Tuesday, December 5, 2023
Homeअध्यात्मश्रीकृष्ण सांगतात की गोमातेच्या या अंगाला हात लावल्याने, पुत्र सुख प्राप्त होते...

श्रीकृष्ण सांगतात की गोमातेच्या या अंगाला हात लावल्याने, पुत्र सुख प्राप्त होते दारिद्रय संपते..!!

नमस्कार मित्रांनो, आपल्या हिंदू धर्माशास्त्रांमध्ये गोमातेला अतिशय पवित्र आणि शुभ मानले गेले आहे. धार्मिक आणि अध्यात्मिक दृष्ट्या गोमातेचे अनन्यसाधारण महत्त्व पुराणात सुद्धा सांगितले गेले आहे. मित्रांनो, तशी गाय शांत तथा सौम्य स्वभावाचा प्राणी म्हणून ओळखली जाते.

आपल्या धर्मात गोमातेला देवीचा दर्जा दिला जातो. मित्रांनो, गोमातेच्या पोटामध्ये सुद्धा तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो. याचमुळे आपण गोमातेला पुजत असतो. अनेक हिंदू धर्मग्रंथांमध्ये गोमातेचे वर्णन आढळून येते. आणि या ग्रंथांमध्ये अनेक शुभशकुन हे गोमातेच्या संदर्भात सांगितले गेले आहेत.

चला तर मग मित्रांनो आज आपण पाहणार आहोत गोमातेच्या संदर्भातील काही शुभ शकुन. मित्रांनो, गायी जेव्हा रानातून चरून घरी येत असतात, त्यावेळेला त्यांच्या चालण्याने पायांच्या हलचालीमुळे सभोवतालच्या वातावरणात रज म्हणजेच ज्याला आपण धुलिकण असे म्हणतो ते पसरतात.

त्या धुळीलाच गोरज मुहूर्त आणि या मुहूर्तावर लग्न करणे खूप शुभ योग समजला गेला आहे. आपण जर कुठे यात्रेला निघालो आहोत. आणि रस्त्याने जातांना एखाद्या गोमातेचे दर्शन आपल्याला झालेच, तसेच आपल्याला एखादी गाय तिच्या वासराला दूध पाजताना दृष्टीस पडली. तर असे समजून घ्या की आपली यात्रा यशस्वीपणे पूर्ण होणार आहे अगदी, आनंदात व समाधानात आपल्या इच्छा देखील नक्कीच पूर्ण होणार आहेत.

मित्रांनो, ज्या घरांमध्ये गोमाता असते त्या घरातील अस्तित्वात असलेले वास्तुदोष आपोआपच दूर होतात. ज्या ठिकाणी गोमाता अस्तित्व असते, ज्या घरात गोमाता राहते अशा घरात कधीही वास्तुदोष अस्तित्वात नसतो. तसेच एखाद्याचा कुंडलीमध्ये शुक्र ग्रह हा नीच स्थानी विराजमान असेल.

तर त्याचा वाईट प्रभाव आपल्या जीवनावर पडत असतो. त्यासाठी आपण दररोज सकाळचा स्वयंपाक झाला की, त्या‌ स्वयंपाकातील पहिली पोळी एखाद्या पांढऱ्या गोमातेला खायला घालायची असते. असे केल्याने शुक्र ग्रहाची वाईट दशा संपून त्याची स्थिती उचित स्थानावर येत असते. सूर्य चंद्र मंगळ शुक्र यांची जर कधी युती असेल तर पितृदोष होण्याची शक्यता जास्त असते.

एका मान्यतेनुसार सूर्य या ग्रहाचा संबंध वडिलांशी व मंगळाचा संबंध र-क्ताबरोबर असतो. म्हणून सुर्य शनि राहू किंवा केतू बरोबर स्थिर असेल तर दृष्टी संबंधी दोष निर्माण होतो तसेच मंगळाची युती राहू बरोबर असेल तर पितृ दोष निर्माण होतो. या दोषांमुळे काय होते तर आपले संपूर्ण आयुष्य खडतर आणि संघर्षमय बनते.

