श्री गणेशांच्या ‘या’ मंत्रोच्चाराने तुमचे घराचे अपूर्ण राहिलेले स्वप्न नक्कीच पूर्ण होईल.!!


ओम नमो नारायणाय.. मित्रांनो प्रत्येक व्यक्तीच एक स्वप्न असतं ते म्हणजे आपलं स्वतःचं घर असावं. आपण आपल्या जीवनामध्ये एकदा तरी घर बांधावं आणि आपल्या कुटुंबाला त्या घरांमध्ये आसरा मिळावा ते घर आपल्या स्वतःच्या मालकीचा असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. त्या दृष्टीने आपण प्रयत्न देखील करत असतो, धन कमावत असतो पैसा कमावत असतो मात्र प्रत्येक वेळी आपलं हे घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण होईलच, पूर्ण होतच असं नाही.

त्यामध्ये अनेक अडथळे येतात मित्रांनो जर आपल्या कुंडलीमध्ये काही दोष असतील किंवा आपल्या नशिबामध्ये जर गृहयोग नसेल म्हणजे घराचा जर योग नसेल तर अशा वेळी अनेक अडथळे येतात आणि आपल्या घराचं स्वप्न अपूर्ण राहतं. आपल्या प्रत्येकाला आपलं स्वतःचं घर असावं असं जर वाटत असेल तर आम्ही एक उपाय सांगत आहोत, वास्तु आणि ज्योतिष शास्त्र यांचा संयोग करून हा उपाय सांगत आहोत.

तर हा उपाय आपण केला तर आपल्याला देखील आपलं स्वतःचं घर बांधता येईल. त्यामध्ये अडथळे येत असतील तर हे अडथळे दूर होतील. मित्रांनो श्री गणेश म्हणजेच गजानन ही ज्ञानाची देवता आहेच मात्र आपण नवीन वास्तू मध्ये गृह प्रवेश करतो त्या वेळीदेखील श्रीगणेशाची प्रथम पूजा करावी लागते आणि या श्री गणेशाची जर आपण विशेष अशी उपासना केली तर आपल्या वास्तूचे स्वप्न नक्कीच पूर्ण होऊ शकतो.

आपल्याला ज्या वेळी आपली वास्तू उभारण्यासाठी नवीन जागा मिळवायची आहे त्या वेळी आपण संकल्पपूर्वक गणपतीच्या एकवीस संकष्ट्या कराव्यात किंवा आपण २१ मंगळवार देखील एकभुक्त उपवास करू शकतो. २१ संकष्ट्या किंवा २१ मंगळवार एकभुक्त उपवास धरा प्रत्येक मंगळवारी गणपतीला श्रीगणेशाला एक जास्वंदाचं फूल वाहत जा. ज्या वेळी आपण पूजा करतो त्यावेळी जास्वंदाचं फूल श्री गणेशाला अर्पण करा.

प्रत्येक मंगळवारी हे फूल अर्पण करावं हे फूल अर्पण केल्यानंतर त्यासोबतच 21 दुर्वा देखील आपण गणपतीला व्हाव्यात आपण सर्वांना माहिती आहे. गणपतीला दुर्वा किती प्रिय असतात आणि म्हणूनच २१ दुर्वा आपण अगदी मनोभावे या गणपति देवाला व्हाव्यात. दररोज आपण गणपती अथर्वशीर्षाचे पठण करा व मित्रांनो अथर्वशीर्षाचे पठण केल्याने श्री गणेशा पासून जी आपल्या फळ मिळणार आहे ती खूप लवकर मिळतात.

रोज आपण एक मंत्र आहे तो १०८ वेळा जपावा, तो मंत्र आहे श्री गजानन जय गजानन, माळ घेऊन १०८  वेळा आपण जप करावा तसंच दिवसभरामध्ये येता-जाता ज्या ज्या वेळी शक्य होईल त्या त्या वेळी आपण या मंत्राचे पठण करावे असे हे साधे आणि सोपे उपाय आहेत. हे जर केले आपल्या कुटुंबाने जर हे उपाय केले तर अगदी दीड ते दोन महिन्यांमध्ये तुम्हाला दिसेल की फरक जाणवू लागलाय तुम्ही तुमचं घर बांधण्याच्या दिशेने तुमचे प्रयत्न सुरू झाले आहेत, तुम्हाला यश मिळू लागलेल आहे.

मित्रांनो अगदी काही दिवसातच तुमचं घराच स्वप्न नक्कीच पूर्ण होईल, तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल तर तुमचं स्वतःचं घर निर्माण होईल जे घर बांधू लागले मात्र अनेक अडचणी आहेत, असे देखील दोष दूर होतील, त्यासाठी हे उपाय करून पहा.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज रॉयल कारभार नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर हि नक्की करा धन्यवाद..!!