श्रावणमासात ही एक वस्तु देवघरात ठेऊन करा मनोभावे पूजा : महादेव देतील आशिर्वाद : घडेल साक्षात्कार..!!

श्रावणमासात ही एक वस्तु देवघरात ठेऊन करा मनोभावे पूजा, महादेव देतील आशिर्वाद, घडेल साक्षात्कार..!!

नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं रॉयल कारभार या आपल्या मराठमोळ्या पेजवर..!!

मित्रांनो, हा उपाय केल्याने आपल्या घरात शाश्वत सौभाग्य लक्ष्मी नांदते. हा उपाय करताना तुम्ही फक्त संपूर्ण श्रावणमास देवघरात एक वस्तू ठेवायची आहे. आणि एवढं केल्याने सर्व काही अगदी तुमच्या मनासारखं घडायलाच हवे. मित्रांनो, ते सर्वकाही तुम्हाला मिळेल जे तुम्ही मनामध्ये ठरवणार आहे.

येणाऱ्या काही दिवसात सर्वात पवित्र महिना श्रावण सुरू होणार आहे. या महिन्यात महादेवाची भक्ती केल्याने महादेव आपल्यावर प्रसन्न होतात.

हा महिना आपल्या हिंदू बांधवांसाठी अत्यंत पवित्र असा महिना मानला जातो, या महिन्यात श्रावण सोमवारचे व्रत बरेचसे भक्त मनोभावाने करत असतात. या व्रताचे उद्यापन केल्याने महादेव भक्तांना अपार आनंद आणि आरोग्य दायी आयुष्य प्रदान करतात. तसेच भक्तांच्या बर्‍याचशा मनोकामना देखील पूर्ण करतात.

मित्रांनो हा उपाय करतांनाच तुम्हाला फक्त या उद्यापना बरोबर या श्रावण महिन्यात संपूर्ण श्रावण महिनाभर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये एक वस्तू ठेवायची आहे. आणि रोजच्या देवपूजेबरोबरच या वस्तूचे महिनाभर विधिवत पूजन करायचे आहे. अगदी श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हाला या वस्तूचे विधिवत पूजन करायचे आहे.

मित्रांनो, ही वस्तू कोणती आहे हे आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, तर मित्रांनो तुम्हाला फक्त पूजा सामग्रीच्या दुकानातून एक पूजेची नवीन सुपारी घेऊन यायची आहे. लक्षात असू द्या मित्रांनो या उपायासाठी तुम्ही नविन सुपारीच वापरावी. घरात असलेली सुपारी वापरायची नाहीए.

तर मित्रांनो, ही सुपारी तुम्ही श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी आपल्या घरातील देवघरात ठेवायची आहे. त्या सुपारीची हळदी, कुंकू, अक्षता, फुलं वाहून पुजा करायची आहे. तसेच आरती दाखवून अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. त्याचबरोबर त्या सुपारीची दररोज न चुकता संपूर्ण श्रावण महिना आपल्याला मनोभावे पूजन करावयाचे आहे.

या पुजनाच्या सांगतेच्या शेवटी तुम्ही हात जोडून, तुम्हाला हवं असेल ते मनातच मागायचे आणि रोज करतात तशी विधिवत तुमची सेवा असेल ती करायची, तसेच महादेवाची आरती तथा मंत्रोच्चार करायचा आहे. आणि ती सुपारी महिनाभर आपल्या देवघरातच राहू द्यावी सकाळी देवपूजा करताना देवघर साफ करताना.

आपण तिला उचलून स्वच्छ करून पुन्हा तिच्या जागी स्थापन करायचे आहे‌. नंतर मग महिना झाल्यानंतर श्रावण महिना संपल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी तुम्ही त्या सुपारीचं वाहत्या पाण्यात विसर्जन करावयाचे आहे.

असे केल्याने तुमच्या घरातली सगळ्या अडचणी, संकटं, समस्या, दुःख, घरातून निघून जाणार आणि तुमच्या घरामध्ये सुख, समृद्धी, तथा भरभराटी नांदणार.

साक्षात सौभाग्य आणि अखंड लक्ष्मी नांदेल, आनंद नांदेल, बरकत वाढती राहील, अडकून पडलेली सर्व कामं पूर्ण होतील. या उपायाने यश तर लाभतेच पण तुमची किर्ती चोहीकडे पसरेल. तर मित्रांनो त्यासाठी संपूर्ण श्रावण महिनाभर तुम्ही नक्कीच देवघरात एक पुजेची सुपारी अगदी श्रद्धेने व विश्वासाने अवश्य ठेवावी.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

Leave a Comment