Shravan Maas Upasana Mahadev Puja यंदा श्रावण सोमवार आठ आहेत.. पण मुख्य हे चारच आहेत.. बघा व्रत उपासना कधी आणि कशी करावी.?

Shravan Maas Upasana Mahadev Puja यंदा श्रावण सोमवार आठ आहेत.. पण मुख्य हे चारच आहेत.. बघा व्रत उपासना कधी आणि कशी करावी.?

नमस्कार मित्रांनो..या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे.. (Shravan Maas Upasana Mahadev Puja) मराठी वर्षातील महत्त्वाचा आणि व्रत-वैकल्यांची रेलचेल असलेला चातुर्मास सुरू झाला आहे. यंदा चातुर्मास विशेष मानला जात आहे. कारण यावर्षीच्या चातुर्मास महिन्यांत एक महिना अधिक आला आहे.

यंदाच्या वर्षी श्रावण महिना अधिक आला आहे. 19 वर्षांनी हा दुर्मिळ योग जुळून आला आहे. त्यामुळे यंदा श्रावणात 8 सोमवार येत आहेत. मात्र, आठही सोमवारी व्रताचरण, उपवास करावे का, असा प्रश्न अनेकांच्या मनात आला आहे. नेमके किती श्रावणी सोमवार करायचे.? कधी व्रतोपासना करावी? यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात..

हे सुद्धा पहा : Vajra Yoga Pushya Nakshatra वज्र योग व शुभ पुष्य नक्षत्र कोण कोणत्या राशीसाठी ठरणार फायदेशीर.!!

चातुर्मास सुरू झाल्यानंतर पहिला श्रावण महिना येतो. श्रावण महिना महादेवांना समर्पित असल्याचे सांगितले जाते. भगवान शंकराच्या पूजेसाठी श्रावण विशेष मानला जातो. यावर्षीचा श्रावण खूप खास असल्याचे बोलले जात आहे. नियमित श्रावण महिन्यात 4 किंवा 5 श्रावणी सोमवार येतात. मात्र, यंदाचा श्रावण संपूर्ण दोन महिन्यांचा असणार असून, महादेवाचे पूजन, (Shravan Maas Upasana Mahadev Puja) नामस्मरण, आराधना करण्यासाठी भाविकांना चार नव्हे तर आठ श्रावणी सोमवार मिळणार आहेत.

सन 2023 मध्ये मंगळवार, 18 जुलै 2023 रोजी अधिक श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. तर अधिक श्रावण महिन्याची सांगता बुधवार, 16 ऑगस्ट 2023 रोजी होणार आहे. तर निज म्हणजेच नियमित श्रावण महिना गुरुवार, 17 ऑगस्ट 2023 पासून सुरू होत असून, निज श्रावण महिना शुक्रवार, 15 सप्टेंबर 2023 रोजी संपत आहे.

म्हणजेच अधिक आणि निज असे दोन महिने धरल्यास श्रावण महिना 59 दिवसांचा असेल, असे सांगितले जात आहे. यापूर्वीही 2004 या वर्षी म्हणजे 19 वर्षांपूर्वी श्रावण हा अधिक महिना आलेला होता. (Shravan Maas Upasana Mahadev Puja) पुढे 2042 साली परत श्रावण हा अधिक महिना येईल.

अधिकमासामध्ये काम्यकर्मे वर्ज्य करत, निष्कामकर्मे करावीत असे शास्त्र सांगते. त्याचप्रमाणे अधिक महिन्यात विवाह, उपनयन, उत्सव, कोणत्याही व्रताचे उद्यापन, गृहप्रवेश, वास्तुशांती, प्रथम तीर्थस्नान, प्रथम देवदर्शन, देवांची प्राणप्रतिष्ठा, नवीन कामास प्रारंभ, नारायण-नागबली, त्रिपिंडी श्राद्ध, नवीन कोणतेही पदग्रहण, नवीन वस्त्रे व दागिने धारण करणे यांसारखी कामे वर्ज्य करावीत, असे शास्त्रात सांगितलेले आहे.

यंदा 2023 वर्षी श्रावण महिना अधिक महिना आल्यामुळे श्रावणात एकूण आठ सोमवार आलेले आहेत व आठही सोमवार ‘सोमवारचा उपवास’ करायचा का? असा संभ्रम लोकांमध्ये आहे. (Shravan Maas Upasana Mahadev Puja) परंतु कोणतेही काम्य (श्रद्धेने केले जाणारे) व्रत अधिक महिन्यात करू नये असे शास्त्र असल्यामुळे अधिक महिन्यातील सोमवारी श्रावणी सोमवारचा उपवास करू नये तर अधिक महिन्यानंतर येणाऱ्या निज श्रावणातील सोमवारीच फक्त श्रावणी सोमवारचा उपवास करावा, असे शास्त्र सांगते.

अधिक मासानंतर 17 ऑगस्ट 2023 पासून निज श्रावण सुरू होत असून, तर निज श्रावण महिना शुक्रवार, 15 सप्टेंबर 2023 रोजी संपत आहे. निज श्रावण महिन्यात श्रावणी सोमवारी केली जाणारी व्रते, उपासना करता येणार आहेत.

निज श्रावण महिन्यातील पहिला श्रावणी सोमवार, 21 ऑगस्ट 2023 रोजी येत आहे. दुसरा श्रावणी सोमवार, 28 ऑगस्ट 2023 रोजी आहे. (Shravan Maas Upasana Mahadev Puja) तिसरा श्रावणी सोमवार, 04 सप्टेंबर 2023 रोजी आहे. तर शेवटचा म्हणजेच चौथा श्रावणी सोमवार, 11 सप्टेंबर 2023 रोजी आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!