श्री कृष्ण म्हणतात : पैसे कमावल्यानंतर जरुर करा ही 2 कामं : अन्यथा तुमच्या पैशांची किंमत शून्य आहे..!!!

पैसे भरपूर कमवता पण ह्या दोन गोष्टी नाही केल्यात तर, माता लक्ष्मी होतील नाराज
कमाईची केव्हा गमाई होईल कळणारही नाही.

भरपूर पैसे कमवता पण पैसेच नाही असे नेहमी रडत असतात. पगार मिळण्याच्या दिवशी सुद्धा रडतात की खूप कमी पगार मिळतो. अशा व्यक्तींनी ही माहिती अवश्य वाचायला हवी.

आजकाल प्रत्येक व्यक्तीचा पैसे कमवण्यासाठी संघर्ष चालु असतो. प्रत्येकजण चांगले शिक्षण घेऊन त्याच्या कुवतीनुसार भरपूर पैसे कमवण्याचा प्रयत्न करतो. बरेच लोक इतके पैसे कमवतात की त्यांच्या गरजाही पूर्ण होतात आणि त्यांच्या तिजोऱ्या देखील पैश्याने भरलेल्या असतात.

असे लोक जे मिळवलेल्या पैशाचा योग्य वापर करत नाहीत, त्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की पैसा कधीही कोणाजवळ जास्तकाळ टिकत नाही. लक्ष्मी नेहमी खेळती रहायला हवी. तिचा केवळ सं च य करून ती तिजोरीत जमा करून ठेवल्याने लक्ष्मी माता नाराज होते.

तुम्ही कितीही पैसे कमवा परंतु या अशा दोन महत्वाच्या गोष्टी केल्या नाही तर हाती आलेली लक्ष्मी क्षणार्धात लोप पावते. आपल्यावर लक्ष्मी कायम प्रसन्न राहावी आणि स्थिर राहावी यासाठी काही गोष्टी केल्या पाहिजेत. या गोष्टी केल्याने घरात वैभव,सुख, समृद्धी विराजमान होतात.

आचार्य विष्णू शर्मा यांनी रचलेल्या पंचतंत्रात सांगितल्यानुसार संपत्तीचा वापर दोन प्रकारे केला पाहिजे. दान आणि उपभोग. परंतु धनाचा अतिसंचय करु नये.ज्याप्रमाणे मधमाश्यांद्वारे जमा केलेले मध नेहमीच दुसरे घेऊन जातात. तसेच आपल्या बरोबर होऊ नये यासाठी ही दोन कामे अवश्य करावी.

दा न धर्म –
आपण जी काही संपत्ती कमवतो त्यातील काही भाग दान करा, धर्मदायी संस्थांना द्या. असे केल्याने तुमची कमाई दिवसेंदिवस चौपट होते. म्हणून आपले धार्मिकशास्त्र सांगते, की आपल्या कमाईचा काही भाग गरजू, गोरगरीब , दुखी, कष्टी अशा लोकांना दा न करावा.

त्यामुळे आपल्याला त्यांचे पुण्य लाभते आणि शुभ आशिष देखिल मिळतात. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. असे केल्याने माता लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्यावर सदैव राहील. परमार्थापेक्षा मोठे पु ण्य नाही. आपण कोणाच्यातरी आनंदाचे कारण बनणे यासारखे दुसरे पु ण्य कर्म नाही.

उ प भो ग –
संपत्तीचा उ प भो ग हा आनंदाने आणि समाधानाने घ्यायला हवा. आपण कमावलेले पैसे स्वतःवर आणि आपल्या कुटुंबियांवर आनंदाने , निःसंकोचपणे खर्च करणे हे दा न करण्याइतकेच महत्वाचे आहे.

याचा अर्थ असाआहे की, पैसे कमवण्याबरोबरच पैशाचा आनंद घेणे देखील खूप महत्वाचे आहे. आपल्याजवळ पैसे असूनही आपल्या कुटुंबियांना देताना काचकुच करणे, त्यांना पैश्यासाठी तरसावणे, पैसे खर्च करताना कं जु षी करणे या अशा प्रकारचे महाभाग असतात.

ज्यांना पैसा असूनही कधीच समाधान लाभत नाही. असे लोक कायम अस्वस्थ राहतात. म्हणजेच फक्त पैसा असून चालत नाही तर त्याचा आनंदाने उपयोग केला पाहिजे. तरच आपल्याला सुख समाधान लाभते.

अशा लोकांसाठी पैसे कमवणे निरुपयोगी आहे, मग ते लोक जे आयुष्यभर पैसे कमवायच्या मागे लागतात, दानधर्म करत नाही, पैश्याचा आनंदाने उपभोग घेत नाहीत, अशा व्यक्तीची कमाई काही उपयोगाची नसते.

पैसा पैसा करतच असे लोक म र ण पावतात. मरणानंतर त्यांची संपत्ती सुद्धा त्यांचे आप्तस्वकीय उ प भो ग ता त. म्हणूनच माणसाने स्वतःसाठी तरी आवश्यक असेल तितका तरी पैसा खर्च करावा. आपल्याला आवश्यक असेल तितकेच पैसे बचत करुन ठेवावे.

अनावश्यक संपत्तीचा साठा करून ठेवू नये. देवाच्या नावाने गरिबांना मदत करणे हा देखील कमाईचा योग्य वापर मानला जातो. याद्वारे नक्किच आपल्या घरात बरकत येईल.

टिप – येथे दिलेली सर्व माहिती धा र्मि क श्र द्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आपले पेज रॉयल कारभार लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

Leave a Comment