श्री स्वामी महाराजांचे सुरक्षा कवच घरच्या घरी कसे बनवावे.?

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांना माहिती आहे की, सुरक्षा कवच लक्ष्मी माता, कुबेर भगवान, हनुमान, भोलेनाथ शंकराचे सुद्धा सुरक्षाकवच असतं. श्री स्वामी समर्थांचे सुरक्षाकवच घरच्या घरी कसा बनवावे हे बघुयात..

आपल्या सर्वांच्या मनामध्ये एक प्रश्न असतो आणि जेव्हा आपण कोणतेही शुभ कार्य करतो, किंवा घराच्या बाहेर पाय ठेवतो. तेव्हा आपल्या मनामध्ये प्रश्न येतो की, आज ही डील करायला चाललोय ही होणार की नाही? किंवा मला कुणाची नजर लागेल का ? जाता जाता तुम्हाला कोणी टोकले असेल तर असे म्हणतात कि, तुमचं कोणतही कार्य होत नाही.

माझ आज काय हे काम होणार नाही! असे काहीसे प्रश्न आपल्याला पडत असतील. म्हणून आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचा सुरक्षाकवच बनवायच आहे. आता प्रश्न पडेल की रोजच्या रोज कसा सुरक्षाकवच बनवावा?

आम्ही तर रोज घराच्या बाहेर पडतो ऑफिससाठी, काही कामासाठी आणि सकाळी आंघोळ झाल्यानंतर आपली रोजची पूजा अर्चना करायची, सूर्याला पाणी घालायचं, त्यानंतर आपण आपल्या देवघरासमोर आपले दररोजचे नित्यक्रम वाचायचं.

श्री स्वामी समर्थ महाराजांची एक माळ घ्यायची आणि “श्री स्वामी समर्थ” असा जप ती पूर्ण माळ करायची. आणि मनामध्ये चांगली भावना ठेवायची. ती माळ जप झाल्यानंतर आपल्यासमोर देवघरात ठेवलेला पाण्याचा ग्लास असतो.

अगरबत्ती लावलेली असते. तेव्हा एक वेळेला तारक मंत्र म्हणा. जर कोणाला शक्य असेल त्यांनी अकरा वेळा म्हणा. जर अकरा वेळा शक्य नसेल तर एक वेळा म्हणा. एक माळ आणि एक तारक मंत्र आणि त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांना अष्टगंध लावायचा.

तोच टिळा आपण आपल्या कपाळाला लावायचा. हेच आपलं सुरक्षा कवच आहे. तुम्ही कोणती विधी करता देवासमोर बसता, मंत्र जप करता किंवा कोणती सेवा करत असताना आपल्या बाजूला एक सुरक्षा कवच तयार होत असत त्याला ओवरा म्हणतात.

हे कवच जेव्हा तयार होते त्यावेळी सगळ्यात जास्त सुरक्षित असतो. त्या वेळेस खूप वेगळी शक्ती आपल्या बाजूला जाणवत असते, देवासमोर जाऊन बसल्यावर खूप चांगलं वाटतं.तेव्हा आपल्या भोवती एक सुरक्षा कवच तयार झालेलं असते.

त्यामुळे तो अष्टगंधाचा टिळा तुम्ही तुमच्या कपाळावर लावायचा आहे आणि टिळा लावल्या नंतर मनामध्ये एकाच भाव ठेवायचा आहे. की हे स्वामी समर्था तू अनंत कोटी ब्रम्हांडनायक आहेस, या जगाचा चालन हर्ता पालन हर्ता तूच आहेस.

मी आता बाहेर निघत आहे. माझ एक काम आहे ते होऊ द्या. त्याच्यानंतर पाया पडा आणि तिथून उठा. एकदम मागे नाही बघायचं. त्यानंतर पाया पडून थोड मागे येऊन मग पलटायच आहे.आपली पाठ एकदम स्वामी समर्थांना नाही दाखवायची आहे.

तेव्हा आपलं सुरक्षा कवच पूर्ण होत. मग त्याच्यानंतर तुम्ही कोणतेही काम करा तुमचे सर्व काम पूर्ण होतील. तर मित्रांनो वर सांगितलेल्या पद्धतीने तुमच्या घरामध्ये स्वामींचे हे सुरक्षा कवच तयार केले त्यामुळे तुमच्या सर्व अडचणी दूर होतील.

त्याचबरोबर स्वामी समर्थांचे आशीर्वाद देखील साक्षात तुमच्या सोबत कायम राहतील तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घरामध्ये स्वामींचे एक वचन नक्की तयार करा आणि त्याचा वापरही करा स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायम राहील.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

Leave a Comment