मित्रांनो, जर तुमच्या कुंडलीत असा कुठलाही दोष किंवा पितृदोष असेल. तर तुम्ही गोमातेला दररोज किंवा अमावस्येला गूळ किंवा चारा खायला द्यायला हवा. असे केल्याने पितृ दोष तर नष्ट होतोच, त्याचबरोबर तुमच्या कुंडलीत जर सूर्यदेव तुळ राशीत उच्च स्थानावर असेल, किंवा अशुभ स्थितीत असेल, तसेच केतूमुळे अडचणी आणि बाधा येत असतील. तर गोमातेमध्ये सूर्य व केतू नाडी असल्यामुळे गोमातेची पूजा अवश्य करावी.

असे केल्याने सर्व दोष समाप्त होतात. जर तुम्ही रस्त्याने कुठे जात असाल आणि तुम्हाला समोरून गाय येताना दिसली. तर गाईला नेहमी आपल्या उजव्या बाजूने जाऊ द्यायला हवे. यामुळे आपले जे पण काही काम असेल जे फार कधीपासून अडकून पडले आहे, ते नक्कीच पूर्ण होते.

तसेच जर आपण एखादे वाईट स्वप्न पाहिले, आणि तुम्हाला भीती वाटत असेल, नेहमी वाईट स्वप्नं पडत असतील. तर गोमातेच्या नावाचा जप करावा. असे केल्याने पडत असलेले वाईट स्वप्नं बंद होतील. तसेच गायीच्या तुपाचे एक नाव आयु देखील आहे. गाईचे शुद्ध तूप सेवन केल्याने आपणास दीर्घायू लाभत असते.

तसेच आपल्या हातावरील हस्तरेषांबाबत म्हणजेच आपल्या आयुष्याची रेषा जर मध्ये कुठे पुसट झालेली असेल तर तुम्ही गाईच्या शुद्ध तुपाचे सेवन करावे आणि रोज गोमातेचे पूजनही करावे. असे केल्याने तुमच्या सर्व अडचणी नाहिशा होतील.

मित्रांनो आपण बघितले असणार देशी गाईच्या पाठीवर कुबड सारखा दिसणारा एक भाग असतो, त्याला बृहस्पती असे म्हणतात. म्हणून कुंडलीमध्ये बृहस्पती राशींपैकी मकरेत असेल. तर देशी गायीच्या या कुबडाला शिवलिंग स्वरूप मानून त्याचे दर्शन घेत जावे.

तसेच गोमातेला गूळ तथा चणेही खायला घालावे. मित्रांनो, असे केल्याने आपली आर्थिक बाजू सुधारते. त्याबरोबर गाईला घरात रोज बनविलेली पहिली पोळी खायला घालावी. यामुळे अनेक दोष दूर होण्यासाठी मदत होते.

गोमातेच्या डोळ्यांमध्ये तेजस्वी रूप सूर्यदेव तर शीतलता स्वरूप चंद्र देवांचे सुद्धा अधिष्ठान असते असे म्हटले जाते. म्हणूनच एखाद्याच्या कुंडलीमध्ये जर सूर्य व चंद्राची स्थिती कमजोर असेल. तर गोमातेच्या दोन्ही डोळ्यांचे दररोज दर्शन करावे. मित्रांनो, असे केल्याने आपल्या कुंडलीमध्ये सूर्य व चंद्राची स्थिती अधिक मजबूत होण्यास मदत होत असते.

टीप- येथे दिलेली सर्व माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकांच्या विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सर्वसाधारण जनहित लक्षात घेऊनच ती इथे सादर केलेली आहे.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक करा,शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा..!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

हे वाचा

बॉलीवुड

स्पोर्ट्स