Monday, December 4, 2023
Homeअध्यात्मश्रीफळावर कर्पूर जाळून बोला समर्थांचा हा मंत्र, एकाच रात्रीत समर्थ करतील चमत्कार.

श्रीफळावर कर्पूर जाळून बोला समर्थांचा हा मंत्र, एकाच रात्रीत समर्थ करतील चमत्कार.

मित्र आणि मैत्रिणींनो तंत्रशा’स्त्रातला एक अतिशय प्रभावशाली उपाय विधीच्या अनुषंगाने आज आपल्या समोर आम्ही मांडत आहोत, शास्त्रात कर्पूर होम या नावाचा एक असा विधी सांगितलेला आहे.

हा विधी करण्यासाठी आपल्याला लागणार केवळ कापुराच्या थोड्या वड्या आणि एक नारळाची पूर्तता करणे गरजेचे आहे. पण हा कापूर ऑर्डिनरी शॉप मध्ये मिळणारा कापूर नसावा.

या विधिसाठी आपल्याला लागणार आहे भिमसेनी कापूर , हा कापूर रासायनिक नसतो. शतप्रतिशत खरा आणि अशा प्रकारच्या विविध विधी साठी वापरात येणारा ओरिजनल कापूर असतो. तर हे लक्षात राहू द्या की कापूर हा भीमसेनीच असावा. चला तर आता पुढचा विधि कसा करावा याबाबत माहिती करुन घेऊया.

या विधिसाठी आपण जो नारळ आणणार आहोत तो आपल्याला व्यवस्थित सोलून घ्यायचा आहे. त्याची जी शेंडी आहे ती आपण तशीच ठेवायची आहे. तो सोललेला नारळ घेऊन आपण देवघरासमोर बसायचे आहे, यावेळी नारळाची शेंडी ही देवघराकडे किंवा देवांकडे करून नारळ पाटावरती ठेवून द्यायचा आहे. नंतर या नारळावरती आपण आणलेल्या भीमसेनी कापुराच्या 7 वड्या ठेवायच्या आहेत. मात्र या वड्या ठेवण्याची देखील पद्धत आहे, ती आधी समजून घ्या.

सुरुवातीला आपण नारळावर केवळ एक वडी ठेवणार आहोत, आणि ही वडी आपण प्रज्वलित करायची आहे, म्हणजेच जाळायची आहे, ती कापूरवडी बरोब्बर नारळाच्या मध्यावर ठेवलेली असली पाहिजे. वडी ठेवल्यानंतर पहिली वडी प्रज्वलित केल्यानंतर मनातल्या मनात ‘श्री स्वामी समर्थ’ ‘श्री स्वामी समर्थ’ ‘श्री स्वामी समर्थ’ या महामंत्राचा जप आपण सातत्याने करायचा आहे, जशी पहिली वडी संपत येईल, तेव्हा ती विझण्याच्या आत आपण दुसरी कापूर वडी त्या ठिकाणी ठेवायची आहे.

अशा प्रकारे एक एक करत सातही कापुराच्या वड्या त्या नारळाच्या मध्यावर प्रज्वलित करायच्या आहेत. अगदी शेवटच्या वडी पर्यंत कापुराची ज्योत सतत तेवत राहील,ती विझणार नाही, याची आपण काळजी घ्यायची आहे. आणि मनामध्ये ‘ श्री स्वामी समर्थ’ ‘श्री स्वामी समर्थ’ या मंत्राचा जाप सुरुच ठेवायचा आहे.

हा विधी कधी करावा, आपण दरोज सकाळी आणि संध्याकाळी सकाळी जेव्हा तुम्ही देव पूजा करतात तेव्हा देव पूजा संपन्न झाल्यानंतर तुम्ही हा विधी करू शकतात. सायंकाळी जेव्हा तुम्ही देवघरात सांजवात करतात, या वेळी सुद्धा हा उपाय आपण करावयाचा आहे.

रोज सकाळ संध्याकाळ हा विधी आपण करणार आहोत. हा छोटासा विधी आपल्या घरात शांतता प्रस्थापित करतो, जर घरामध्ये सातत्याने कटकटी होत असतील, भांडणे होत असतील घरातील लोक एकमेकांशी प्रेमाभावनेने वागत नसतील, तर हा छोटासा उपाय तुम्ही करुन पहा.

उपाय केल्याबरोबर पहिल्याच दिवशी एका मिनिटात तुम्हाला श्री स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर तसेच तुमच्या कुटुंबावर झालेली दिसून येईल, घरामध्ये सुख तथा शांती निर्माण होईल, तुमच्या मनामध्ये जर निराशा असेल, तर मनातील निराशा दूर होईल, मन स्थिर होईल, आपली विवेकबुद्धीही जागृत होईल. एखादी समस्या असेल, त्या समस्येचे समाधान होत नसेल, ती समस्या सुटत नसेल, तर या समस्ये बाबत नक्की काय करावे?

याचं उत्तर सुद्धा स्वामींच्या कृपेने आपल्याला नक्की मिळेल. एखादा निर्णय घ्यायचा आहे, मात्र निर्णय नक्की कोणता घ्यावा? दुविधा मनस्थिती आहे, त्या वेळीसुद्धा हा कर्पूर होम विधी अत्यंत उपयुक्त आहे, तुम्ही योग्य त्या निर्णयापर्यंत नक्की पोहचाल, असा हा उपाय तुम्ही दररोज करू शकता, आणि प्रत्येक पौर्णिमेला किंवा अमावस्येला दर पंधरा दिवसांनी हा नारळ आपण बदलायचा आहे.

हा नारळ पौर्णिमेला किंवा अमावस्येला आपण फोडायचा आहे, आणि जर तो खराब निघाला,तर तो वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे. किंवा पिंपळाच्या किंवा वडाच्या झाडाखाली ठेवून आलात तरीही चालेल,जर नारळ चांगला निघाला, तर त्याचा प्रसाद घरातील सर्वांनी खायचा आहे. श्री स्वामी समर्थांचा महिमा अगाध आहे!! तुमची श्री स्वामी समर्थांवर श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला लागेल.

टीप : आम्ही वर दिलेली माहिती धा’ र्मिक मान्यतेच्या आधारांवर दिलेली आहे. यामागे कोणतीही अं’ध श्रद्धा तथा गै’रसमज पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा मानस नाही. त्यामुळे कृपया कुणीही तसा गै’रसमज करून घेऊ नये.

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स