श्रावण महिन्यात चुकूनही ही पाच कामं करू नका.. दरिद्रता येईल.!!


स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर…. मित्रांनो, आपल्यापैकी अनेकजण वेगवेगळ्या देवी देवतांचे भक्त आहेत. ते अगदी मनोभावे व श्रद्धेने पूजा करीत असतात. मित्रांनो सोमवार हा भगवान शंकरांचा वार मानला जातो. या दिवशी अनेक भक्त भगवान शंकरांची पूजा करीत असतात. परंतु श्रावण महिन्यात पूर्ण महिना हा शंकरांच्या पूजेमध्ये भक्त व्यथित करतात. त्यामुळे शिवभक्त हे श्रावण महिन्याचे अगदी आतुरतेने वाट पाहत असतात. हा एक खूपच पवित्र व शिवमय महिना मानला जातो. अशी मान्यता आहे की श्रावण महिन्यामध्ये शंकर हे आपल्या सासरी पहिल्यांदा आले तेव्हा त्यांचे खूपच भव्य पद्धतीने स्वागत केले होते.

तसेच श्रावण महिन्यात शिवशंकरांनी सागर मंथनातून हलाहल वि’ ष प्राशन करून सृष्टीचे रक्षण देखील केले होते. वि’ ष प्राशन केल्यानंतरच शंकरांना निळकंठ हे नाव प्राप्त झाले. मित्रांनो श्रावण महिन्यात शिवशंकराची आराधना प्रत्येकानेच करावी. त्यामुळे शिवशंकरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि त्यामुळे आपल्या जीवनातील जे काही दुःख दरिद्रता आहे सर्व निघून जाते. श्रावण महिना हा पवित्र महिना मानला जातो. त्यामुळे या महिन्यात काही नियमांचे पालन देखील करणे गरजेचे आहे.

हे काही नियम पाळून जर तुम्ही शंकरांची पूजा केली तर भगवान शंकर हे आपल्यावर प्रसन्न होतात. जर आपण काही नियम पाळले नाहीत तर त्याचा वाईट परिणाम आपल्या जीवनावर झालेला आपणाला पाहायला मिळेल. तर मित्रांनो श्रावण महिन्यामध्ये प्राप्तकाली उठून जर तुम्ही गंगास्नान करून शिव मंदिरामध्ये जाऊन जलाभिषेक शंकरांचा केला तर हे खूपच आपल्या जीवनासाठी व भगवान शंकरांचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी फायदेशीर ठरते.

परंतु आजकाल नदीमध्ये गंगास्नान करणे खूप कठीण आहे. त्यामुळे तुम्ही घरच्या घरी गंगेचे नामस्मरण करून स्नान करायचे आहे. आणि शंकरांची पूजा करायचे आहे. श्रावण महिना हा खूपच पवित्र असल्याकारणाने या महिन्यात कोणीही अंघोळ न करता राहणे खूपच अशुभ आहे. त्यामुळे जो कोणी आंघोळ केली नाही त्यांचे सर्व पुण्य काम नष्ट होतात आणि शंकरांचा वाईट आशीर्वाद त्यांना मिळतो.

श्रावण महिन्यात पवित्र स्नान करणे गरजेचे आहे. श्रावण महिन्यात शिवजींना जलाभिषेक करणे खूपच महत्त्वाचे मानले जाते. कारण असे मानले जाते की, शिवजींच्या मस्तकावर अग्नी विराजमान असते. त्यामुळे या अग्नीला शांत करण्यासाठी शिवजींचा जलाभिषेक करणे गरजेचे असते. कोणताही भक्त शिवजींना जल अर्पण करून भस्म, दही, दूध याचा अभिषेक करेल त्या भक्तांवर शिवजी प्रसन्न होतात.

जो भक्त शिवजींना जल अर्पण करत नाही त्या भक्तांपाशी असणारे सर्व संपत्ती नष्ट होते. तसेच कोणत्याही भक्त अगदी भक्तिभावाने जल अर्पण करेल या भक्तांच्या धनसंपत्तीत भरपूर वाढ करतात.

