Thursday, June 8, 2023
Homeअध्यात्मश्रावणात दही आणि दूध करावेत वर्ज्य : येथे जाणून घ्या यामागील शास्त्रीय...

श्रावणात दही आणि दूध करावेत वर्ज्य : येथे जाणून घ्या यामागील शास्त्रीय कारणं काय आहेत..!!

नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. श्रावण महिना हा भगवान शंकराला समर्पित असून या महिन्यात महादेवाची मोठ्या भक्तीने पूजा केली जाते. याबरोबरच श्रावण महिन्यात काही वस्तूंचे सेवन करण्यास मनाई केली आहे. यामध्ये प्रामुख्याने दूध, दही, वांगी आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश आहे.

याव्यतिरिक्त, लसूण, कांदा तथा मां स अ ल्को हो ल चे सेवन देखील या महिन्यात करू नये असे बोलले जाते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की या गोष्टी न खाण्यामागे वैज्ञानिक पैलू का आहेत आणि धार्मिक श्रद्धा काय म्हणतात.

दुध आणि दही बद्दल लोकांमध्ये अशी धार्मिक श्रद्धा आहे की श्रावणामध्ये भगवान शिव यांना दुधाचा आणि दहीचा अभिषेक केला जातो, त्यामुळे असे मानले जाते की दूध आणि दही या महिन्यात टाळावे.

त्याचबरोबर यामागील शास्त्रीय तर्क हे आहे की श्रावण महिना पावसाचा असतो आणि या महिन्यात अनेक प्रकारचे कीटक गवत, झुडपे, वनस्पती आदिंवर फुलतात.

हे गवत आणि झाडे गायी आणि म्हशींसाठी चारा म्हणून खाल्ले जातात. अशाप्रकारे, हे कीटक गवत आणि पेंढा सोबत त्यांच्या पोटापर्यंत पोहचण्याची भीती असते आणि त्यातूनच ते दुधातही आढळून येऊ शकतात.

म्हणूनच दूध पिण्यास मनाई आहे. दही आणि लोणी दुधापासून बनवले जाते, त्यामुळे दुग्धजन्य पदार्थ खाण्यास मनाई केली जाते. परंतु तुमची इच्छा असेल तर तुम्ही उच्च तापमानावर दूध तापवून त्याचे सेवन देखील करू शकतात.

धार्मिक श्रद्धेनुसार काही लोक श्रावनमध्ये वांगी आणि पालेभाज्या खात नाहीत. वांगी धार्मिक समजुतीनुसार अशुद्ध मानले जाते. तर त्याचवेळी विज्ञान म्हणते की श्रावन महिन्यात वांग्यामध्ये किडे पडत असतात.

दुसरीकडे हिरव्या पालेभाज्यांनाही किडे मिळतात. जर तुम्ही या भाज्या खाल्ल्या तर हे शक्य आहे की तुमच्या पोटात जाऊन हे जंत आणि जीवाणू रोग निर्माण करू शकतात.

यासाठी या काही वस्तू श्रावण मासात खाण्याचे टाळावे.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स