली एक गाठ असते, ती गाठ बोटांनी तोडून टाकावी.

पण तोडताना धारदार शस्त्राचा वापर करू नये.त्याचबरोबर खराब बेलपत्र इतरत्र न टाकता,एकाद्या झाडाच्या बुडख्यात टाकावीत.

याशिवाय हे बेलपत्र देवाना अर्पण करताना,नेहमी विषम संख्येत वाहावे.म्हणजे विषम संख्येत वाहताना १, ३, ५, ११, ५१, १०८.

या संख्येत बेलपत्र व्हायचे आहेत. याशिवाय कमीत-कमी ५ बेलपत्र शिवलिंगावर वाहावीत.तसेच एका बेलपत्रावर आपल्याला चंदनाने किंवा अष्टगंधाने ओम नमः शिवाय लिहायचे आहे.

त्यामधील बेलपत्रातील मोठं पानावरती ओम लिहावे,तर त्या खाली असणाऱ्या दोन पानांमधील डाव्या बाजूला नमः तर उजव्या बाजूच्या पानावर शिवाय लिहावे.

हे बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करताना उलटे करून म्हणजे ओम नमः शिवाय हा मंत्र स्पर्श शिवाच्या घालावे. तसेच बेलपत्र अर्पण करतेवेळी, ओम नमः शिवाय किंवा

|| त्रिदलं त्रिगुदररोजणाकारं त्रिनेत्रं च त्रियायुधम, त्रीजन्म पापसंहारं एकबिल्वम शिवार्पणम ||     

या मंत्राचा जप करावा.याशिवाय महामृत्युंजय मंत्र देखील म्हणू शकता.

अशा प्रकारे बेलपत्र अर्पण करून, महादेवांना प्रसन्न करून मनोवांच्छित फलप्राप्ती, धन-धान्य, आरोग्य, ऐश्वर्य, संतान प्राप्ती, संतान सुख, सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी महादेवांना बेलपत्र अर्पण करणं, हे सर्वात महत्वाचे आहे.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

Leave a Comment