सोमवार हा शिवजिंचा वर मानला जातो. श्रावण महिन्यामध्ये प्रत्येकाने सोमवारचे व्रत अवश्य करावे. असे म्हटले जाते की जीही कुमारिका सोमवारचे व्रत भक्ती भावाने करेल त्या कुमारीकेला माता गौरी आणि माता पार्वतीचा आशीर्वाद प्राप्त होऊन तिच्या आवडीचा वर तिला प्राप्त होतो. माता पार्वतीने घोर तपस्या करून शंकरांना आपला वर प्राप्त करून घेतले होते. त्याप्रमाणे कुमारिका मुलींनी जर सोमवारचे व्रत केले तर त्यांना देखील त्यांच्या आवडीचा जोडीदार मिळतो. प्रत्येक व्यक्तीने श्रावण महिन्यातील एक तरी सोमवारचे व्रत अवश्य करावे.

श्रावण महिन्यामध्ये सात्विक आहार सगळ्यांनी घ्यावा. या महिन्यांमध्ये मांस व मद्याचे सेवन करू नये. जर कोणीही मांस व मद्याचे सेवन केले तर भगवान शंकरांच्या रागाचा सामना त्यांना करावा लागेल. कारण शंकर हे पशुपतीनाथ आहेत. त्यामुळे पशूंचे प्राण घेणे हे वाईट मानले जाते. त्यामुळे श्रावण महिन्यात कोणीही मांस व म’ द्याचे सेवन करू नये. तसेच श्रावण महिन्यामध्ये सगळ्यांनी लवकर उठावे. लवकर उठून स्नान करून शंकर यांची पूजा करावी.

जो कोणी मनुष्य लवकर उठत नाही, लवकर स्नान करत नाही किंवा स्नान न करता भोजन करतो अशा लोकांवर शिवजी आपला कृपा आशीर्वाद कधीच देत नाहीत. उलट त्या लोकांच्या जीवनामध्ये अनेक संकटेच निर्माण होतात. त्यामुळे जो कोणी भक्त ब्रह्म मुहूर्तावर उठून अंघोळ करून शिवजींचा ओम नमः शिवाय असे 108 वेळा जप करतो त्या भक्तांवर शिवजी प्रसन्न होऊन आपला कृपा आशीर्वाद देतात व त्यांना कोणत्याही प्रकारची कमतरता भासू देत नाहीत.

श्रावण महिन्यात कोणीही आपले केस कटिंग तसेच दाढी करू नये. तसेच श्रावण महिन्यात चमड्यांचे वस्तू देखील वापरणे अयोग्य मानले जाते. श्रावण महिन्यात पती-पत्नी जे व्रत करतात त्या अशा पती-पत्नीनी सोमवारच्या दिवशी शारिरीक संबंध ठेवू नये. कारण त्यामुळे शरीर अपवित्र मानले जाते. त्यामुळे शिवजिंची पूजा करणे वर्जित मानले जाते. त्यामुळे या गोष्टीकडे पती-पत्नीनी लक्ष दिले पाहिजे.

श्रावण महिन्यामध्ये कोणीही महिलांना अपशब्द वापरू नये. आपल्या घरामध्ये पत्नी, बहीण, मुलगी या सगळ्यांनाच अपशब्द श्रावण महिन्यामध्ये अजिबात वापरू नये. जर तुम्ही अपशब्द वापरला तर भगवान शंकर हे आपल्यावर नाराज होतात व ते कधीच आपल्यावर प्रसन्न होत नाहीत. त्यामुळे भगवान शंकरांना प्रसन्न करून घ्यायचे असेल तर घरातील महिलांना अपशब्द वापरू नये.

तर मित्रांनो वर सांगितल्याप्रमाणे अशा काही गोष्टी आपण जर श्रावण महिन्यात पाळल्या तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदु लागेल. आपणाला कशाचीच कमतरता भासणार नाही व आपल्या घरामध्ये गरिबी कधीच भासणार नाही.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!