नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो महाभारतामध्ये ज्यावेळेस अर्जुन नैराश्यमध्ये गेला होता. त्याला काय करावे सुचत नव्हते. युद्धा मध्ये आपल्या नातेवाईकांना बघून त्याचे हातपाय गळाले होते. तेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवत गीता सांगून त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली होती.
अर्जुनाची त्यावेळी जशी अवस्था झाली होती आपली पण त्या सारखीच अवस्था झालेली असते. आपल्यालासुद्धा आयुष्यात काही प्रश्न पडलेले असतात. काय करावे सुचत नाही.
जसे की निर्णय कसा घ्यायचा? टेंशन, चिंता, काळजी कसे दूर करायचे? आत्मविश्वास कसा निर्माण करायचा? यशस्वी कसे व्हायचे? मृत्यूची भीती कशी घालवायची? या सर्व प्रश्नांची उत्तरे श्रीकृष्णांनी भगवत गीतेमध्ये दिलेली आहे.
1 निर्णय कसा घ्यायचा?
कृष्ण सहाव्या अध्यायामध्ये पस्तिसाव्या श्लोकामध्ये अर्जुनाला सांगतात. हे अर्जुन चंचल मनाला संयमित करणे नीसंशय अत्यंत कठीण आहे. पण योग्य अभ्यासाद्वारे आणि अनासक्तीद्वारे मनाला वश मध्ये करणे शक्य आहे.
म्हणजे काय आपल्याला आयुष्यात कोणत्याही ठिकाणी स्पष्टता पाहिजे असेल, तर मनाला शांत आणि संयमी करणे आवश्यक आहे. चंचल मनाने किंवा घाई घाई मध्ये घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता असते. पण मनाला वश मध्ये करणे एवढे शक्य नाही.
त्याला खूप कष्ट घ्यावे लागतात. ध्यान धारणा, अभ्यास आणि चिकाटीने प्रयत्न करावे लागतात. किती अभ्यास म्हणजे काय सतत चांगल्या गोष्टीचे वाचन करणे. श्रवण, चिंतन आणि मनन करणे. चांगल्या लोकांच्या संगतीत राहणे. जेव्हा आपण सातत्याने या गोष्टी करतो. तेव्हा आपले मन शांत आणि स्थिर व्हायला मदत होते. आणि तेव्हाच आपण योग्य निर्णय घेऊ शकतो.
2 टेंशन, चिंता, काळजी कशी दूर करायची?
श्रीकृष्ण दुसऱ्या अध्यायामध्ये 47 व्या श्लोकामध्ये सांगतात की तुला कर्म म्हणजे काम करायचे पूर्ण अधिकार आहेत पण कर्म फळावर म्हणजे रिझल्ट वर तुझा अजिबात अधिकार नाही.
त्यामुळे परिणामाचा विचार न करता आपले पूर्ण लक्ष कामावर ठेव. मित्रांनो आज आपण जे काही करतो ते काहीतरी मिळवण्यासाठी काम करतो. पैसे, बंगला, गाडी, आयफोन हे सर्व करणे चुकीचे नाही पण आपण परिणामांना एवढे चिकटलेले असतो की आपल्या डोक्यात तेच चाललेले असते.
माझ्याकडे एवढे पैसे आले ना तर मी हे घेईन. माझ्याकडे तेवढे पैसे आले ना कि मी ते घेईन. आणि इथेच सर्व टेंशन, चिंता, दुःखाला सुरुवात होते. कारण या सर्वांची मूळ हे अपेक्षा. अनिल अपेक्षा पूर्ण नाही झाली की दुःख होते. म्हणून श्रीकृष्ण सांगतात तुझ्या हातात फक्त कर्म करणे आहे, बाकी काही तुझ्या कंट्रोलमध्ये नाही. त्यामुळे परिणामाचा विचार न करता काम करत रहा.
3 आत्मविश्वास निर्माण कसा करायचा?
श्रीकृष्ण सतराव्या अध्यायामध्ये 28 व्या श्लोकांमध्ये सांगतात की श्रद्धे विना कोणतेही केलेले काम मग ते दान असेल, त्याग असेल, तपस्या असेल किंवा अजून कोणतेही काम असेल त्या कामावर विश्वास नसेल तर ते काम व्यर्थ आहे. त्या कामाला काहीच अर्थ नाही.
म्हणजे काय मित्रांनो कोणतेही काम करताना तुमची त्यावर श्रद्धा असली पाहिजे, विश्वास असला पाहिजे. कोणीतरी सांगते किंवा कुठेतरी वाचले म्हणून ते काम करणे योग्य नाही. एक गोष्ट आहे एका गावामध्ये पाऊस पडलेला नसतो.
सगळे गावकरी गावातल्या मंदिरामध्ये पावसासाठी प्रार्थना करण्यासाठी जमतात. त्यांच्यामध्ये एक छोटा मुलगा असतो तो स्वतः छत्री घेऊन आलेला असतो. कारण त्याला फक्त विश्वास असतो की प्रार्थना केल्यानंतर पाऊस पडणार आहे. याला म्हणतात श्रद्धा, विश्वास. जेव्हा आपण त्या प्रकारे काम करतो तेव्हा आपला विश्वास आपणच वाढतो.
4 यशस्वी कसे व्हायचे?
श्रीकृष्ण तिसऱ्या अध्यायामध्ये एकविसाव्या श्लोकांमध्ये सांगतात की श्रेष्ठ व्यक्ती जे जे करते त्याचं अनुसरण सामान्य लोक करतात. आपल्या कामांनी ती जे जे आदर्श घालून देते, अनुसरन सारे जग कार्य करते. म्हणजे काय मित्रांनो तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये असाल तुम्हाला त्यामध्ये श्रेष्ठ व्हायचे आहे. टॉप ला जायचं आहे.
जेव्हा हा विचार तुमच्या मनामध्ये घोळवता तेव्हा तुमचे प्रयत्न सुद्धा त्याच दिशेने व्हायला सुरुवात होतात. मग कितीही अडथळे आली, संकटे आली तरी तुम्ही घाबरत नाही. तुमच्यापुढे एकच ध्येय ठरलेले असते. मला माझ्या क्षेत्रात श्रेष्ठ व्हायचे आहे. अशा विचाराच्या व्यक्तीला कोणीही थांबवु शकत नाही.
5 मृत्यूची भीती कशी घालवायची?
श्रीकृष्ण पहिल्या अध्यायात वीस ते तेवीसाव्या श्लोकामध्ये सांगतात की कोणत्याही काळी आत्म्याला जन्म नाही, मृत्यू नाही. आत्मा हा अजर, अमर, अखंड आहे. ह्या आत्म्याचे कोणत्याही शास्त्राद्वारे तुकडे करता येत नाही.
अग्नीद्वारे त्याला जाळता येत नाही. पाण्याद्वारे त्याला भिजवता येत नाही. तसेच वाऱ्याने त्याला सुखवता येत नाही. ज्याप्रमाणे मनुष्य जुन्या वस्त्रांचा त्याग करून नवीन वस्त्र धारण करतो. त्याचप्रमाणे आत्मा जुन्या आणि निरुपयोगी शरीराचा त्याग करून नवीन शरीर धारण करते.
म्हणजे काय मित्रांनो आपण कधीच मरत नाही. मरते ते आपले शरीर. आणि आपण म्हणजे आपले शरीर नाही जेव्हा आपण या दृष्टीने आपल्या जीवनाकडे बघतो तेव्हा आपल्याला मृत्यूची भीती वाटत नाही.
वरील प्रकारची माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या माहितीसाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा व शेअर करायला विसरू नका.